Homeकोंकण - ठाणेआजरा साखरचा कारभार काटकसरीने व सर्वांच्या विचाराने - नियोजनबद्ध करणार. चेअरमन. प्रा....

आजरा साखरचा कारभार काटकसरीने व सर्वांच्या विचाराने – नियोजनबद्ध करणार. चेअरमन. प्रा. सुनिल शिंत्रे.【 पत्रकार परिषेदेत दिली माहिती. 】

आजरा. प्रतिनिधी.२७

आजरा साखरचा कारभार काटकसरीने व सर्वांच्या विचाराने नियोजनबध्द करणार असल्याचे चेअरमन. प्रा. सुनिल शिंत्रे यांनी पत्रकार परिषद मध्ये माहिती दिली. स्वागत कार्यालयीन अधिक्षक अनिल देसाई यांनी केले. चेअरमन श्री शिंत्रे माहिती देताना पुढे म्हणाले आजरा साखर कारखाना आर्थिक अडचणीमुळे मागील दोन वर्षापासून बंद होता. तर थकीत कर्जापोटी कोल्हापूर जिल्हा बँकेच्या ताब्यात होता. संचालक मंडळाने थकित कर्जासाठी नेतेमंडळी,सहकारी संस्था, यांच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्हा बँकेचे थकीत कर्ज भरून आजरा कारखाना पुन्हा सहकारात आणला कारखाना यापुढे सुरळीत चालण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. गळीत हंगाम २०२१-२२ घेण्यासाठी कामकाज चांगल्या पद्धतीचे नियोजन करून सुरू आहे. सध्या रिक्त असलेली खाते प्रमुख पदे या संचालक मंडळाने भरलेली असून. यामध्ये स्थापनेपासून कारखान्यात कार्यरत असलेल्या जुन्या जाणकार अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. कारखान्याकडील ओव्हर होलीगची सुरू केली असून कारखान्याकडील कायम कर्मचाऱ्यांना दि. १६/७/२०२१ पासून कामावर हजर करून घेतले आहे कारखान्याची जुनी सेंटर ऑफिस सुरुवात करण्यात आली असून तेथे जरूर तो स्टाप ठेवून ऊस तोडणी करण्याचे काम सुरू आहे याबाबत त्यांनी कार्यक्षेत्र आजरा बाहेरील तसेच गडहिंग्लज, चंदगड तालुक्यातील आपल्या कारखान्यात ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांनी कारखान्याकडे उसाचे करार तोडणी वाहतूक यंत्रणा ऊस पुरवठा चा महत्त्वाचा भाग असलेल्या येत्या हंगामासाठी १८० बीड व १२० लोकल अशी ३०० यंत्रणेचे करार करणार असून त्यापैकी आजपर्यंत १४० बीड व ९० लोकल यंत्रणेचे करार पूर्ण झाले आहेत उर्वरित यंत्रणेची नोंदणीही कारखान्याकडे झाली असून या यंत्रणेचे करार पूर्ण झाले आहेत त्यांना ऍडव्हान्स वाटपाचे कामही सुरू झाले आहे तसेच कारखाना कार्यक्षेत्रात चा विचार करता ती अंगत गाड्या ( ट्रॅक्टर गाड्या) चे ही करार करून कार्यक्षेत्रातील ऊस मोठ्या प्रमाणात गळीतीसाठी येण्यासाठी प्रयत्न करणार कारखान्याचे तोडणी वाहतूक करार करणारे बीड व लोकल कंत्राटदारांना त्यांनी सन. २०१८-१९ हंगामातील तोडणी पातळीची बिले घेण्याची आर्थिक नियोजन कारखाने केले आहे कारखान्याचा कारभार काटकसरीने व नियोजनबद्ध सर्वांच्या विचाराने सुरू असून कारखान्याकडे यंत्रसामुग्री ओव्हरहोलींग आवश्यक ती खरेदी करण्यासाठी दैनिक वर्तमान पत्रातील जाहिरातीनुसार आलेल्या कोटेशन धारका बरोबर दोन वेळा चर्चा करून संचालक मंडळ कमीत कमी दराने मटेरियल खरेदीचा प्रयत्न केला असून तशा ऑर्डर ही खरेदीला देण्याचे कामही सुरू आहे. असे शेवटी चेअरमन श्री. शित्रे म्हणाले यावेळी संचालक मुकुंदराव देसाई यांनीही कारखान्याकडील आर्थिक व्यवहाराबाबत कोल्हापूर जिल्हा बँकेच्या लक्ष असून बँकेचे अध्यक्ष ना. हसन मुश्रीफ यांनीही कामकाजाबाबत आम्हा संचालक मंडळांना सक्त सूचना दिलेल्या आहेत. त्यांचे आम्ही काटेकोरपणे पालन करीत आहोत. तालुक्यातील पत्रकारांनी कारखान्याचे कामकाज योग्य ती प्रसिद्धी देऊन सहकार्य केले आहे. येथून पुढे कारखाण्याचे विचारात्मक कामकाजास नियमित प्रसिद्धी देऊन सभासदांचा हा कारखाना पुन्हा सक्षम व्हावा यासाठी सर्वांनी प्रयत्न करूया असे श्री. देसाई यांनी मत मांडले व आभार मानले. या पत्रकार परिषदेस कारखान्याच्या संचालिका अंजनाताई रेडेकर, संचालक मलिककुमार बुरुड, जितेद्र टोपले, दशरथ अमृते कार्यकारी संचालक प्रकाश चव्हाण, अकाउंट सतीश बामणे इत्यादी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.