सरकारने अदानी व आंबानीचे लाड बंद करावे.- गरीब शेतकऱ्याला मदत करण्याची भावना ठेवा.- कॉम्रेड अतुल दिघे.
( आजऱ्यात गिरणी कामगारांचा मेळावा संपन्न.- मुंबईतच हक्काची घरे द्या.)
आजरा.- प्रतिनिधी

महाराष्ट्रातील सरकारने अदानी व आंबानीचे लाड बंद करावे व गरीब शेतकऱ्याला गिरणी कामगाराला मदत करण्याची भावना ठेवा असे मत आजरा येथे गिरणी कामगाराच्या मेळाव्यात अध्यक्षस्थानावरून कॉम्रेड अतुल दिघे बोलत होते.
स्वागत व प्रास्ताविक कॉम्रेड नारायण भडांगे यांनी केले. आजऱ्यात गिरणी कामगारांचा मेळावा मोठ्या संख्येने संपन्न झाला. कॉम्रेड श्री दिघे पुढे बोलताना म्हणाले बिल्डरांच्या काही दलालांचा गरीब गिरणी कामगाराला तुम्हाला खोली लागली आहे. अशी फसवणूक करून कागदपत्र व पाठवा व आलेला ओटीपी सांगा असे सांगून फसवणूक करत आहेत. त्यांच्यावर गिरणी कामगाराच्या त्या – त्या विभागातील पोलीस स्टेशनमध्ये गिरणी कामगारांनी गुन्हा दाखल करावा यासाठी गिरणी कामगार संघटना त्यांच्या पाठीशी राहील पण लढा मुंबईतच हक्काची घरे घेतल्याशिवाय थांबणार नाही. गारगोटी मध्ये मोर्चा गेला हुतात्मा चौकात हुतात्म्यांना आदरांजली वाहिली मंत्र्यांना भेटता आले नाही.
नाही त्यांनी कामगारांची भेट घेतली. गुन्हे दाखल झाले परंतु मुंबईत आझाद मैदानावर मोर्चा काढून जो जी. आर रद्द करण्यासाठी गेलो होतो. त्याचा आझाद मैदानातून नांगा मोडला हे लक्षात ठेवावे. गिरणी कामगारांनी मतदान केले नाही. असे म्हणणारे मंत्र्यांनी व आमच्या ईर्षा, मान करू नका. मी पुन्हा त्याच ताकतीने येऊन आपला सत्कार करू. गिरणी कामगारांच्या पाठीशी राहा. मुंबईत गिरणी कामगारांच्या अडचणी सोडवण्याच्या काही मागण्या मान्य केल्या महाराष्ट्रातील १४ संघटना एकत्र आल्या व एकजुटीने गिरणी तेही कामगारांच्या ताकदीवर त्यामुळे आपली एकजूट अशीच दाखवली पाहिजेत. गिरणी कामगाराच्या जागा भांडवल दारांना दहा टक्के दराने दिली. व यामुळे शासनाला ३५ लाख कोटींचा चुना सरकारला लागला. हे लक्षात ठेवावे. शेतकऱ्यांच्या अनेक समस्या वन्य प्राण्यापासून अधिक धोका शेतकऱ्यांच्या पिकाला व शेतकऱ्याला होत तुमचे वन्य प्राणी तुम्ही सांभाळा. शेतकऱ्या पिकांची नुकसान भरपाई काडीमोड दिली याबाबती लवकरच वन विभागावर मोर्चा व परिषदा होणार आहेत. त्यामुळे सर्व गिरणी कामगारांनी एक संघ व संघटित रहा. आपला विजय निश्चित होणार व मुंबईत घरे घेतल्याशिवाय थांबणार नाही असे बोलताना श्री दिघे म्हणाले.
यावेळी कॉमेड शांताराम पाटील म्हणाले गिरणी कामगार चालला यापेक्षाही मोठ्या ताकतीने द्यावा लागणार आहे. काही बिल्डरांचे दलाल आपल्याला खोली लागली आहे. म्हणून फसवणूक करत आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. कोणीही ओटीपी सांगू नये. त्यांनी फसवणूक केलेली असल्याचा आजरा पोलीस स्टेशन येथे संबंधितावर गुन्हा दाखल करूया. राज्यातील राज्यकर्त्यांना चळवळ काय असते हे गिरणी कामगारांनी शिकवली आहे . १०५ हुतात्मे होऊन गेले यातील ८५ हुतात्मे हे गिरणी कामगार आहेत. काही दिवसापासून तुम्हाला खोली लागली आहे घरचा ताबा घ्या. खरंतर या ठिकाणी अजून एक वीट देखील नाही. अशा येणाऱ्या मोबाईल वरती कॉलना पण त्या पद्धतीने उत्तर द्या. मुंबईमध्ये घर पाहिजे आपल्याकडे उपलब्ध असेल तर ठिकाण सांगा येऊन पाहतो असे उत्तर द्या. परंतु हा लढा मुंबईतच घर घेतल्याशिवाय थांबणार नाही असे कॉम्रेड श्री पाटील म्हणाले.

यावेळी गिरणी कामगार कार्यालय या ठिकाणी नवीन महिला संघटनाचे फलकाचे उद्घाटन काँग्रेस अतुल दिघे व गिरणी कामगार वारसदार यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी कॉम्रेड महादेव होडगे, संजय घाटगे त्यांनी मनोगत व्यक्त केले.

या मेळाव्याला गिरणी कामगार संघटनेचे तानाजी पाटील, हिंदुराव कांबळे, नारायण राणे, धोंडीबा कुंभार, मनपा बोलके, निवृत्ती मिसाळ, बाबू केसरकर, तसेच अनिता बागवे, जिजाबाई वांजोळे सह गिरणी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. काशिनाथ मोरे यांनी आभार मानले.