Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रआम्हाला मुंबईमध्येच मोफत घरे द्या.- सर्व श्रमिक संघटना.( १७ फेब्रुवारी रोजी मेळावा...

आम्हाला मुंबईमध्येच मोफत घरे द्या.- सर्व श्रमिक संघटना.( १७ फेब्रुवारी रोजी मेळावा यशस्वी करण्याचा निर्धार.- मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन.)🛑श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर आजरा येथे कै. शुभांगी वायंगणकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ नाट्यछटा स्पर्धा संपन्न( प्राथमिक गटात आराध्या गुरव व माध्यमिक गटात रिया पारपोलकर प्रथम.)

🛑आम्हाला मुंबईमध्येच मोफत घरे द्या.- सर्व श्रमिक संघटना.
( १७ फेब्रुवारी रोजी मेळावा यशस्वी करण्याचा निर्धार.- मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन.)
🛑श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर आजरा येथे कै. शुभांगी वायंगणकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ नाट्यछटा स्पर्धा संपन्न
( प्राथमिक गटात आराध्या गुरव व माध्यमिक गटात रिया पारपोलकर प्रथम.)

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा येथील सर्व श्रमिक संघटनेच्या वतीने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे याबाबतचे प्रसिद्धीपत्रक दिले आहे दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. सर्व गिरणी कामगार वारसदार यांची व्यापक बैठकीचे आयोजन केले आहे. जे वारसदार बाहेर रहात असतील त्यांनी आपल्या गावातील संपर्कातील गिरणी कामगारांना वारसदारांना वरील विभागीय सभांना जवळपास सोयीचे असणाऱ्या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करावे मुंबई घडविणाऱ्या गिरणी कामगारांना वांगणी व सेलूची घरे नको आम्हाला मुंबईमध्येच मोफत घरे द्या.

या मागण्यासाठी तिव्र आंदोलन संघटनेच्या वतीने करण्यात येणार आहे. आपण सर्वांनी जवळपास असणाऱ्या आपल्या विभागातील सभांना मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.
या सभांना मार्गदर्शन करण्याकरिता व सद्य परिस्थितीची माहिती देण्याकरिता मुंबईहून सर्व श्रमिक संघटनेचे अध्यक्ष कॉम्रेड उदय भट, कॉम्रेड अतुल दिघे, कॉम्रेड बी के आंब्रे, कॉम्रेड विजय कुलकर्णी, कॉम्रेड दत्तात्रय अत्याळकर येणार आहेत आपण सर्व गिरणी कामगार वारसदार यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. उपस्थित राहावे असे आवाहन आजरा तालुका गिरणी कामगार अध्यक्ष कॉम्रेड शांताराम पाटील यांनी केले यावेळी कॉम्रेड शिवाजी सावंत यांनी सभेला मार्गदर्शन केले व मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन केले आज आजरा येथे संघटनेच्या कार्यालयात प्रत्येक गावातील अध्यक्षांची मिटिंग झाली या मिटींगला नारायण राणे हिंदूराव कांबळे विठ्ठल बामणे बाबु केसरकर गोपाळ रेडेकर मनाप्पा बोलके गणपत ढोणुक्षे शांताराम हरेर आनंदा ढोकरे अर्जुन घेवडे उपस्थित होते सोमवार दि. १७ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रचंड मेळावा यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त केला. या मेळाव्यासाठी सर्व गिरणी कामगार व वारसदार यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सर्व श्रमिक संघटना यांनी केले आहे.

🛑श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर आजरा येथे कै. शुभांगी वायंगणकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ नाट्यछटा स्पर्धा संपन्न
( प्राथमिक गटात आराध्या गुरव व माध्यमिक गटात रिया पारपोलकर प्रथम.)

आजरा.- प्रतिनिधी.

Oplus_131072

श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर कै शुभांगी गजानन वायंगणकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित शालेय नाट्यछटा स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. सुरवतीला कै शुभांगी वायंगणकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन डॉ. अंजनी देशपांडे व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले . या स्पर्धेन प्राथमिक गटात कु. आराध्या दयानंद गुरव – शंकरलिंग विद्यामंदिर मडिलगे तर माध्यमिक गटात कु. रिया संतोष पारपोलकर- आजरा हायस्कुल यांनी प्रथम कमांक मिळविला .

प्राथमिक गटात व्दितीय क्रमांक कु. त्रिशा अतुल पाटील – आजरा हायस्कुल तर तृतीय क्रमांक कु. अव्दिता किशोर खोत – व्यंकटराव हायस्कुल यांना मिळाला. माध्यमिक गटात व्दितीय क्रमांक कु. ओवी विशाल रेळेकर- रोझरी हायस्कूल व तृतीय क्रमांक कु. अन्वी राहूल नेवरेकर – रोझरी हायस्कुल यांना मिळाला. विजेत्या स्पर्धकांना डॉ. अंजनी देशपांडे, वाचनालयाचे अध्यक्ष वामन सामंत व मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. आजरा तालुक्यातील विविध शाळातील ३६ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत उत्स्फुर्त सहभाग घेतला . या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून आय. के. पाटील व मंदार बापट यांनी काम पाहिले. यावेळी ग्रंथालयाचे सहकार्यवाह रविंद्र हुक्केरी, संचालक सुभाष विभुते, विजय राजोपाध्ये, बंडोपंत चव्हाण, गिता पोतदार, सुचेता गडडी, प्रभाकर नेवरेकर, सुनील कांबळे, शंकर चव्हाण, अनिकेत गाडगिळ, गिता तेजम, डॉ. स्वाती गिरी, ग्रंथपाल चंद्रकांत कोंडुसकर, महादेव पाटील, निखिल कळेकर, महादेव पोवार, विविध शाळांचे विद्यार्थी, शिक्षक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थीत होते. कार्यवाह कुंडलिक नावलकर यांनी सुत्रसंचालन केले तर संचालक महंमदअली मुजावर यांनी आभार मानले .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.