Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा आजरा.- वतीने उद्या मंगळवार दि. १८ रोजी जागतीक...

ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा आजरा.- वतीने उद्या मंगळवार दि. १८ रोजी जागतीक ग्राहक दिनानिमित्त बैठक.🛑पारंपारिक सणांचे अवचित पण जपताहेत लोककलेची परंपरा आजची पिढी…

🛑ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा आजरा.- वतीने उद्या मंगळवार दि. १८ रोजी जागतीक ग्राहक दिनानिमित्त बैठक.
🛑पारंपारिक सणांचे अवचित पण जपताहेत लोककलेची परंपरा आजची पिढी…

आजरा.- प्रतिनिधी.

ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा आजरा यांचे कडून सर्व ग्राहकांनी उद्या मंगळवार दि. १८ रोजी जागतीक ग्राहक दिन कार्यक्रम तहसीलदार समीर माने यांचे अध्यक्षतेखाली तहसील कार्यलय आजरा येथील पहिला मजला मिटींग हॉल मध्ये आयोजीत केला आहे. तरी आजरा तालुक्यातील सर्वच ग्राहकांनी आपले हक्क अधिकार समजून घेणेसाठी व आपले कांही मुद्दे किंवा आपली फसवणूक झाली असेल किंवा आपले काम कोणी टाळाटाळ करत असतील त्याबाबत सुचना मार्गददर्शन मिळणार आहे. याबाबत आपले कोणत्याही विभागाकडून / दुकानदार / रेशन / पंचायतसमिती / तहसील कार्यालय / एस टी महामंडळ / आरोग्य / कृषी विभाग / उपअभियंता बांधकाम / सहाय्यक निबंधक / भुमी अभिलेख [मोजनीखाते ] / इंडीयन / एच. पी. गॅस आणि इतर सर्व विभागातील असलेले कांही मुद्दे असतील ते घेऊन ठीक ११ वा. उपस्थित राहून ग्राहकांचे हक्क अधिकाराबाबत जागृत राहुया व ग्राहक दिन साजरा करूया या कार्यक्रमाला सर्व विभागातील प्रमुख अधिकारी उपस्थित प्रमुख राहणार आहेत. तरी ग्राहक पंचायत दिनाच्या कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित राहून आपल्या समस्या मांडाव्यात असे आवाहन समितीचे अध्यक्ष यांनी केले आहे.

🛑पारंपारिक सणांचे अवचित पण जपताहेत लोककलेची परंपरा आजची पिढी…..

आजरा.- प्रतिनिधी.

Oplus_131072

कोकण भागातसह आजही होळीनंतर दुसऱ्या दिवशी खेडोपाड्यातील मुले, वृद्ध वेगवेगळी सोंगे घेऊन पारंपरिक वाद्यावर गाणी म्हणून नाचत खुशाली, दक्षिणा मागण्याची परंपरा आहे.बाजारपेठेतील दुकानातून प्रत्येक दुकानासमोर आपली कला सादर करून जी खुशाली देतील ती घेऊन पुढच्या दुकानात जायचं. अशी रीत आहे.


आजच्या डिजिटल आणि आधुनिक युगात या सगळ्या प्रथा परंपरा लोप पावत आहेत. पूर्वी घोंगड्यापासून अस्वलाचे रूप घेऊन अस्वलाचा खेळ करणे, रामायण महाभारतातील पात्रांची वेशभूषा करून लोकांचे मनोरंजन करणे, लेझीम पथक घेऊन लेझीम खेळणे, वेगवेगळी प्राचीन गिते गाऊन ढोलकी, डफ, टाळ वाजवणे. अशा अनेक प्रकारची मनोरंजनाची साधने घेऊन खेड्यापाड्यातून आजऱ्यात येत होती.

Oplus_131072

परंतु आता काळ बदलला, मनोरंजनाची साधने बदलली तशी आजच्या पिढीने या पारंपरिक लोक कलेकडेही पाठ फिरवली. अशातच एरंडोळ ता. आजरा येथील पंच्याहात्तरीला पोहचलेल्या वृद्धानी युवकांनाही लाजवेल अशा प्रकारचे नृत्य केले. “जय जयता गडी जयता “या पारंपारिक गीताबरोबरच आपली नृत्य कलाही दाखवली. यावेळी शंकर कुंभार म्हणाले कि, आता पंच्याहत्तरीला पोहचलोय गुडघे साथ देत नाहीत परंतु अशा सणा सुदीत आम्ही मैदानात उतरलो कि परत जोश येतोय. गुडघे बिडघे कशाचीही पर्वा राहत नाही. आताच्या मुलांनी या कले कडे पाठ फिरवली असल्याबद्दल खंतही त्यांनी व्यक्त केली. यावेळी शंकर परीट, शंकर कुंभार, बाळू सावंत, शंकर होलम, तुकाराम परीट, मारुती उपळकर, एकनाथ पाटील, सीताराम दारुटे, शंकर कुरळे, गंगाराम सोले, अनिकेत हजाम, र वळू पाटील आदिजणांनी भाग घेतला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.