सर्व श्रमिक संघटना वतीने गिरणी कामगार वारसदार यांचा मोर्चा (चलो गारगोटी चलो गारगोटी.)
आजरा.- प्रतिनिधी.
सर्व श्रमिक संघटना वतीने गिरणी कामगार वारसदार यांचा
पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या कार्यालयावर रविवार दि.२५ रोजी स. ११ वा. १५ मार्च २०२४ रोजीचा जी आर रद्द करा व गिरणी कामगारांना मुंबईमध्ये घरे देऊन पुनर्वसन करा या मागणीसाठी काढण्यात येणार असल्याची माहिती गिरणी कामगार संघटनेचे नेते अतुल दिघे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
आजरा येथे २५ मे रोजी मोर्चा काढण्याची तयारी करण्यासाठी मार्गदर्शन करताना कॉम्रेड श्री. दिघे, कॉम्रेड शांताराम पाटील कॉम्रेड शिवाजी सावंत यांच्या सह मोठ्या संख्येने प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली. जे गिरणी कामगार अपात्र झाले आहेत त्यांना कागदपत्रे मिळविणे बाबत मदत करण्यासाठी भविष्यनिर्वाह निधी कार्यालयात व ESI कार्यालयात मदत करण्यासाठी मदत करा अशी मागणी गिरणी कामगारांच्या वतीने करण्यात आली.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नगरविकासमंत्री आहेत. व पालकमंत्री प्रकाश आबिटकर साहेब यांनी १५ मार्च २०२४ रोजी आर रद्द करून आणावा अशी मागणी करण्यात आली नाम आबिटकर यांनी गिरणी कामगारांच्या मागणीचा सहानुभूतीने विचार करावा व गिरणी कामगारांना मुंबईमध्ये घरे मिळावीत यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे पाठपुरावा करावा या सभेला निवृत्ती मिसाळ गणपत ढोणुक्षे दौलत राणे शांताराम हरेर मनापा बोलके दत्तात्रय होडगे जानबा सावंत हिंदूराव कांबळे अनिता बागवे सुरेखा बागवे नंदा वाकर विठाबाई परीट केरूबाई शिंदे हे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते महादेव होडगे यांनी आभार मानले व २५ मे २०२५ रोजी स. ११ वा. गारगोटी येथे मोठ्या संख्येने उपस्थित रहाण्याचे आवाहन केले जमण्याचे ठिकाण
गारगोटी एस टी स्टॅंण्ड सकाळी अकरा वाजता. अशी माहिती मी कामगार संघटनेकडून देण्यात आली आहे.