Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रआजरा वन विभागाने- वन्य प्राण्यांचा धोका, बेकायदेशीर वृक्षतोड- गांभीर्याने घेणे गरजेचे.- आजरा...

आजरा वन विभागाने- वन्य प्राण्यांचा धोका, बेकायदेशीर वृक्षतोड- गांभीर्याने घेणे गरजेचे.- आजरा मनसेचे निवेदन.

आजरा वन विभागाने- वन्य प्राण्यांचा धोका, बेकायदेशीर वृक्षतोड- गांभीर्याने घेणे गरजेचे.- आजरा मनसेचे निवेदन.

आजरा.- प्रतिनिधी.

वन्य प्राण्याकडून नागरिकांना वाढता धोका, जखमी व मृत्यू , व बेकायदेशीर वृक्षतोड अशा विविध विषयाबाबत आजरा तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि आजरा वन विभागाला निवेदन दिले आहे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

आपल्या आजरा विभागाकडून वन्य प्राणी, यांचा वाढता धोका व बेकायदेशीर वृक्षतोड याबाबत योग्य उपाय योजना होत नाही. याबाबत आपण तात्काळ उपाय योजना कराव्यात. जखमींना व मृतांना योग्य मोबदला हा आपल्याकडून मिळायला हवा पण तसे होताना दिसत नाही. तुटपुंजी मदत जाहीर करून तालुका वासियांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम आपण करत आहात. त्याच सोबत अनेक ठिकाणी गावचे रस्ते हे आपल्या जंगली ह‌द्दीतून जात आहे. त्यामुळे तेथे मोठ्या प्रमाणात अशा घटना घडत आहेत. त्यासोबत लोकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे अशा ठिकाणी आपण रस्त्याच्या आतील बाजूस तारे द्वारे फेन्सिंग करून आपण जनावरांची पाण्याची सोय जंगलामध्येच करावी जेणेकरून है थांबवता येईल अशा प्रकारे अनेक उपाय योजना आपण कराव्यात.
तसेच वरील विषय क्रमांक, नुसार अनेक ठिकाणी अनेक गावाच्या बाजूला वनविभागाच्या हद्‌दीमध्ये अनेक जागा जमिनीमध्ये बेकारीशीर रित्या वनवे लावून जैवविविधता नष्ट करू पाहणाऱ्या काही समाज कंटक आहे त्याच्यावर आपण तात्काळ कारवाई करून कठोर शासन करावे.

तसेच आमच्या निदर्शनास आले की आपल्या वनविभागाच्या ह‌द्दीत जंगलामधील झाडांची बेकायदेशीर रात्री अपरात्री कतल होत आहे. त्यामध्ये आपले कर्मचारी सुद्धा त्यांना पाठबळ देत असल्याचे आमच्या निदर्शनास येत आहे. व ग्रामपंचायतच्या ताब्यात दिलेल्या जंगलाचा काही भाग त्यांची देखील पाहणी आपण वारंवार करावी. तरी सदर प्रकरणाची आपण चौकशी करावी झाडांची कत्तल करून तस्करी करणाऱ्यावर आपणाकडून कायदेशीर कड़क कारवाई करावी. तरी दिलेल्या निवेदनाचा येत्या ८ दिवसात गांभीर्यपूर्वक विचार करून कार्यवाही करावी अन्यथा मनसे स्टाईल निदर्शने खळ खट्‌याक आंदोलन करणेत येतील. याची नोंद घ्यावी. सदर आंदोलनाच्यावेळी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास आपले कार्यालय जबाबदार राहील याची नोंदण घ्यावी. असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
या निवेदनावर त्या. अध्यक्ष आनंदा घंटे, महिला आघाडी ता. अध्यक्ष सरिता सावंत, ता. सचिव वसंत घाटगे, ता. उपाध्यक्ष अॅ. सुशांत पोवार, संतोष शिवगंड सह पदाधिकारी मनसैनिक यांच्या सह्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.