Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रवेदनादायी.- आजरा परोली बंधाऱ्यात तिघांचा मृत्यू.

वेदनादायी.- आजरा परोली बंधाऱ्यात तिघांचा मृत्यू.

वेदनादायी.- आजरा परोली बंधाऱ्यात तिघांचा मृत्यू.

आजरा.- प्रतिनिधी.

आज-यापासून जवळच असणाऱ्या चित्रा नदीवरील परोली बंधाऱ्यांमध्ये सुट्टी निमित्त पोहण्यासाठी गेलेल्या तिघांचा आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास बुडून मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या मध्ये अॅड. रोझारीओ अंतोन कुतिन्हो, फिलीप अंतोन कुतिन्हो, लॉईड पास्कोन कुतिन्हो या तिघा कुत्हिनो बंधूंचा समावेश आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की…
कुतीन्हो बांधव ख्रिसमस निमित्त आजरा येथील आपल्या घरी चर्च गल्ली येथे दोन दिवसापासून एकत्र आले होते. आज दुपारी नातेवाईकांच्या साखरपुडा कार्यक्रमातील जेवणानंतर ते सुट्टी निमित्य जवळच असणाऱ्या परोली बंधाऱ्यांमध्ये पोहण्यासाठी मुलाबाळांसह गेले होते.

बंधाऱ्याच्या वरील बाजूस पाणी अडवले असल्याने त्यांचा पाण्यातच बुडून मृत्यू झाला. तातडीने ग्रामस्थांनी अथक प्रयत्न करून तीनही मृतदेह बाहेर काढले आहेत.
मृतांपैकी लॉईड पास्कल कुकिनो हा ३५ वर्षीय विवाहित तरुण असून त्याच्या पैशात पत्नी व लहान मुलगा असा परिवार आहे. तर फिलिप आंतोन कुतिन्हो हा चाळीस वर्षीय विवाहित असून असून तो पुणे येथे नोकरीस आहे. त्याच्या पश्चात पत्नी व दोन मुले आहेत.
अॅडवोकेट रोजारीओ कुतिन्हो हे तिसरे मयत ४८ वर्षीय विवाहित असून त्याच्या पश्चात पत्नी व दोन मुलगे
सदरची वृत्त समजताच आजरा शहरवासीांनी घटनास्थळी प्रचंड गर्दी केली होती. तातडीने स्थानिक तरुणांनी शोध मोहीम राबवून तीनही मृतदेह पाण्याबाहेर काढले.
अधिक तपास आजरा पोलीस करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.