Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रसध्याचे युग हे फसव्या जाहिरातीचे : सी. आर. देसाई( आजरा तहसिलदार कार्यालयात...

सध्याचे युग हे फसव्या जाहिरातीचे : सी. आर. देसाई( आजरा तहसिलदार कार्यालयात ग्राहक दिन संपन्न.)🛑आजरा महाविद्यालयाचा १२ वी वर्गाची पालक-शिक्षक-विधार्थी यांची सहविचार सभा संपन्न.🛑भादवण हायस्कूल भादवण मध्ये राष्ट्रीय गणित दिन विविध उपक्रमांनी साजरा.

🛑सध्याचे युग हे फसव्या जाहिरातीचे : सी. आर. देसाई
( आजरा तहसिलदार कार्यालयात ग्राहक दिन संपन्न.)
🛑आजरा महाविद्यालयाचा १२ वी वर्गाची पालक-शिक्षक-विधार्थी यांची सहविचार सभा संपन्न.
🛑भादवण हायस्कूल भादवण मध्ये राष्ट्रीय गणित दिन विविध उपक्रमांनी साजरा.

आजरा.- प्रतिनिधी.

ग्राहकांना योग्य तो न्याय मिळावा या उदात्त हेतूने १९८४ साली ग्राहक निवारण कायदा करण्यात आला. त्यामध्ये ग्राहकांना डोळ्यासमोर ठेऊन नवनवीन कायद्यात बदल करण्यात आले आहेत. कायद्याने सर्व उत्पादक घटकांना व सेवांना तक्रार निवारण कक्ष स्थापन करणे बंधनकारक आहे. पंरतु सद्याचे युग हे फसव्या जाहिरातीचे असून ग्राहक त्यांच्या अमिषांना व फसव्या जाहिरातीना भुलून अडचणीत येत असल्याचे मत कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते व माजी प्राचार्य सी. आर. देसाई यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नायब तहसिलदार म्हाळसाकांत देसाई होते.
प्रारंभी ग्राहक चळवळीचे प्रणिते बिंदू माधव जोशी यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक पुरवठा विभागाचे अधिकारी संदीप पाटील यांनी केले. यावेळी काशिनाथ मोरे यांनी आर्थिक उलाढालीसाठी ग्राहकांची फसवणूक होऊ नये यासाठी कायदा पारित झाला आहे. हॉटेल व पेट्रोल पंपावर ग्राहकासाठी मोफत पिण्याचे पाणी व शौचालयाची सोय असणे बंधनकारक आहे. आरोग्य विभागातील खाजगी दवाखान्यातील असणारे दर दर्शनी भागात लावले पाहिजे. ग्राहकांची फसवणूक होत असेल तर ग्राहक पंचायत व ग्राहक चळवळीकडे तक्रार दाखल करावी असे त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय मनोगतात देसाई यांनी आजरा तालुक्यातील सर्व विभागातील अधिकाऱ्यांना पत्र देऊनही आजच्या ग्राहक दिनाला उपस्थीत राहिले नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त करून ग्राहक चळवळीला योग्य दिशा देण्यासाठी जानेवारीमध्ये सर्वांच्या उपस्थितीत ग्राहक मेळाव्याचे नियोजन करण्याचे आश्वासन दिले. यावेळी कॉ. शांताराम पाटील, अजय देशमुख आमानुल्ला आगलावे यांनी वेगवेगळ्या सूचना व तक्रारी उपस्थित केल्या. यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायत तालुकाध्यक्ष रामदास चव्हाण, ग्राहक कल्याण फौंडेशनचे तालुकाध्यक्ष बंडोपंत चव्हाण, ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे तालुकाध्यक्ष महादेव सुतार व संजय येसादे यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी अखिल भारतीय वारकरी मंडळाचे तालुकाध्यक्ष गौरव सुतार, कॉ. संजय घाटगे, व्ही. डी. जाधव, सुमन कांबळे, शिवाजी इंजल, सुभाष मोरजकर, नारायण भडांगे, जालंदर कांबळे, यशवंत दोरूगडे, संभाजी गुरव यांच्यासह ग्राहक पंचायतीचे पदाधिकारी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. तलाठी वंदना शिंदे यांनी सूत्रसंचलन व आभार मानले.

🛑आजरा महाविद्यालयाचा १२ वी वर्गाची पालक-शिक्षक-विधार्थी यांची सहविचार सभा संपन्न.

आजरा.- प्रतिनिधी.

Oplus_131072

आजरा महाविद्यालय कनिष्ठ विभागातील १२ वी वर्गातील विद्यार्थी – पालक व शिक्षक यांची कॉपीमुक्त व भयमुक्त परीक्षा अभियानांतर्गत सह‌विचार सभा संपन्न झाली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महा‌विद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए.एन. सादले होते.
कॉपीमुक्त वभयमुक्त परीक्षा घेणे हे एच.एस.सी. विभागीय बोर्ड, कोल्हापूरचे मुख्य उद्दिष्ट आहे. त्यामुळे कॉफीचा अवलंब परीक्षेत करू नये. बोर्डाने परीत विद्यालयीनी कॉपी करेल्यास कडक शिक्षेची तरतूद केली आहे.
त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यास करूनच परीक्षेला सामोरे जावे गैरमार्गाचा अवलंब केल्यास तो घातक करू शकतो. असे मत उपप्राचार्य दिलीय संकपाळ यांनी बक्त केले व पी. पी सहाय्याने एच एस.सी बोडोची भूमिका स्पष्ट केली. अध्यक्ष स्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ.ए. एन. सादळे म्हणाले परीक्षा जवळ आलेली आलेली असताना
विद्याथ्यांनी अभ्यासापासून परास्त न होता. मनपूर्वक अभ्यास करावा, कठोर परिश्रमातून घेतलेले शिक्षक आपले जीवन उंचावते. लेखनाचा अति सराव करून कृतीपत्रिका सोडविल्यास लेखनाचा वेग वाढेल व वेळेत पेपर पूर्ण होईल. या कार्यक्रमामध्ये पालकांच्या वतीने नाथा देसाई यांनी मौलिक सूचना मांडल्या. यावेळी प्रा श्रीमती आर. एल, राजमले प्रा. जे.एम. गाईगडे, प्रा. सौ एन एस. पेडणेकर प्रा. एस. ए. मोरे प्रा. आर. आर पोवार आदी उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा. पी जी पाटील यांनी केले सूत्रसंचालन प्रा अरुण सुकले यांनी केले. तर आभार प्रा. विनायक चव्हाण यांनी मानले
.

🛑भादवण हायस्कूल भादवण मध्ये राष्ट्रीय गणित दिन विविध उपक्रमांनी साजरा.

आजरा .- प्रतिनिधी.

Oplus_131072


थोर गणित तज्ञ श्रीनिवास रामानुजन जयंती निमित्त भादवण हायस्कूल भादवण येथे गणित विभागाच्या वतीने विविध उपक्रम राबवले गेले. रामानुजन यांच्या प्रतिमेचे पूजन भादवण गावाच्या लोकनियुक्त सरपंच सौ गाडे मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले गणितीय साधनांची मांडणी केलेल्या गणित दालनाचे उद्घाटन ही त्यांच्या हस्ते करण्यात आले . गणितीय मॉडेल इयत्ता नववीचे विद्यार्थी शुभम तोरगले , सृष्टी कोलते, ओमकार उंडगे यांनी तयार केली होती. कार्यक्रमाची सुरवात गणित गीताने झाली . गणित विषयक रांगोळी स्पर्धांचे आयोजन केले होते. इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी उत्साहाने भाग घेऊन रांगोळी द्वारे गणितीय संकल्पना स्पष्ट केल्या . वर्तुळ त्रिकोण ,काटकोन चौकोन, आयत इत्यादी मानवी प्रतिकृती तयार करून मुलांनी माहिती दिली. गणितीय उखाणे, गणित दिनाचे महत्त्व या विषयावर भाषणेही झाली. विद्यार्थ्यांमध्ये गणित विषयाची भीती निघून जावी. गणित विषयाची आवड निर्माण करण्यात यावी या हेतूने गणित विषयाच्या शिक्षिका सौ ए डी पाटील यांनी नियोजन केले. मुख्याध्यापक एस एन पाटील यांनी स्वागत केले व प्रास्ताविक आर पी होरटे यांनी केले. सूत्रसंचालन सृष्टी कोलते हिने केले. आभार सौ बी पी कांबळे यांनी मानले. यावेळी श्रीमती एस एस नाईक, एम एम येलगार, श्री वडर सर, सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. ग्राम विकास अधिकारी श्री देसाई साहेब यांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून कौतुक केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.