Homeकोंकण - ठाणेशिरोळ तालुक्यातील सैनिक टाकळीवाडीतील.- शहिद प्रशांत निर्मळेना शासकीय इतमामात आदरांजली.

शिरोळ तालुक्यातील सैनिक टाकळीवाडीतील.- शहिद प्रशांत निर्मळेना शासकीय इतमामात आदरांजली.

शिरोळ तालुक्यातील सैनिक टाकळीवाडीतील.- शहिद प्रशांत निर्मळेना शासकीय इतमामात आदरांजली.

शिरोळ. प्रतिनिधी.२९


शिरोळ तालुक्यातील सैनिक टाकळीवाडी येथील शहिद प्रशांत निर्मळे यांना शासकीय इतमामात आदरांजली देण्यात आली. ते ७ महार रेजिमेंट मध्ये सन २००१ मध्ये भरती झाले होते. जन्म दि १२/११/१९८२ रोजी सैनिक टाकळीवाडी या गावी अंतिम विदाई देण्यात आली प्रशांत हे सागर,मध्यप्रदेश येथे ट्रेनिंग पूर्ण त्यानंतर देशसेवेत रुजु द्रास,सियाचीन ,भूतान,बिनगुडी, हैदराबाद, राजस्थान,पंजाब येथे सेवा
सध्या फिरोजपुर,पंजाब येथे सेवेत होते,
९ महिन्यानंतर गावी सुट्टीवर येत असताना २५ जुलै रोजी शहिद झाले.
आज २९ जुलै रोजी संपूर्ण पंचक्रोशीतील गावांनी साश्रू नयनांनी अंतिम विदाई दिली,फुलांचा वर्षाव करत व देशभक्तीपर गीते लावून आणि गावातून मिरवणूक काढून काढत, सर्व गावात आज दुखावटा पाळण्यात आला सर्व दुकाने व कामकाज बंद ठेवून शाहिदाचा सन्मान करण्यात आला. संपूर्ण गावात रोडवर रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या.हवेत बंदुकीच्या फायरी करून सलामी दिली.
लहानापासून वृद्धपर्यंत सर्व नागरिक रस्त्याच्या दुतर्फा उभी होती. नामदार राजेंद्र पाटील यांनी शासकीय प्रतिनिधी म्हणून शाहिद प्रशांत निर्मळे यांना पुष्प अर्पण केले तसेच खासदार धैर्यशील माने यांनीही कुटुंबाचे सांत्वन केले. तर टाकळीवाडी परिसरातील सर्व ग्रामस्थ नेते मंडळे
अमर रहे अमर रहे हवालदार प्रशांत चंद्रकांत निर्मळे अमर रहे. या जयघोषात जवान प्रशांत निर्मळे यांना अंतिम विदाई
त्यांच्या पश्चात दोन लहान मुली,पत्नी व वडील आणि भाऊ असा परिवार आहे.
यावेळी पंचायत समितीचे सभापती, उपसभापती, पोलिस स्टेशनचे पी. आय., तहसिलदार, महसूल विभागाचे कर्मचारी, ग्रामपंचायतचे सरपंच उप. सरपंच, सदस्य सर्व ग्रामस्थ निर्मळे परिवाराच्या दुःखात सहभागी झाले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.