🛑मनमानी कारभार व भ्रष्टाचारा विरोधात.- “चौकशी समिती” नेमावी.. दोषींवर कारवाई करून फौजदारी गुन्हा करावा.- मौजे गिजवणे श्री.लक्ष्मी सहकारी दूध संस्थेचा कारभार चव्हाट्यावर.
🛑आजरा महाविद्यालयामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा.
🛑आजरा महाविद्यालयामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा.
आजरा.- प्रतिनिधी

आजरा महाविद्यालयामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा दिनांक १४ रोजी आजरा महाविद्यालयात MHT- CET, JEE, NEET व Law CET मध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अशोक चराटी होते. श्री. चराटी यांनी विद्यार्थ्यांना तणावमुक्त अभ्यास करून हसत खेळत येणाऱ्या परिस्थितीस सामोरे जावे. तसेच यश मिळवण्यासाठी लढण्यास सज्ज राहावे. भविष्यात यशाची शिखरे पादाक्रांत करून महाविद्यालयाचे नाव उज्वल करावे असे सांगितले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अनिल देशपांडे यांनी यशाला शॉर्टकट नसतो. यश मिळवायचे असल्यास कष्टाला पर्याय नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मार्गदर्शन करताना पालक व विद्यार्थी यांच्या खासगी क्लासेस कडे वाढत्या कलाबाबत गांभीर्याने लक्ष वेधले. आजरा महाविद्यालय मध्ये अनुभवी तज्ञ मार्गदर्शकाकरवी दर्जायुक्त व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत असताना देखील पालकांनी खासगी क्लासेस ला अॅडमिशन घेऊन आर्थिक भुर्दंड सहन करण्यापेक्षा महाविद्यालयात पाल्यांना प्रवेश घेऊन द्यावा.
असे आवाहन पालकांना केले. सौ. रागिणी विभुते यांनी महाविद्यालयाच्या MHT-CET च्या यशाच्या चढत्या गौरवपूर्ण आलेखाबद्दल माहिती दिली. या कार्यक्रमासाठी संचालक मा. कृष्णा येसने, प्राचार्य डॉ. ए. एन. सादळे, उपप्राचार्य डी. पी. संकपाळ उपस्थित होते. सत्कार वाचन सौ. श्रद्धा कुलकर्णी यांनी केले. कु. सानिया नार्वेकर, काजल गेहलोत, समृद्धी नार्वेकर, सोहम पाटील, साईनाथ डोंगरे या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केलीत. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी योगेश पाटील यांचे मार्गदर्शन लाभले तसेच सौ. ज्योती कुंभार, भूषण गावडे, संजय गाईंगडे, सागर फगरे, अविनाश संकेश्वरी, श्री. सुनील गिलबिले, भरत वायकसकर, रवींद्र मस्कर व संदीप देसाई यांनी सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. शुभांगी सरदेसाई यांनी केले तसेच कार्यक्रमाचे आभार अरुण सुरुंगले यांनी मानले.
🛑मनमानी कारभार व भ्रष्टाचारा विरोधात.- “चौकशी समिती” नेमावी.. दोषींवर कारवाई करून फौजदारी गुन्हा करावा.- मौजे गिजवणे श्री.लक्ष्मी सहकारी दूध संस्थेचा कारभार चव्हाट्यावर.
गडहिंग्लज.- प्रतिनिधी.

मौजे गिजवणे येथील श्री.लक्ष्मी सहकारी दूध व्याय.संस्था मर्या.गिजवणे या संस्थेच्या भ्रष्टाचारासंदर्भातील विविध मागण्यांसाठी १४ जुलै २०२५ रोजी प्रांत कार्यालयावर संघर्ष मोर्चा काढून “बेमुदत ठिय्या आंदोलन” सुरू झाले आहे.
या आंदोलनाचे नेतृत्व मुख्य संघटक कॉम्रेड संग्राम सावंत C.P.M. जिल्हा सेक्रेटरी प्रा.सुभाष जाधव, अखिल भारतीय किसान सभा जिल्हा सेक्रेटरी कॉम्रेड अमोल नाईक C.P.M राज्य उपाध्यक्ष प्रा.आबासाहेब चौगुले अँड.दशरथ दळवी व दूध उत्पादक संघर्ष समितीचे सागर शिंदे, जनार्दन तोडकर, मानतेश बन्नी, गणेश कळेकर, विजय कडुकर, स्वप्नील कोरी, नजुरुद्दीन म्हाबर्जी करत आहेत. तसेच ज्येष्ठ नेते बाबासाहेब पाटील यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला.
मौजे गिजवणे येथील श्री.लक्ष्मी सहकारी दूध व्याय.संस्था मर्या.गिजवणे या संस्थेच्या भ्रष्टाचारासंदर्भातील विविध मागण्यांसाठी यासंदर्भातील निवेदन गोकुळच्या संबंधित अधिकारी व तालुक्यातील अधिकारी यांना देऊन देखील कोणतीही कारवाई केलेली नाही.
सखोल चौकशीसाठी “चौकशी समिती” नेमलेली नाही. यामुळे संस्थेच्या विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभा व दूध उत्पादक संघर्ष समिती यांच्या वतीने बेमुदत ठिय्या आंदोलन सोमवार दि.१४ जुलै २०२५ रोजी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते प्रांत कार्यालय (उपविभागीय कार्यालय) येथे “संघर्ष मोर्चा” काढून बेमुदत ठिय्या आंदोलन प्रांत कार्यालय गडहिंग्लज यांच्यासमोर सुरू झालेले आहे.
संघर्ष मोर्चा व बेमुदत ठिय्या आंदोलन हे अखिल भारतीय किसान सभा व दूध उत्पादक संघर्ष समितीच्या वतीने मौजे गिजवणे येथील श्री.लक्ष्मी सहकारी दूध व्याय.संस्था मर्या.गिजवणे या संस्थेच्या भ्रष्टाचारासंदर्भातील विविध मागण्यांसाठी लोकांनी व संघटनेने संबंधित श्री.लक्ष्मी सहकारी दूध व्याय.संस्था मर्या.गिजवणे यांना निवेदन व अर्ज दिलेले आहेत.याकडे संस्थेने दुर्लक्ष केलेले आहे.माहिती दिलेली नाही.या सह ३७ मागण्यांचे निवेदनाची गांभीर्यपूर्वक दखल प्रशासनाने व शासनाने घेतलेली नाही.
प्रमुख आमच्या मागण्या.

१) श्री.लक्ष्मी सहकारी दूध व्याव. संस्था मर्यादित गिजवणे ता. गडहिंग्लज जि.कोल्हापूर या संस्थेच्या मनमानी कारभार व भ्रष्टाचारा विरोधात सखोल चौकशी “चौकशी समिती” नेमून करण्यात यावी.दोषींवर कारवाई करून फौजदारी गुन्हा झाला पाहिजे….
२ ) सन – २०१५ पासून ते सन- २०२५ पर्यंत शासनामार्फत फेरलेखापरीक्षण व्हावे.तसेच या कालावधीत लेखापरीक्षण केलेल्या लेखापरीक्षकांची ही चौकशी झाली पाहिजे! (ऑडिटचे ऑडिट झाले पाहिजे. ऑडिटरची ही सखोल चौकशी झाली पाहिजे.
३)याबाबतीत सखोल व परिपूर्ण चौकशी “चौकशी समिती” नेमून झाली पाहिजे. संस्थेत झालेल्या मनमानी व भ्रष्टाचार करणाऱ्या विरोधात कारवाई करायला हवी आहे.
वरील मागणी केलेले आहेत. या आंदोलनात अखिल भारतीय किसान सभा दूध उत्पादक संघर्ष समिती संग्राम सावंत मुख्य संघटक सागर शिंदे, गणेश कळेकर, मानतेस बन्ने, जनार्दन तोडकर, स्वप्निल कोरी, विजय कडूकर, अक्षय कांबळे, राहूल दास, रमेश कडुकर, संतोष माने, रमेश नाईक, ऋषिकेश चौगुले, विजय कातकर, नजुरुद्दीन म्हाबर्जी यांचा सहभाग आहे.
