आजराः प्रतिनिधी.
वडकशिवाले (ता. आजरा) येथे जिल्हा बँकेचे मायक्रो एटीएम सुरु करण्यात आले आहे . आजरा तालुक्यात बँकेच्या शाखा नसलेल्या ठीकाणी पहिले मायक्रो एटीएम सुरू करण्याचा मान वडकशिवाले येथील श्री कृष्ण दूध संस्थेला मिळाला आहे . महिला सभासद तुळसाबाई शिंदे, मंजाबाई सावंत, इंदुबाई पाटील व बायणाबाई घुगरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था अद्यक्ष पांडुरंग दिवटे होते .
वडकशिवाले येथे जिल्हा बँकेची शाखा होती. परंतु दहा वर्षांपूर्वी ती बंद करण्यात आली. त्यामुळे वडकशिवालेसह वझरे, महागोंड, घागरवाडी , हालेवाडी या दुर्गम लोकांना पेन्शन, पीक कर्ज व अन्य व्यवहारासाठी बारा कीलोमीटर अंतरावरील उत्तूर येथे जावे लागत होते. त्यामुळे लोकांची मोठी गैरसोय होत होती. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रिफ यांच्याकडे स्थानिक कार्यकर्त्यांनी मागणी केल्यावर तातडीने ही मशिन उपलब्ध करुन देण्यात आली.आता या एटीएमचा चांगला उपयोग होणार असल्यामुळे ग्रामस्थांतून समाधान व्यक्त होत आहे . कार्यक्रमाला बंडोपंत सावंत , आंबाजी दिवटे, शिवाजी गोईलकर, रामचंद्र पाटील, शिवाजी पाटील, दत्तात्रय काळे, शशिकांत लोखंडे, महेश शिंदे, राजाराम मोरे व विभागीय अधिकारी सुनील दिवटे उपस्थित होते. सागर सावंत यांनी आभार मानले.