🔥मुंबईतील धारावीत गॅस सिलेंडर वाहून नेणाऱ्या ट्रकला आग.- सिलेंडरचे एकामागून एक स्फोट.- परिसरात उडाली मोठी खळबळ.
🛑आजरा मनसे व देवर्डे ग्रामस्थांचे बेमुदत ठिय्या आंदोलन दि. ०३ एप्रिल रोजी ( गटविकास अधिकारी यांच्या दालनात.)
मुंबई :- प्रतिनिधी.
मुंबईतील धारावी येथे आगीची मोठी दुर्घटना घडली आहे. सिलेंडर वाहून नेणाऱ्या ट्रकला अचानक आग लागली. यानंतर एकामागे एक सिलेंडरचे स्फोट झाले आहेत. या आगीच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस, अग्निशामक दलाच्या गाड्या आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. सध्या तरी या आगीत कुठल्याची जीवितहानीची माहिती समोर आलेली नाही. पण या गाडीत मोठी वित्तहानी होण्याची शक्यता आहे. धारावी बस डेपोजवळ ही घटना घडली आहे.
परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. बस डेपोजवळच ही घटना घडल्यामुळे परिसरात मोठी वर्दळ असते. तसेच घटना घडली तिथे गाड्यांची पार्किंग होती. त्यामुळे अनेक दुचाकी आगीत जळून खाक झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. या परिसरात धारावीत नो पार्किंग झोन असतानाही धोकादायकरित्या गॅस सिलींडर भरलेल्या गाड्या पार्क करणे बेजबाबदारीचे लक्षण आहे. खासदार वर्षा गायकवाड यांनी अशा प्रकारचे धोकादायक ट्रक येथे नेहमीच येथे पार्क केले जातात. त्यामुळे मुंबईकरांच्या जीवाशी हा खेळ सुरु आहे. पालिकेचे एवढे मोठे बजेट काय कामाचे असा सवाल वर्षा गायकवाड यांनी केला आहे. या सिलींडरच्या स्फोटाने संपूर्ण धारावी परिसरात घबराट पसरली आहे. या स्फोटात अजूनही कोणी जखमी झाले की नाही? याबाबत आपल्याला कल्पना नसल्याचे देखील वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.
🛑आजरा मनसे व देवर्डे ग्रामस्थांचे बेमुदत ठिय्या आंदोलन दि. ०३ एप्रिल रोजी ( गटविकास अधिकारी यांच्या दालनात.)
आजरा.- प्रतिनिधी.
आजरा येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेना व देवर्डे ता. आजरा यांच्यावतीने निवेदन देण्यात आली आहे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. देवर्डे येथील वहीवाट रस्ता प्रकरणी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जि प कोल्हापूर यांनी रस्ता अतिक्रमण दूर करून, रस्ता पूर्ववत करणे संदर्भात निर्णय दिला असताना. प्रशासन व ग्रामपंचायत देवर्डे हे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून, रहिवाशी्यांना वेठीस धरून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू पाहत आहेत. वारंवार पाठपुरावा करून देखील तसेच वरिष्ठ अधिकारी यांनी वारंवार गटविकास अधिकारी यांना सूचना करून देखील त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. त्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेना आजरा व ग्रामस्थ देवर्डे हे बेमुदत ठिय्या आंदोलन दि. ०३ एप्रिल रोजी मा. गटविकास अधिकारी यांच्या दालनात करणेत येत असून सदर आंदोलना दरम्याण काही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेस त्यास प्रशासन सर्वस्वी जबाबदार राहील. असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर आनंदा घंटे, सुशांत पोवार , संतोष शिवगंड, संजय तेजम , अभिजित होडगे ग्रामस्थ व मनसे पदाधिकारी यांच्यासह आहेत.
