Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रमुंबईत दलालांना दणका देण्याची गरज : कॉ. उदय भट{ आजऱ्यात गिरणी कामगारांचा...

मुंबईत दलालांना दणका देण्याची गरज : कॉ. उदय भट{ आजऱ्यात गिरणी कामगारांचा मेळावा. }🛑टोल नाक्याबाबत बैठक घेऊन निर्णय करूना आबिटकर यांचे शिष्टमंडळाला आश्वासन

🛑मुंबईत दलालांना दणका देण्याची गरज : कॉ. उदय भट
{ आजऱ्यात गिरणी कामगारांचा मेळावा. }
🛑टोल नाक्याबाबत बैठक घेऊन निर्णय करू
ना आबिटकर यांचे शिष्टमंडळाला आश्वासन

आजरा.- प्रतिनिधी.

गिरणी कामगार पूर्ण वेळ मुंबईत काम करत असताना संपाच्यावेळी त्यांना मुंबईतून बाहेर हाकलले आणि मुंबईवर दलालांचे राज्य निर्माण झाले. त्यांना दिवसाही स्वप्न पडू लागली. हे बदलण्यासाठी गिरणी कामगारांची संघटना लाल निशान पक्षाने एकजूट केली. आणि त्यांना मुंबईत गिरणीच्या जागेतच घरे मिळण्यासाठी संघटीत करण्यात आले. यासाठी पुढची लढाई म्हणून ६ मार्चला आझाद मैदानात संघर्ष लढा उभा करणार असून मुंबई येथील दलालांना दणका देण्याची गरज निर्माण झाली असल्याचे कॉ. उदय भट यांनी सांगितले. आजरा येथील किसान भवन येथील गिरणी कामगारांच्या मेळाव्यात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.


स्वागत व प्रास्ताविक नारायण भडांगे यांनी केले. यावेळी भट यांनी महाराष्ट्रभर विखुरलेला गिरणी कामगार त्यांच्याच हक्कासाठी एकत्र करण्याचे काम संघटनेने केले असून या संघटनेच्या माध्यमातून गिरणी कामगारांना मुंबईत घर व त्यांची पेन्शन वाढ यासाठी सातत्याने लढाई सुरू असून आत्ताची ही वेळ शासनाला व दलालांना धक्का देण्याची असून सर्व गिरणी कामगारांनी व वारसांनी आझाद मैदानात ताकद दाखविण्याचे आवाहन केले. यावेळी कॉ. अतुल दिघे यांनी गिरणी कामगार हा बेघर नाही किंवा भुमीहिन नाही. त्याने आपल्या श्रमाने मुंबई सोन्याची केली. त्यानांच बेघर समजून हिकडे घर देऊन व तिकडे घर देऊ असे सांगून फसवणूक केली जात आहे. या फसवणूकीला हे गिरणी कामगार भुलणार नसून गिरणीच्या जागेतच घर मिळविल्याशिवाय ही संघटना शांत बसणार नाही. तसेच गिरणी कामगारांना किमान मासिक ९ हजार पेन्शन मिळाली पाहिजे यासाठीच्या लढाईसाठी गिरणी कामगारांनी सज्ज होण्याचे आवाहन केले.
यावेळी कॉ. धोडिंबा कुंभार, कॉ. शिवाजी सावंत, कॉ. शांताराम पाटील, कॉ. दत्तात्रय अत्याळकर यांनी मनोगत व्यक्त केले. या मेळाव्याला नारायण राणे, जयश्री कुंभार, अनिता बागवे, हिंदुराव कांबळे, विठ्ठल बामणे, शिवाजी पोवार, मनाप्पा बोलके, बाबू केसरकर, तुकाराम जाधव यांच्यासह महिला व गिरणी कामगार उपस्थित होते. सूत्रसंचलन कॉ. संजय घाटगे यांनी करून आभार मानले.

🛑टोल नाक्याबाबत बैठक घेऊन निर्णय करू
ना आबिटकर यांचे शिष्टमंडळाला आश्वासन

आजरा – प्रतिनिधी.

संकेश्वर बांदा महामार्गावर आजरा शहरालगत होत असलेल्या टोल नाक्याला तालुका वासीयांचा तीव्र विरोध असून याबाबत अनेक आंदोलनेही झाली. जनतेचा विरोध पाहून सर्वच राजकीय पक्षांचे पुढारी या आंदोलनात सहभागी झाले होते. ना प्रकाश आबिटकर यांच्यासह, के पी पाटील, ए वाय पाटील यांच्यासह या दोन तालुक्यातील अनेक नेते सहभागी झाले होते.
यावेळी सर्वच पक्षाच्या नेत्यांनी आंदोलनाला पाठिंबा देत शेवटपर्यंत या लढ्यात राहण्याचे आश्वासन दिले होते. निवडणुकीनंतर राज्यात महायुती सत्तेवरल आल्यानंतर आमदार प्रकाश आबिटकर यांना आरोग्य मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळाल्याने आंदोलकांच्या अपेकशा वाढल्या आहेत. त्यामुळे आज शिष्टमंडळाने आज त्यांची भेट घेतली असता या प्रश्नी आपण लक्ष घालत असून आजरेकराना त्रास होणार नाही असा निर्णय करून घेऊ असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी कॉम्रेड संपत देसाई, परशुराम बामणे, यशवंत Cचव्हाण, पांडुरंग सावरतकर, जावेद पठाण, मयुरेश देसाई इत्यादी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.