पंतप्रधान किसान सन्मान निधी. –
लवकरच 8 व्या हप्ता.
नवी दिल्ली : वृत्तसंस्था.
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजने अंतर्गत केंद्र सरकार दरवर्षी देशातील शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांची आर्थिक मदत करते. आतापर्यंत केंद्र सरकारकडून एकूण 7 हप्ते थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर हस्तांतरित करण्यात आले आहेत. आता लवकरच 8 व्या हप्ता देखील पाठवला जाणार आहे. अश्या परिस्थितीत आपण अद्याप स्वत:या योजनेत नोंदणी केली नसेल तर ताबडतोब करा, जेणेकरून तुम्हाला या योजनेचा फायदा घेता येईल….
याप्रकारे तपासा आपले नाव-
- प्रथम आपल्याला पंतप्रधान किसान योजनेच्या https://pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.त्याच्या मेनपेजवर आपल्याला Farmers Corner चा पर्याय दिसेल.
- Farmers Corner विभागात तुम्हाला Beneficiaries List च्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
- त्यानंतर तुम्हाला ड्रॉप डाऊन यादीतून राज्य, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक आणि गाव निवडावे लागेल.
- यानंतर तुम्हाला गेट रिपोर्टवर क्लिक करावे लागेल.
- यानंतर लाभार्थ्यांची संपूर्ण यादी समोर येईल. ज्यामध्ये आपण आपले नाव तपासू शकता.
अशा प्रकारे करू शकता नोंदणी-
- तुम्हाला प्रथम पीएम किसानच्या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल.
- आता Farmers Corner वर जा.
- येथे तुम्ही ‘ New Farmer Registration ‘ या पर्यायावर क्लिक करा.
- यानंतर आधार क्रमांक प्रविष्ट करावा लागेल.
- यासह, कॅप्चा कोड प्रविष्ट करुन राज्याची निवड करावी लागेल आणि त्यानंतर प्रक्रिया पुढे करावी लागेल.
- या फॉर्ममध्ये आपल्याला आपली सर्व वैयक्तिक माहिती भरावी लागेल.
- तसेच बँक खात्याचा तपशील आणि फील्डची माहिती भरावी लागेल.
- यानंतर आपण फॉर्म सबमिट करू शकता.
कधी पर्यंत मिळणार 8 वा हप्ता ?
केंद्र सरकार एप्रिल महिन्यापासून 8 वा हप्ता सोडायला सुरूवात करेल, अशी शक्यता आहे. दरम्यान, सरकारकडून याबाबत कोणतीही ठोस माहिती देण्यात अली आहे. लहान आणि सीमांत शेतकर्यांना या योजनेतील आठवा हप्ता होळीनंतर मिळू शकेल. या योजनेंतर्गत एप्रिल ते जुलै दरम्यान एक हप्ता, ऑगस्ट ते नोव्हेंबर दरम्यानचा दुसरा हप्ता व डिसेंबर ते मार्च दरम्यान वर्षाचा तिसरा हप्ता येऊ शकेल. डिसेंबर-मार्च 2020-21 पर्यंत आतापर्यंत 9.45 कोटी शेतकर्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे.
पंतप्रधान किसान सन्मान निधी अंतर्गत केंद्र सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना सहा हजार रुपये देते. यामागे सरकारचे उद्धिष्ट शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे आहे, म्हणून केंद्र सरकार पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करते. सरकार एका वर्षामध्ये 3 हप्त्यात हे सहा हजार रुपये देते. एक हप्ता 4 महिन्यांत येतो. प्रत्येक हप्त्यात 2 हजार रुपये दिले जातात. दरम्यान, जर शेतजमिनीचा मालक शासकीय कर्मचारी असेल किंवा त्याने सेवानिवृत्ती घेतली असेल तर त्याला या योजनेचा लाभ मिळणार नाही. तसेच नव्या नियमानुसार जर शेतकर्याच्या नावे शेती नसेल तर त्याला या योजनेचा लाभ मिळणार नाही. शेती त्यांच्या वडिलांच्या किंवा आजोबांच्या नावावर असली तरीदेखील तो या योजनेस पात्र ठरणार नाही.