Home कोंकण - ठाणे लाडक्या बहिणींसाठी खुशखबर..- अधिवेशननंतर लाडकी बहीण योजनेचा हप्ता देणार.- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

लाडक्या बहिणींसाठी खुशखबर..- अधिवेशननंतर लाडकी बहीण योजनेचा हप्ता देणार.- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत घोषणा.. कधी मिळणार..👇👇🛑कॅन्सरवर लस बनवल्याचा रशियाचा दावा.- पुढील वर्षांपासून रशियातील सर्व नागरिकांना ही लस दिली जाणार मोफत

Oplus_131072

🛑लाडक्या बहिणींसाठी खुशखबर..- अधिवेशननंतर लाडकी बहीण योजनेचा हप्ता देणार.- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत घोषणा.. कधी मिळणार..👇👇

नागपूर :- प्रतिनिधी.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही विधानसभा निवडणुकीत महत्वाचा फॅक्टर ठरली. लाडकी बहिण योजना सुरु राहणार असल्याचे आश्वासन महायुती सरकारने दिले आहे. अशातच या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाखो लाडक्या बहिनींना डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? असा प्रश्न पडला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत विधानसभेत अत्यंत महत्वाची माहिती दिली आहे.
🔴अर्थसंकल्पीय अधिवेशनात पंधराशे रुपयांचे एकविसशे रुपये करणार असल्याचे आश्वासन महायुती सरकारने दिले आहे. विधानसभेच्या पहिल्याच दिवशी नव्या सरकारने लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठा निर्णय जाहीर केला होता. हिवाळी अधिवेशानात लाडकी बहीण योजनेतील अनुदान पंधराशे रुपयांवरुन एकवीसशे रुपये करु असं आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी निवडणूक जाहीरनाम्यात दिलं होतं. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी 35 हजार 788 कोटींच्या पुरवणी मागण्या मांडण्यात आल्या. यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
🟥महायुती सरकारने सुरु केलेली एकही योजना बंद होणार नाही. लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आहे. अधिवेशन संपल्यानंतर लाडक्या बहिणींना डिसेंबरचे पैसे मिळणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृत सांगितले. लाडकी बहिण या योजनेच्या निकषात कोणत्याही प्रकारचे बदल करण्यात आलेले नाहीत. यामुळे ज्यांनी अर्ज केला त्या सर्वांना पैसे मिळणार असल्याचे देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
🔴राज्यात महायुतीचे सरकार येऊन जवळपास महिना झाला. परंतु, अजूनही डिसेंबर महिन्याचा हफ्ता महिलांच्या खात्यात जमा झाला नसून कधी जमा होणार? याकडे राज्यातील महिलांचे लक्ष लागले आहे. विधानसभाआधी महायुती सरकारने लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. यामुळे लाडक्या बहिणींना पुढील हफ्त्यात १५०० मिळतील की १५०० असा प्रश्न पडला आहे. यावर फडणवीस म्हणाले की, डिसेंबरच्या हप्त्यामध्ये मात्र आधीप्रमाणेच १५०० रुपये मिळणार आहेत. अधिवेशन संपल्यानंतर लाडक्या बहिणींना डिसेंबरचे पैसे मिळणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगितले.

🛑कॅन्सरवर लस बनवल्याचा रशियाचा दावा.- पुढील वर्षांपासून रशियातील सर्व नागरिकांना ही लस दिली जाणार मोफत

माँस्को :-वृत्तसंस्था

जगात विविध दुर्धर आजार आहेत. यात कर्करोग हा गंभीर आजार असून जगभरात कॅन्सरग्रस्तांची संख्या वाढत आहे. दरवर्षी लाखों नागरिक या आजाराने जीव गमावत आहेत. मात्र, आता कॅन्सरवर रशियाने रामबाण उपाय शोधला आहे. नागरिकांना कॅन्सरची लागण होऊ नये यासाठी खास कॅन्सरवरील लस रशियन शास्त्रज्ञांनी तयार केली आहे. रशियाच्या आरोग्य मंत्रालयाने या बाबत जाहीर केले असून ही लस पुढील वर्षांपासून देशातील सर्व नागरिकांना मोफत दिली जाणार आहे. रशियन सरकारी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार रशियन आरोग्य मंत्रालयाच्या रेडिओलॉजी मेडिकल रिसर्च सेंटरचे जनरल डायरेक्टर आंद्रे काप्रिन यांनी या बाबत रशियन रेडिओ चॅनेलवर माहिती दिली आहे.
🔴रशियाच्या आरोग्य मंत्रालयाने कॅन्सरची लस विकसित केल्याची घोषणा केली आहे. पुढील वर्षाच्या सुरुवातीला ही लस रशियन नागरिकांना मोफत दिली जाणार आहेत. ही लस कॅन्सररुग्णांना दिली जाणार नसून कॅन्सरपासून लोकांचे रक्षण करण्यासाठी याचा वापर केला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. रशियाच्या आरोग्य मंत्रालयाच्या रेडिओलॉजी मेडिकल रिसर्च सेंटरचे महासंचालक आंद्रे कापरिन यांनी ही माहिती दिली. तथापि, ही लस कोणत्या प्रकारच्या कर्करोगावर उपचार करेल, ती किती प्रभावी असेल किंवा रशिया त्याची अंमलबजावणी कशी करेल? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्याचबरोबर या लसीचे नाव अद्याप समोर आलेले नाही.
🅾️गमालेया नॅशनल रिसर्च सेंटर फॉर एपिडेमिओलॉजी अँड मायक्रोबायोलॉजीचे संचालक अलेक्झांडर गिंटसबर्ग यांनी रशियाच्या ‘तास’ या वृत्तसंस्थेला लसीबाबत माहिती देतांना सांगितले की, या लसीच्या प्री-क्लिनिकल चाचण्या करण्यात आल्या आहेत. या दरम्यान, असे आढळले आहे की ही लस ट्यूमरची वाढ आणि संभाव्य मेटास्टेसिसची वाढ होऊ डेट नाही. यापूर्वी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन म्हणाले होते की, रशियन शास्त्रज्ञ कर्करोगावर लस तयार करण्याच्या जवळ असून ती तयार झाल्यावर लवकरच ही लस नागरिकांना दिली जाणार आहे. ही लस कोणत्या प्रकारच्या कर्करोगावर उपचार करण्यासाठी प्रभावी ठरेल याबद्दल स्पष्टता नाही. याशिवाय या लसीचे नाव अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. इतरही अनेक देश अशाच लसीवर काम करत आहेत. उदाहरणार्थ, यूके सरकारने वैयक्तिकृत कर्करोगाच्या उपचारांसाठी जर्मनीस्थित बायोएनटेकशी करार केला आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.