आजरा. प्रतिनिधी. ०५
आशा सेविका व गट प्रवर्तक त्यांच्याकडून काम करून घेतले जाते कामाचा मोबदला वेळत दिला जात नाही का.? यामुळे अशा सेविका व गटप्रवर्तक यांचे घर चालायचे कसे असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत पुन्हा महाराष्ट्रात अशा सेविकांचे काम बंद आंदोलन होणार असल्याचे बोलले जात आहे.
राज्यातील सुमारे ७२ हजार आशा सेविका व गटप्रवर्तकांचा मागील दोन महिण्यापुर्वी आठ दिवसांपासून सुरू असलेला संपात सहभागी होत्या व तो संपही अखेर मिटला होता.
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत महत्त्वाच्या मागण्या मान्य झाल्यानंतर संप मागे घेण्याचा निर्णय झाला होता.
आशा कर्मचारी प्रतिकूल परिस्थितीत काम करत असल्यानं त्यांना योग्य आर्थिक मोबदला द्यावा, अशी संपकरी कृती समितीची प्रमुख मागणी होती.
त्याबाबत काही दिवसांपूर्वी मंत्रालयात बैठकही घेण्यात आली होती.
मात्र, राज्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत वाईट असून आता कोणताही आर्थिक बोजा सहन करण्याची सरकारची परिस्थिती नाही.
त्यामुळे आशा कर्मचाऱ्यांना किमान वेतन देणे शक्य नाही. व करोना संबंधित मोबदल्यात वाढ करणे शक्य नाही, अशी भूमिका मंत्री श्री. टोपे यांनी घेतली होती. त्यामुळं आशा कर्मचाऱ्यांनी संप सुरूच ठेवला होता. यावेळी
राजेश टोपे यांनी आंदोलना दिवशी पुन्हा कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली.
आशा सेविकांना १ जुलै २०२१ पासून एक हजार रुपये निश्चित मानधनवाढ देण्याचं सरकारनं मान्य केलं. तसंच, ५०० रुपये कोविड भत्ता देण्याचा निर्णयही घेण्यात आला. यानंतर संप मागे घेत असल्याचं समितीच्या पदाधिकाऱ्यांनी या बैठकीनंतर जाहीर केलं.
या संपामधील काय होत्या मागण्या तर यामध्ये.
आशा सेविकांना किमान वेतन द्यावे.करोनाशी संबंधित कामाच्या मोबदल्यामध्ये वाढ द्यावी.
करोना संबंधित काम करण्यासाठी तीनशे रुपये प्रतिदिन याप्रमाणे विशेष भत्ता द्यावा.
आरोग्य खात्याच्या नोकर भरतीत प्राधान्य देण्यात यावे.
【आरोग्य कंत्राटी
कर्मचाऱ्यांप्रमाणेच गटप्रवर्तक यांचे सुसूत्रीकरण. 】
【 परंतु कोल्हापूर जिल्हासह काही जिल्ह्यातील अजुनही २०१९ मधील ओ. डी. एफ मानधन थकीत आहे. २०२० मधील माझे कुटुंब – माझी जबाबदारी सर्वेक्षण, महाई सर्वेक्षण, कृष्टरोग सर्वेक्षण देणे थकीत आहे तर एप्रिल महिण्यातील किरकोळ मानधन देण्यात आले आहे. तर मे, जुन, जुलैचा वेतनाचा पत्ता नाही.
आम्ही आमचे कुटुंब कसे चालवायचे असा प्रश्न आशा सेविका व गटप्रवर्तक यांच्यासमोर उपस्थित होत आहे. खोटी आश्वासने देऊनही प्रशासन अशा सेविका कडून फक्त काम करून घेत आहे. पण मानधन दिले जात नसल्याचे बोलले जात आहे. या आंदोलनाला सुरुवात कोल्हापूर जिल्ह्यातून होणार आमच्यासमोर कोणताही पर्याय नसल्याचे आशाताई बोलत आहेत. 】