शिव संपर्क अभियनाचा आजरा तालुक्यात शुभारंभ.
आजरा. प्रतिनिधी. १८
आजरा येथील शिवसेना वतीने दि. १८ रोजी शिवसेना शाखेत शिव संपर्क अभियान चा शुभारंभ शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आला यावेळी विजय देवणे बोलताना म्हणाले गाव तिथे शाखा,घर तिथे शिवसैनिक ही संकल्पना राबवून आजरा तालुक्यात शिवसेना प्राथमिक सदस्य नोंदणी उच्चांकी करावी व शिवसेना घराघरात पोहचावी. मा.शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशाने १ ऑगस्ट पासून आठवडा भर माझे गाव – कोरोना मुक्त गाव हे अभियान राबवावे व मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरेसो यांना अपेक्षित प्रत्येक गाव कोरोना मुक्त करावे तसेच आजरा येथील स्थानिक प्रश्नांचा अभ्यास करून ते प्रश्न सोडवणे साठी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेऊन आजरा वासियांना दिलासा द्यावा. यावेळी नूतन जिल्हा परिषद उपाध्यक्ष जयवंत शिंपी व कोरोना योद्धा यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संभाजी पाटील,दीनानाथ चौगुले,राजेंद्र सावंत,युवराज पोवार, दिनेश कुंभीकर
ओंकार माद्याळकर,प्रतीक क्षीरसागर,महेश पाटील.सह पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते.