Home कोंकण - ठाणे राजशिष्टाचार उल्लंघन प्रकरणी सहाय्यक महसुल अधिकारी एस.पी. हांगे व ग्राम महसुल अधिकारी...

राजशिष्टाचार उल्लंघन प्रकरणी सहाय्यक महसुल अधिकारी एस.पी. हांगे व ग्राम महसुल अधिकारी व्ही. व्ही. कंठाळे या दोघांनाही करण्यात आले निलंबित

Oplus_131072

🟥राजशिष्टाचार उल्लंघन प्रकरणी सहाय्यक महसुल अधिकारी एस.पी. हांगे व ग्राम महसुल अधिकारी व्ही. व्ही. कंठाळे या दोघांनाही करण्यात आले निलंबित

सिंधुदुर्ग :- प्रतिनिधी.

मुख्यमंत्री यांच्या दौऱ्यासाठी संपर्क अधिकारी व शिष्टाचार याप्रमाणे करावयाच्या कार्यवाहीसाठी स्वतंत्र नेमणूक करण्यात आलेल्या होत्या. या नियुक्तीमध्ये एस. पी. हांगे व व्ही. व्ही. कंठाळे यांना कोणतेही आदेश नसताना मुख्यमंत्री यांच्या कार्यक्रम ठिकाणी उपस्थित राहून राजशिष्टाचार आदेशाचे उल्लंघन केले आहे. तसेच राज शिष्टाचाराच्या बाबतीत कोणतीही तरतुदीचे पालन न करता कृती केली आहे. यामुळे महाराष्ट्र नागरी सेवा ( वर्तणूक) नियम 1979 चे उल्लंघन केल्याप्रकरणी या दोघांना निलंबित करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री यांच्या दौऱ्यासाठी संपर्क अधिकारी व राजशिष्टाचाराप्रमाणे करावायाच्या कार्यवाहीसाठी स्वतंत्र नेमणूका करण्यात आल्या होत्या. या नियुक्तीमध्ये नसतांनाही व कोणतेही आदेश नसतांना मुख्यमंत्री यांच्या कार्यक्रम ठिकाणी उपस्थित राहून मुख्यालयी राहण्याच्या आदेशाचे दोघांनी उल्लघंन केले. तसेच राजशिष्टाचार बाबत कोणताही तरतूदीचे पालन न करता कृती केली व महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ नियम ३ चा भंग केल्याप्रकरणी सहाय्यक महसुल अधिकारी एस. पी. हांगे व ग्राम महसुल अधिकारी व्ही. व्ही. कंठाळे यांना निलंबीत करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी मंगळवारी हे आदेश काढले आहेत.

दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी या दोघांनाही निलंबीत केले असून या आदेशात म्हटले आहे की, देशातील युद्धजन्य परिस्थिती पाहता या कार्यालयाकडून आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अंतर्गत दिनांक १ मे २०२५ रोजी आदेश पारित करून, कर्मचारी यांनी पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय मुख्यालय सोडू नये अशा सक्त लेखी सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार या दोघांनी मुख्यालयात उपस्थित राहणे आवश्यक होते. मात्र, मुख्यमंत्री यांच्या दौऱ्यासाठी संपर्क अधिकारी व राजशिष्टाचाराप्रमाणे करावायाच्या कार्यवाहीसाठी स्वतंत्र नेमणूका करणेत आल्या होत्या. या नियुक्तीमध्ये दोघांची ड्यूटी नसतांनाही व कोणतेही आदेश नसतांना उपस्थित राहून आदेशाचे उत्लघंन केलेले आहे. महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ नियम ३ चा भंग केलेला आहे. त्यानुसार वैभववाडी तहसिलदार कार्यालयातील सहाय्यक महसुल अधिकारी एस. पी. हांगे व तहसिलदार कार्यालय मालवणचे ग्राम महसुल अधिकारी व्ही. व्ही. कंठाळे यांना महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ च्या नियम ४ च्या पोट-नियम (१) च्या खंड (अ) च्या तरतूदीनुसार या आदेशाच्या दिनांकापासून ते पुढील आदेश काढले जाईपर्यंत निलंबित करण्यात येत असल्याचे म्हटले आहे.

🛑माजी आमदार वैभव नाईक यांनी काय म्हटले होते.

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रविवार दि.११ मे रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आले होते. ते हेलिकॉप्टर मधून उतरले तेव्हा त्यांचा सत्कार जिल्ह्याचे प्रमुख या नात्याने जिल्हाधिकारी यांनी करणे गरजेचे होते. अथवा महायुतीच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांचा सत्कार केला पाहिजे होता. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच जामिनावर मुक्त असलेल्या दोन लाचखोर तलाठ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार केला होता.या पार्श्‍वभूमीवर माजी आमदार वैभव नाईक यांनी जोरदार टीका करून असे म्हटले होते. की बीडप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातही लाचखोर कमर्चारी सापडत आहेत. या लाचखोर कर्मचाऱ्यांचा नेमका आका कोण असा सवालही या सत्काराच्या निमित्ताने उपस्थित होत असून देवेंद्र फडणवीस यांचे लाचखोर कमर्चाऱ्यांना अभय आहे का? असा सवाल कुडाळ मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित केला होता.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शाल घालून सत्कार करणारे वायंगणीचे तलाठी विठ्ठल वैजीनाथ कंठाळे यांनी २२ मार्च २०२२ रोजी वाळू उपशावर कारवाई न करण्यासाठी तोंडवळी गावातील वाळू व्यवसायिकाकडून २५ हजाराची लाच मागितली होती. तर खरेदी खताची सातबारावर नोंद मंजूर करण्यासाठी २८ फेब्रुवारी २०२१ रोजी कसालचे मंडळ अधिकारी संदीप पांडुरंग हांगे यांनी दहा हजाराची लाच मागितली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोघांनाही लाच घेताना रंगेहात पकडून अटक केले होते. त्यानंतर तलाठी विठ्ठल कंठाळे व मंडळ अधिकारी संदीप हांगे यांना निलंबित करण्यात आले.आता त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे. या दोन्ही तलाठ्यांची अवैध वसुली संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे चौकशी सुरू असून ती चौकशी थांबविण्यासाठीच तलाठ्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती आणि अशा लाचखोर तलाठ्यांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करण्यात आल्याचा आरोप वैभव नाईक यांनी केला होता.त्याचबरोबर अवैध वाळू, सिलिका मायनिंग आणि महसूल विभागांतर्गत कामे करण्यासाठी महसूल यंत्रणेला कोट्यवधी रुपयांचे हप्ते मिळत आहेत.याबाबत आम्ही वारंवार आवाज उठवीत आहोत. मात्र अशा लाचखोर कर्मचाऱ्यांना राजाश्रय देऊन त्यांच्यामाध्यमातून हप्ते वसुली केली जात आहे का असा संशय वैभव नाईक यांनी व्यक्त केला होता.

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.