Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रशिमगा बहुजनांचा उत्सव पोस्त करण्याची परवानगी मिळावी.- शेतकऱ्यांची मागणी( शुक्रवार दि. २१...

शिमगा बहुजनांचा उत्सव पोस्त करण्याची परवानगी मिळावी.- शेतकऱ्यांची मागणी( शुक्रवार दि. २१ रोजी देणार.- आजरा वन विभागाला निवेदन.)

शिमगा बहुजनांचा उत्सव पोस्त करण्याची परवानगी मिळावी.- शेतकऱ्यांची मागणी
( शुक्रवार दि. २१ रोजी देणार.- आजरा वन विभागाला निवेदन.)

आजरा – प्रतिनिधी.

शिमगा हा आमच्या परिसरातील बहुजनांचा महत्वाचा धार्मिक उत्सव असून पोस्त ही आमची परंपरा आहे. ही परंपरा खंडित होऊ नये यासाठी शिमग्याच्या काळात पोस्त करण्याची परवानगी मिळाली पाहिजे. म्हसोबा, चाळोबा ही आमची दैवते आहेत, त्या दैवतांची ठाणी ही जंगल हद्दीत आहे, या ठिकाणी पूजा अर्चा करण्यास वा जत्रा यात्रा करण्यास मज्जाव केला जात आहे. ही आमची सांस्कृतिक दडपनुक असून त्याला परवानगी मिळाली पाहिजे. याबरोबर हत्ती, गवे, रानडुक्कर, माकड, ससे यासारख्या जंगली प्राण्यापासून शेती पिकाचे होणारे नुकसान टाळण्यासाठी ताबडतोबीने उपाय योजना केली पाहिजे. पिकांची नुकसानभरपाई शंभर टक्के गृहीत धरून भरपाई मिळणे आवश्यक आहे. जंगली जनावरांच्या हल्ल्यात जखमी किंवा मयत झालेल्या शेतकऱ्याला मिळणारी मदत तुटपुंजी असून ती वाढवून मिळाली पाहिजे.जंगलालगतच्या शेतकऱयाला मागेल त्याला शंभर टक्के अनुदानावर सौर ऊर्जेचे कुंपण मिळाले पाहिजे.

शेती सरंक्षणासाठी मागेल त्याला तातडीने बंदूक परवाना दिला पाहिजे यासह अनेक मागण्यांचे निवेदन शुक्रवार दि . २१ रोजी परिक्षेत्र वनाधिकारी आजरा यांना निवेदन देण्यात येणार आहे. तरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी म्हसोबाजवळ ( सुलगाव नर्सरी ) शुक्रवारी ठीक ११.०० वाजता मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. असे आवाहन कॉ संपत देसाई, संजय सावंत, कॉ शांताराम पाटील, रवींद्र भाटले, संजय घाटगे, संजय तरडेकर, दशरथ घुरे, राजू होलम, बयाजी येडगे, नामदेव गुरव, मारुती पाटील, भीमराव माधव यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.