चाफवडे हायस्कूलच्या नुतन इमारत उद्घाटन सोहळा संपन्न’
आजरा.- प्रतिनिधी.
जनता एज्युकेशन सोसायटी, आजरा संचलित ‘चाफवडे हायस्कूत, चाफवडे या शाळेचा नुतन इमारत उद्घाटन सोहळा, चंदगड – विधानसभचे आमदार शिवाजीराव (भाऊ) पाटील यांच्या शुभहस्ते व जनता एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोकआणा चराटी, मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. अनिल देशपांडे, सचिन रमेश अण्णा कुरुणकर संस्थेचे सर्व संचालक याच्या शुभहस्ते संपन्न झाला.
आजरा तालुक्याच्या शैक्षणिक विकासान ‘जनता एज्युकेशन सोसायटीचा महत्वाचा वाटा आहे. इ.स. १९६५ साली स्थापन झालेल्या जनता प्रज्युकेशन सोसायटीने आजरा तालुक्यात आपल्या शैक्षणिक संस्थाचे जाळे निर्माण केले आहे, कै. अण्णा – भाऊ यांच्या अथक प्रयत्नातून या संस्थांचे आज वटवृक्षात रुपातर झाले आहे. ग्रामीण भागातील मुलाच्या शिक्षणाची उत्तम सोय करून ग्रामीण भागाच्या शैक्षणिक वाटचालीला मोठी गती दिली आहे. त्याच प्रयत्नातून आज चाफवडे हायस्कूलच्या नुतन इमारतीचे उद्घाटन संपन्न झाले.

कार्यक्रमाचा उद्घाटन प्रसंगी आम..श्री. पाटील म्हणाले ‘जनता एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष.श्री. चराटी सर्व संचालक यांच्या शैक्षणिक कार्याचे कौतुक केले ग्रामीण भागातील मुलाच्या माध्यमिक शिक्षणाची या शाळेच्या माध्यमातून जी उत्तम सोय केली आहे. याबदल आम. श्री पाटील यांनी जनता एज्युकेशन सोसायटीच्या सर्व संचालकांचे कौतुक केले. तसेच आजरा – चंदगड तालुक्याला औदयोगिक विकास, वाहतूक व दळवळाच्या सुविधा व विकास नक्कीच साधला जाईल याची ग्वाही दिली. कार्यक्रमाला उद्घाटन प्रसंगी मुख्याधापका सौ. मुरुकटे मैडम यांनी प्रास्ताविकातून शाळेला जडणघडणीचा आढावा दिला.
चाफवडे हायस्कूलचे शिक्षक श्री मोहिमे सर यानी आपल्या मनोमातून शाळेला जागा देणारे उत्तम सरदेसाई यांचे आभार मानत नाहीत यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे सर्व संचालक शिक्षक कर्मचारी ग्रामस्थ विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

