आजरा. प्रतिनिधी. ०३.
आजरा येथील एस. टी. स्टँड चे बांधकाम व परशी चे काम पूर्ण होण्या अगोदरच आपण इलेक्ट्रिशन चे काम घाईगडबडीत का पूर्ण करत आहात. असा संतप्त प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला. दि. ०३ रोजी अधिकारी अभियता इंगवले, व ए. डब्ल्यू. एस. पृथीराज चव्हान, स्थानिक अधिकारी विनय पाटील, बस स्थानकात पहाणी करत होते. यावेळी आचानक पदाधिकारी घेऊन अधिकाऱ्यांना प्रश्नांचा भडीमार केला. पावसामुळे गळती लागलेल्या स्टॅन्ड मध्ये आपण इलेक्ट्रिक चे काम घाईगडबडीत करत आहात त्यामुळे एखादी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण एस.टी स्टँडचे स्ट्रक्चर ऑडिट झाल्याशिवाय इलेक्ट्रिशन ऑडिट झाल्याशिवाय एसटी स्टँड ताबा एसटी प्रशासनाने घेऊ नये.व आमदार, एसटी प्रशासन, प्रवासी संघटना, ठेकेदार यांची एक संयुक्त बैठक घ्यावी. आज पुण्याचे वरिष्ठ अधिकारी आले असता आजरा तालुक्यातील सेना-भाजप मनसे पदाधिकारी यांनी आजरा विभाग अधिकारी व पुणे विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांना धारेवर धरून घाईगडबडीत इलेक्ट्रिक कामे करण्याचे कारण तरी काय नेमकं गौडबंगाल काय आहे. असा प्रश्न उपस्थित केल्यामुळे अधिकाऱ्यांना उत्तर देता आले नाही. सध्या बस स्थानकाचे परशी बसवण्याचे काम सुरू आहे. व वरून पाणी गळत आहे बस स्थानकाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे यामुळे सदर कामाची चौकशी व्हावी. तोपर्यंत कोणतेही काम करू नये. या वादग्रस्त चर्चेत शिवसेनेचे तालुका प्रमुख युवराज पवार, भाजपचे प्रवासी संघटनेचे प्रमुख सचिन यंदुलकर, शिवसेनेचे. उप. प्रमुख संजय येसादे, मनसेचे सचिव चंद्रकांत सांबरेकर, युवा सेनेचे महेश पाटील,तसेच अभिजीत रोडगे, सह सामाजिक कार्यकर्ते सहभागी होते.