Home कोंकण - ठाणे माधुरी’साठी हजारो पाऊले कोल्हापूरच्या दिशेने.- हत्तीणीच्या प्रेमापोटी अभूतपूर्व पदयात्रा.

माधुरी’साठी हजारो पाऊले कोल्हापूरच्या दिशेने.- हत्तीणीच्या प्रेमापोटी अभूतपूर्व पदयात्रा.

Oplus_131072

🟥’माधुरी’साठी हजारो पाऊले कोल्हापूरच्या दिशेने.- हत्तीणीच्या प्रेमापोटी अभूतपूर्व पदयात्रा.- महादेवी (माधुरी) हत्तीणसाठी कोल्हापूरकर उतरले रस्त्यावर. ( नांदणी ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मूक पदयात्रा..)

कोल्हापूर :- प्रतिनिधी

कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठातील महादेवी (माधुरी) हत्तीणला गुजरातमधील वनतारा येथे हलवण्यात आल्याने कोल्हापूर आणि परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधी, नागरिक आणि विविध सामाजिक संघटनांनी महादेवी हत्तीणला पुन्हा कोल्हापुरात आणण्यासाठी सक्रिय प्रयत्न सुरू केले आहेत.

🟥महादेवी (माधुरी) हत्तीणीला परत आपल्या घरी आणण्यासाठी काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी स्वाक्षरी मोहीम सुरु केली होती. या मोहिमेमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील सव्वा दोन लाखांहून अधिक नागरिकांनी सहभाग घेतला. आपली महादेवी नांदणी मठातच राहिली पाहिजे असा संदेश या निमित्ताने देण्यात आला. दोन दिवसांपूर्वी सुरु केलेल्या स्वाक्षरी मोहिमेला कोल्हापूरकरांनी उदंड प्रतिसाद दिला आहे. तब्बल दोन लाख चार हजार चारशे एकवीस कोल्हापुरकरांनी महादेवीला/ माधुरीला परत आणण्यासाठीच्या फॉर्ममध्ये स्वाक्षरी दिली.

रविवारी श्री 1008 भगवान महावीर जयंती उत्सव समिती, इचलकरंजी आणि समस्त जैन बांधवांच्या वतीने माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली नांदणी ते कोल्हापूर अशी मूक पदयात्रा आयोजित करण्यात आली. या पदयात्रेत कोल्हापूर जिल्ह्यासह इतर राज्यांमधील सर्वधर्मीय लोक मोठ्या संख्येने सहभागी झाले.

ही मूक पदयात्रा रविवारी पहाटे नांदणी येथून सुरू झाली. सांगली-कोल्हापूर महामार्गावरील शिरोली फाटा, पुणे-बेंगळूरु महामार्गावरील तावडे हॉटेल, ताराराणी पुतळा, दाभोळकर कॉर्नर आणि बसंत बहार टॉकीज मार्गे ही यात्रा कोल्हापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचणार आहे. या पदयात्रेत राज्यभरातून हजारो नागरिकांनी भाग घेतला असून, सहभागींनी ‘माधुरी परत करा’ आणि ‘जिओ बॉयकॉट’ अशा घोषणा लिहिलेल्या टोप्या परिधान केल्या होत्या. ‘एक रविवार माधुरीसाठी’ असे म्हणत नागरिकांनी मोठ्या उत्साहाने या मूक मोर्चात सहभाग नोंदवला. जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रपतींच्या नावे निवेदन सादर करून महादेवी हत्तीणला परत आणण्याची मागणी करण्यात येणार आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.