आजरा तालुका मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ गौतम नाईक यांची निवड.- उपाध्यक्ष पदी डॉ कुलदीप देसाई
आजरा – : प्रतिनिधी.
आजरा तालुका मेडिकल असोसिएशनची सन २०२५-२६ ची कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. यानुसार अध्यक्षपदी डॉ गौतम नाईक, उपाध्यक्ष डॉ कुलदीप देसाई,सेक्रेटरी डॉ बळीराम पाटील, खजिनदार डॉ स्वप्नील कातकर तर प्याथी नुसार आय एम ए च्या अध्यक्षपदी डॉ दिपक सातोस्कर, निमा च्या अध्यक्ष डॉ अंजली देशपांडे, होमिओपॅथी संघटनेचे अध्यक्ष डॉ सुहास गुरव.या सर्व नियुक्त्या आय एम ए चे उपाध्यक्ष डॉ अनिल देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या बैठकीत कऱण्यात आल्या. या प्रसंगी असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ भरत मोहिते, डॉ संदीप देशपांडे, डॉ प्रवीण निंबाळकर, डॉ स्मिता फर्नांडिस असोसिएशन सदस्य डॉ रोहन जाधव डॉ सागर पारपोलकर उपस्थित होते.