🟥आगामी तीन महिन्याचे धान्य 30 जूनपर्यंत उचल करण्याचे आवाहन
🟣नागरी संरक्षण दलास बळकटी देण्यासाठी माजी सैनिकांना स्वयंसेवक म्हणुन नोंदणी करण्याचे आवाहन.
🛑26 मे ते 31 ऑगस्ट दरम्यान जलयानांना बंदी
🟥आगामी तीन महिन्याचे धान्य 30 जूनपर्यंत उचल करण्याचे आवाहन
सिंधुदुर्ग :- प्रतिनिधी.
अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण विभागाच्या आदेशानुसार आगामी पावसाळा, पूर परिस्थिती इत्यादी प्रतिकूल हवामान परिस्थितीमुळे येणाऱ्या अडचणी लक्षात घेता लाभार्थ्यांनी वेळेत अन्नधान्याचे वितरण करण्यासाठी माहे जून, जुलै व ऑगस्ट 2025 चे अन्नधान्याची आगाऊ उचल व वाटप करण्याचे केंद्र व राज्य शासनाचे निर्देश आहेत. तरी पात्र अंत्योदय व प्राधान्य कुटुंबाचे लाभार्थ्यांनी तीन महिन्यांचे धान्य दि. 30 जून 2025 पर्यंत संबंधित रास्त भाव धान्य दुकानदारांकडून उचल करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अनिल पाटील तसेच जिल्हा पुरवठा अधिकारी विजय सहारे यांनी केले आहे.
धान्याची आगाऊ उचल करताना लाभार्थ्यांनी ईपॉस मशीन वर तीन वेळा अंगठा लावून माहे जून, जुलै व ऑगस्ट महिन्यांचे धान्य मिळाल्याची खात्री करावी. लाभार्थ्यांनी लवकरात लवकर धान्य उचल करुन शासनाच्या धोरणात्मक घेतलेल्या निर्णयाची अंमलबलावणी कामात सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी विजय सहारे यांनी केले आहे.
🟣नागरी संरक्षण दलास बळकटी देण्यासाठी माजी सैनिकांना स्वयंसेवक म्हणुन नोंदणी करण्याचे आवाहन
सिंधुदुर्ग :- प्रतिनिधी.
शासनाच्या नागरी संरक्षण संचानालयाच्या 9 मेच्या आदेशानुसार देशातील आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेता नागरी संरक्षण दलास बळकटी देण्यासाठी माजी सैनिकांना स्वयंसेवक म्हणुन नोंदणी, भरती करण्याचे निश्चित आहे. जेणे करुन माजी सैनिकांचा सैन्यातील अनुभवाचा वापर संघटनेला होऊ शकतो आणि त्यामुळे नागरी संरक्षण दलाचे कार्य अधिकच जलद गतीने होण्यास मदत होईल.
जिल्ह्यातील माजी सैनिकांनी त्यांचे सैन्यसेवा पुस्तक, माजी सैनिक ओळखपत्रासह जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सिंधुदुर्ग येथे दिनांक 25 मे 2025 पर्यंत कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष भेट देऊन त्याबाबतचा आपला अर्ज सादर करावा. अधिक माहितीसाठी दुरध्वनी क्र. 02362 228820, 9322051284 वर संपर्क करावा असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी केले आहे.
🟥26 मे ते 31 ऑगस्ट दरम्यान जलयानांना बंदी
सिंधुदुर्ग :- प्रतिनिधी.
Inland Vessel Act, 1917 अंतर्गत नोंदणी झालेल्या सर्व जलयानांना दरवर्षी दि. 26 मे 2025 ते दि. 31 ऑगस्ट 2025 या पावसाळी हंगामात बंदी करण्याबाबत निर्देशित केली असल्याची माहिती प्रादेशिक बंदर अधिकारी, महाराष्ट्र सागरी मंडळ, वेंगुर्ला बंदरे समुह, सिंधुदुर्ग कॅप्टन एस.एस.टी उगलमुगले यांनी दिली आहे.
पावसाळ्याच्या सुरुवाती पासून खराब हंगाम सुरु होणे अपेक्षित असते. त्यामुळे जीवन आणि पर्यावरणाच्या सुरक्षेसाठी Inland Vessel Act, 1917 अंतर्गत नोंदणी झालेल्या सर्व जलयानांना दि. 26 मे 2025 ते दि. 31 ऑगस्ट 2025 या पावसाळी हंगामाच्या कालावधीत वापरास बंदी करण्यास आलेली आहे. तरी सर्व नौका मालकांनी व जलक्रीडा, प्रवासी वाहतूक व्यावसायिकानी नोंद घ्यावी.