🟥उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा.- म्हणाले, “दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार”
🟥जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं.- राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण
🟥उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा.- म्हणाले, “दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार”
मुंबई :- प्रतिनिधी

महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर आज एक नवा अध्याय लिहिला गेला. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी अनेक वर्षांनंतर एकाच व्यासपीठावर येत मराठी अस्मितेचा जागर केला आणि सत्ताधारी महायुती सरकारला थेट आव्हान दिलं.वरळीतील एनएससीआय डोममध्ये आयोजित विजयी सभेत ठाकरे बंधूंनी एकजुटीचं प्रदर्शन करत मराठी भाषा आणि महाराष्ट्राच्या हक्कांसाठी लढण्याचा निर्धार जाहीर केला. ही घटना आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांसाठी मोठं आव्हान ठरण्याची शक्यता आहे.
🅾️भाषेच्या लढ्याला मोठं यश
महाराष्ट्र सरकारने त्रिभाषा सूत्र मागे घेतल्यानंतर मराठी भाषेच्या लढ्याला मोठं यश मिळालं आहे. या सभेत उद्धव ठाकरे यांनी यावर भाष्य करताना सत्ताधारी महायुतीवर जोरदार टीका केली. “मराठी भाषेला कमकुवत करण्याचा डाव होता, पण आमच्या एकजुटीने तो हाणून पाडला,” असं उद्धव ठाकरे म्हणाले. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधताना, “महाराष्ट्रातून उद्योगधंदे पळवणाऱ्यांना आणि मराठी भाषेचा अपमान करणाऱ्यांना आता जनता धडा शिकवेल,” असा इशारा दिला. मराठी सक्तीच्या मुद्द्यावर काही जणांनी कोर्टात धाव घेतली असली, तरी मराठी जनतेचा आवाज दडपता येणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
💥सत्ताधाऱ्यांना दिलं खुलं आव्हान
या सभेचा सर्वात महत्त्वाचा क्षण होता तो म्हणजे उद्धव ठाकरे यांनी एकत्र येत सत्ताधाऱ्यांना दिलेलं खुलं आव्हान. उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात सांगितलं, “आम्हाला वापरायचं आणि फेकून द्यायचं, असं सत्ताधाऱ्यांचं धोरण होतं. पण आता आम्ही दोघे भाऊ एकत्र आलोय, आणि यांना फेकून देण्याची वेळ आली आहे!” त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा उल्लेख करताना सांगितलं की, “बाळासाहेबांचा आशीर्वाद आमच्या डोक्यावर आहे. आम्ही कडवट देशाभिमानी मराठी हिंदू आहोत, आणि आम्ही हिंदुत्व कधीच सोडलं नाही.” या वक्तव्यातून त्यांनी विरोधकांनी केलेल्या टीकेचा खणखणीतपणे समाचार घेतला.
🅾️एकजुटीवर विशेष भर
उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्यासोबतच्या एकजुटीवर विशेष भर दिला. “बऱ्याच वर्षांनंतर मी आणि राज एका राजकीय व्यासपीठावर एकत्र आलोय. आमच्या दोघांमधील अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला. आता अक्षता टाकण्याची गरज नाही, आम्ही एकत्र आलोय आणि एकत्र राहणार,” असं त्यांनी ठणकावून सांगितलं. राज ठाकरे यांनीही आपल्या भाषणात मराठी अस्मिता आणि महाराष्ट्राच्या हक्कांसाठी लढण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यांनी सत्ताधारी सरकारवर टीका करताना, “मुंबई आणि महाराष्ट्र आम्ही मिळवला, आणि यापुढेही आम्ही लढत राहू,” असं म्हटलं.
🟣ठाकरे बंधूंच्या या एकजुटीमुळे राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकांमध्ये ही एकजूट सत्ताधाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरू शकते. राजकीय विश्लेषकांच्या मते, उद्धव आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याने मराठी मतांमध्ये मोठी फाळणी टळणार आहे. यामुळे शिवसेना आणि मनसे यांच्या समर्थकांमध्येही उत्साहाचं वातावरण आहे.
👉मराठी जनतेला आवाहन
या सभेत मराठी भाषा, संस्कृती आणि महाराष्ट्राच्या हक्कांसाठी लढण्याचा संदेश देण्यात आला. उद्धव ठाकरे यांनी मराठी जनतेला आवाहन केलं की, “आपण एकजुटीने लढलो तर कोणताही अडथळा आपल्याला रोखू शकत नाही.” त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख करताना म्हटलं, “आमच्या आजोबांनी भोंदूपणाविरोधात लढा दिला, आणि त्याच विचारांना पुढे नेण्यासाठी आम्ही एकत्र आलोय.”
ठाकरे बंधूंच्या या ऐतिहासिक एकजुटीने महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या युगाची सुरुवात झाली आहे. मराठी अस्मितेचा जागर करताना सत्ताधाऱ्यांना आव्हान देणारी ही एकजूट आगामी काळात काय परिणाम घडवून आणेल, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. मराठी जनतेसाठी हा क्षण निश्चितच प्रेरणादायी आहे, आणि यामुळे राज्याच्या राजकारणात नवं पर्व सुरू होण्याची शक्यता आहे.

🟥जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं.- राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण
मुंबई :- प्रतिनिधी.

महाराष्ट्राच्या आजचा दिवस मैलाचा दगड ठरला आहे. तब्बल 20 वर्षांनंतर ठाकरे बंधू – उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे – मराठी भाषा आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी एकाच व्यासपीठावर एकत्र आले आहेत.वरळी येथील एनएससीआय डोम येथे आयोजित विजय सभेत मराठी एकतेचा विजय साजरा होत आहे.त्रिभाषा सूत्राच्या अंमलबजावणीविरोधात ठाकरे बंधूंनी एकजुटीने आवाज उठवला, आणि त्यांच्या दबावामुळे महायुती सरकारने हा निर्णय रद्द केला. या सभेकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे, कारण यातून नवीन राजकीय समीकरणाची सुरुवात होईल का, याची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फणवीसांना टोला लगावला.
🟣त्रिभाषा सूत्राला तीव्र विरोध
मराठी भाषेच्या रक्षणासाठी ठाकरे बंधूंनी त्रिभाषा सूत्राला तीव्र विरोध केला होता. या सूत्रानुसार, शाळांमध्ये मराठीसह हिंदी आणि इंग्रजीच्या सक्तीमुळे मराठी भाषेच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.
राज ठाकरे यांनीही सरकारला कडक इशारा दिला, “तुमच्या हातात सत्ता असेल ती विधानभवनात, पण आमच्याकडे सत्ता आहे रस्त्यावर!” या एकजुटीमुळे महायुती सरकारला माघार घ्यावी लागली, आणि त्रिभाषा सूत्राचा निर्णय तूर्तास स्थगित करण्यात आला. ही घटना मराठी भाषिकांसाठी मोठा विजय मानली जात आहे.
🔴राजकीय पक्षाचा झेंडा नाही
वरळी येथील एनएससीआय डोम येथे आयोजित विजय सभेचा मुख्य उद्देश मराठी भाषा आणि संस्कृतीचा गौरव करणे हा आहे. या सभेला कोणत्याही राजकीय पक्षाचा झेंडा नसेल, फक्त मराठी हाच अजेंडा असेल, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. “कोणत्याही भांडणापेक्षा आणि वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे,” असे सांगत त्यांनी मराठी एकतेचा संदेश दिला.
🅾️कोणत्याही भांडणापेक्षा आणि वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. आम्ही २० वर्षांनी कोणत्याही व्यासपीठावर एकत्र येत आहोत. जे माननिय बाळासाहेबांना जमलं नाही, अनेकांना जमलं नाही, आम्हाला एकत्र आणायचं ते फडणवीसांना जमलं, असा टोला राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला.