Homeकोंकण - ठाणेमहिलांना आपल्या सोबत सामावून घेऊन विकास साधला पाहिजे.- लाडक्या बहिणींना २१०० रुपये...

महिलांना आपल्या सोबत सामावून घेऊन विकास साधला पाहिजे.- लाडक्या बहिणींना २१०० रुपये देणार.- नाम. हसन मुश्रीफ( चिमणे येथे जागतिक महिला दिनानिमित्त महिला मेळावा संपन्न.)

महिलांना आपल्या सोबत सामावून घेऊन विकास साधला पाहिजे.- लाडक्या बहिणींना २१०० रुपये देणार.- नाम. हसन मुश्रीफ
( चिमणे येथे जागतिक महिला दिनानिमित्त महिला मेळावा संपन्न.)

आजरा.- प्रतिनिधी.

जागतिक महिला दिनानिमित्त श्री विठ्ठल सह. दुध संस्था चिमणे आयोजित महिला बचत गट मेळावा व के. डी. सी. सी. बँक मायक्रो ए. टी. एम. सुविधा केंद्र शुभारंभ दि. १५ रोजी चिमणे ता. आजरा येथील विठ्ठल मंदिर येथे संपन्न झाला. एटीएम सुविधा केंद्राचे उद्घाटन वैद्यकीय शिक्षण मंत्री नाम. हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी वसंतराव धुरे होते.

स्वागत व प्रास्ताविक दूध संस्थेचे चेअरमन प्रमोद तारळेकर यांनी केले. यावेळी बोलताना नाम. श्री मुश्रीफ म्हणाले महिलांनी बचत गटांच्या माध्यमातून व्यवसाय करावा निधी कमी पडू दिला जाणार नाही.‌ के. डी. सी. सी बँकेच्या माध्यमातून सर्वांना सेवा सुविधा देऊ लाडक्या बहिणीच्या महिलांना मागील अनेक वर्षापासून चुल व मूल यामध्ये ठेवले गेले त्यामुळे त्या स्वतःच्या विकासापासून वंचित राहिल्या परंतु अशा खंडातील सर्व देशांना काही कालावधीनंतर इतर देशांची प्रगती पाहून समजले महिलांना आपल्या सोबत सामावून घेतले पाहिजेत व याच कालखंडात बांगलादेशचे राष्ट्रपती यांनी महिला बचत गटांचा शोध लावला व जागतिक बँकेच्या माध्यमातून बचत गटांना निधी उपलब्ध करून दिला व आज महिला सक्षमपणे महिला बचत गटात त्याचा माध्यमातून चांगल्या पद्धतीने व्यवसाय करत आहेत. दोन दिवसापूर्वी झालेल्या अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी २४ लाख निधी उपलब्ध करून लखपती दीदी उपक्रम राबवण्याचा अंदाज पत्रकात अंदाज वर्तवला आहे.

Oplus_131072

महिला आरक्षणाच्या माध्यमातून कदाचित येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत देखील महिलांना विधानसभेत स्थान मिळेल परंतु महिलांनी निश्चितपणे महिला बचत गटाच्या माध्यमातून आपले स्थान निर्माण करावे. लवकरच लाडक्या बहिणींना २१ शे रुपये देण्यात येणार आहेत. जरी लाडकी बहीण या योजनेमुळे ४६ कोटीच्या उलाढालीमुळे तिजोरीवर परिणाम होत असला तरी. विरोधकांच्या अफवांना बळी पडू नये. आपल्याला दिलेला शब्द पाळला जाईल. शासनाच्या बांबू लागवडीत शेतकऱ्यांनी भाग घ्यावा लवकरच याबाबत या संदर्भातील पाठपुरावाटा करून बांबू लागवडी बाबत प्रयत्नशील असल्याचे नाम. श्री मुश्रीफ बोलताना म्हणाले.
यावेळी कागल सरपंच परिषदेच्या सरचिटणीस सौ. गीतांजली पाटील यांनी महिला बचत गट व महिला सबलीकरण याबाबत महिलांना मार्गदर्शन केले. तर टी. एस गडकरी यांनी बांबू लागवड काळाची गरज याबाबत मार्गदर्शन केले.

यावेळी कार्यक्रमाचे आयोजक संस्थेचे व्हा. चेअरमन संतोष आजगेकर, जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई, तसेच काशिनाथ तेली, दीपक देसाई, शिरीष देसाई, मारुती घोरपडे, प्रवीण बोडके, सुनील दिवटे, एच. बी पाटील, बाबासाहेब पाटील, सुनील कांबळे, प्रशांत कांबळे, अनिकेत कोळेकर, सुधीर सावंत, शिवाजीराव नांदवडेकर सह श्री विठ्ठल दूध संस्थेचे सचिव सागर तारळेकर संचालक शिवाजी तवंदकर सुधाकर शिवणे, मडिलगे सरपंच बापू निऊगरे, गोविंद खेडेकर पुंडलिक गुरव, जनार्दन तारळेकर, अलका तारळेकर, दिपाली तारळेकर, हौसाबाई पाटील, गुणवंता हुंचाळे, बचत गटाच्या महिला ग्रामस्थ दूध उत्पादक सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. युवा उद्योजक भूषण नांदवडेकर यांनी आभार मानले.

Oplus_131072

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.