इंडीयन आर्मी पदावर हवालदार पदावर असणारे जवान श्री प्रशांत निर्मळे. शहीद.-सैनिक टाकळीवाडीत शोककळा.
इचलकरंजी. प्रतिनिधी.२९
मु पो सैनिक टाकळीवाडीचे सुपुत्र तथा इचलकरंजी स्थित इंडीयन आर्मीमध्ये हवालदार पदावर असणारे जवान श्री प्रशांत निर्मळे हे दिनांक २५ जुलै २०२१ रोजी शहीद झाले
त्यांना भावपुर्ण आदरांजली
श्री प्रशांत निर्मळे यांचा जन्म टाकळीवाडी या गावी दि. १२/११/१९८२ रोजी झाला. त्यांच्या पित्याचे नाव श्री चंद्रकांत निर्मळे व आईचे नाव लक्ष्मी निर्मळे,
त्यांना जन्मच सैनिक टाकळीवाडी या गावी झाला. संपुर्ण भारतात एक सैनिकांचे गाव अशी ओळख असणाऱ्या गावी त्यांचा जन्म झाला त्यामुळे जन्मापासूनच त्यांच्यावर देशसेवेचे संस्कार घरातून झाले. त्यांचे आजोबा श्री रावजी निर्मळे हे सैन्यात होते त्यानंतर त्यांचे चुलते रमेश निर्मळे हे कॅप्टन पदावरून सैन्यात सेवा बजावून निवृत्त झाले.
घरची परिस्थिती बेताचीच असल्याने त्यांनी कमवा व शिका या धोरणाचा अवलंब करून आपले शिक्षण पूर्ण केले त्यानंतर त्यांनी आपले शिक्षण १२ वी पर्यंत पूर्ण करून इंडियन आर्मीमध्ये ७ महार रंजिमेंट मध्ये सन २००१ मध्ये रुजू झाले.
श्री प्रशांत निर्मळे यांचे पहिली ते चौथी पर्यंतचे शिक्षण कुमार विद्या मंदिर टाकळीवाडी येथे झाले पण त्यांचे वडील रत्नाप्पा कुंभार सहकारी सूतगिरणी,यड्राव येथे नोकरीस असल्याने त्यांनी आपले पुढील प्राथमिक शिक्षण पार्वती विद्या मंदीर ,यड्राव येथे पूर्ण केले व माध्यमिक शिक्षण तात्यासाहेब मुसळे हायस्कुल येथे झाले व उच्च माध्यमिक शिक्षण गोविंदराव हायस्कुल येथे झाले.
अगदी हसतमुख आणि प्रेमळ स्वभावामुळे ते मित्रांच्या गळ्यातील ताईत होते. लहान असो वा थोर यांच्याशी ते प्रेमाने व आपुलकीने वागत असल्याने ते सर्वांचे आवडते होते.त्यांना वीरमरण आल्याचे समजल्याने सर्व वर्गातून हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्यावर शासकीय इतमामात अंतिमसंस्कार दि २९/०७/२०२१ रोजी सकाळी ११.वा. त्यांचा मूळगावी मु पो सैनिक टाकळीवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. वीर जवान तुझे सलाम.
