Homeकोंकण - ठाणेडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आजरा खेडे येथे विविध उपक्रम

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आजरा खेडे येथे विविध उपक्रम

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आजरा खेडे येथे विविध उपक्रम

आजरा ( प्रतिनिधी.)

खेडे (ता. आजरा) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अत्यंत उत्साही वातावरणात विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांनी साजरी करण्यात आली. भीम गर्जना कला क्रीडा सांस्कृतिक तरुण मंडळ आणि ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज, गौतम बुद्ध, महात्मा जोतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
आजरा तालुक्यातील देवर्डे या गावात पहिल्यांदा बौद्ध धम्म स्वीकारलेल्या गावातून आणलेल्या धम्मज्योतीचे स्वागत करून, तिची आणि सर्व महामानवांच्या प्रतिमेची गावातून मिरवणूक काढण्यात आली. प्राथमिक विद्यामंदिरापासून ते समाजमंदिरापर्यंत निघालेल्या भव्य मिरवणुकीत लेझीम, झांज पथक, तसेच पारंपरिक दांडपट्टा कलेचे सादरीकरण करण्यात आले. ही मिरवणूक ग्रामस्थांसह सर्व नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागाने जल्लोषात पार पडली. अशोक कांबळे, युवराज कांबळे, रवींद्र कांबळे, रमेश कांबळे, विलास कांबळे, दीपक कांबळे, प्रकाश कांबळे, किरण कांबळे, सुरेश कांबळे, आनंद कांबळे, विकास कांबळे, अनिल कांबळे, बबन कांबळे, नागेश कांबळे, विष्णू कांबळे, सुधीर कांबळे, केरबा कांबळे, सुभाष कांबळे, राहुल कांबळे, विजय कांबळे, शिवराम कांबळे आदी सहभागी झाले होते.

दरम्यान, सकाळी सर्व महामानवांच्या प्रतिमांचे पूजन करून, बुद्ध वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी प्रवीण कांबळे, अनुराग कांबळे, सुरज कांबळे, योगेश कांबळे, किरण कांबळे, प्रतीक कांबळे, सुमित.कांबळे, सुधीर कांबळे, रोहन कांबळे, रूपक कांबळे, परसू कांबळे, नेताजी कांबळे, गौतम कांबळे, सचिन कांबळे, मिथुन कांबळे, बाबासाहेब कांबळे, आकाश कांबळे, राकेश कांबळे यांच्यासह ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौकट

भारतीय संविधानाचे घरोघरी वाटप

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा खरा सन्मान म्हणजे त्यांचे विचार घरोघरी पोहोचवणे, हे तत्व लक्षात घेऊन मुंबई उच्च न्यायालय आणि पुणे जिल्हा न्यायालयातील प्रसिद्ध वकील ॲड. गायत्री धनाजी कांबळे यांच्या वतीने भीमनगरमध्ये घरोघरी भारतीय संविधानाचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाला महिलांकडून विशेष प्रतिसाद मिळाला. “आम्हाला बाबासाहेबांनी लिहिलेले संविधान हवे होते, ते आता आमच्या घरात आहे याचा आम्हाला अभिमान वाटतो,” अशी भावना अनेक महिलांनी व्यक्त केली. यावेळी गावचे सरपंच डॉ. संदीप देशपांडे आणि ग्रामपंचायतीला देखील संविधान भेट देण्यात आले.
“भारतीय संविधान हा केवळ कायद्याचा ग्रंथ नसून, ती आपल्या लोकशाही जीवनशैलीची आधारशिला आहे. प्रत्येक तरुण-तरुणीने घरातील सदस्यांना संविधानातील मूलभूत हक्क, अधिकार आणि कर्तव्ये समजावून सांगणे हे अत्यंत आवश्यक आहे,” असे ॲड. गायत्री कांबळे यांनी सांगितले.
घरघर संविधान या उपक्रमांमधून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि लोकशाही मूल्ये ग्रामीण समाजाच्या मनामनात रुजवण्याचा ठोस प्रयत्न होणे आवश्यक आहे. अशा उपक्रमातून भविष्यातील प्रगल्भ, सजग आणि संविधानवादी नागरिक घडविण्याची जबाबदारी सर्वांची आहे, असेही ॲड. गायत्री कांबळे म्हणाल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.