🛑तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत विद्या मंदिर भुदरगड वाण्याचीवाडी, शिवडाव शाळेची उत्कृष्ट कामगिरी
🛑नवी मुंबई महानगर पालिकेतील कामगार शुक्रवारी महापालिकेवर धडकणार.
भुदरगड.- प्रतिनिधी.
कुमार भवन पुष्पनगर येथे पार पडलेल्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत विद्या मंदिर वाण्याचीवाडी शाळेने उत्कृष्ट कामगिरी केली असून पाटगाव केंद्राचे प्रतिनिधित्व केले. काल पार पडलेल्या वरीष्ठ गटामध्ये
आदेश अनिल शिर्के, थाळी फेक- प्रथम क्रमांक
लांब उडी – प्रथम क्रमांक
उंच उडी – द्वितीय क्रमांक
प्रणाली सचिन थवी.
उंच उडी – तृतीय क्रमांक
संग्राम गौतम कांबळे.
६००मी धावणे- तृतीय क्रमांक.
🛑नवी मुंबई महानगर पालिकेतील कामगार शुक्रवारी महापालिकेवर धडकणार.
(समाज समता कामगार संघाच्या नेतृत्वाखाली समान काम समान वेतनासाठी भव्य मोर्चा..)
नवी मुंबई. प्रतिनिधी :- दशरथ कांबळे
नवी मुंबई महानगर पालिकेत तथाकथित कंत्राटी पदधतीवर कार्यरत सुमारे ८५०० कामगारांना माजी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशान्वये नवी मुंबई महानगर पालिकेने २००७ साली स्वीकारलेल्या धोरणानुसार समान काम समान वेतन लागु करून २००७ साली नियुक्त चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यास आज रोजी मिळणारे वेतन तथाकथित कंत्राटी कामगारास मिळावे. ही समाज समता कामगार संघाची प्रमुख मागणी असून या मागणीस अनुसरून मा. कक्ष अधिकारी, नवी २८, नगर विकास (2) यांनी दिनांक २५/९/२०२४ रोजी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या मंजुरीनुसार मा. आयुक्त नवी मुंबई महानगर पालिका यांनी आपल्या स्तरावर निर्णय घेण्याचे आदेश दिले होते.
दिनांक ३०/९/२०२४ रोजी मा. आयुक्तांनी समान काम समान वेतन लागू करणे बाबत अभ्यास करून अहवाल सादर करणे साठी समीतीची स्थापना केली होती. आणि 2 दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.
दिनांक ३.१०.२०२४ रोजी समीती सदस्यासमोर समाज समता कामगार संघटनेच्या वतीने १५ पानी निवेदन देण्यात आले होते. आज रोजी ८५ दिवसांचा काळावधी उलटुनही समीतीने निर्णय घेतलेला नाही. समीती सदस्य जाणुन बुझुन दुर्लक्ष करत आहे. असे संघटनेचे मत आहे. मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या निर्देशानुसार नवी मुंबई महानगर पालिकेने २००७ साली स्वीकारलेल्या धोरणानुसार समान काम समान वेतन लागु करून २००७ साली नियुक्त चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यास आज रोजी मिळणारे वेतन तथाकथित कंत्राटी कामगारास मिळावे.या मुख्य मागणी साठी शुक्रवार दिनांक २७.१२.२०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता समाज समता कामगार संघाच्या नेतृत्वाखाली सर्व कामगारांच्या वतीने बेलापुर रेल्वे स्टेशन,सीबीडी टॉवर नंबर १० समोरील पार्किंग येथे जमून सीबीडी बेलापुर, दिवाळे गाव चौक, लक्ष्मी हॉटेल चौक, क्रोमा शो रूम, किल्ले गावठाण मार्गे नवी मुंबई महानगर पालिका मुख्यालय असा मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात सर्व विभागातील कामगार बहु संख्येने सहभागी होणार आहेत.

