Homeकोंकण - ठाणेअखेर ठरलं मंत्रिमंडळाचा विस्तार रविवारी.- भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीच्या संभाव्य मंत्र्यांची यादी देखील...

अखेर ठरलं मंत्रिमंडळाचा विस्तार रविवारी.- भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीच्या संभाव्य मंत्र्यांची यादी देखील समोर( 🟥उद्या शपथविधी होणार 👇 )

🛑अखेर ठरलं मंत्रिमंडळाचा विस्तार रविवारी.- भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीच्या संभाव्य मंत्र्यांची यादी देखील समोर
( 🟥उद्या शपथविधी होणार 👇 )

मुंबई :- प्रतिनिधी

महायुती सरकारमधील नव्या मंत्र्यांचा शपथविधी रविवारी 15 डिसेंबरला राज्याची उपराजधानी नागपुरात होण्याची दाट शक्यता आहे. भाजपमधील वरिष्ठ सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार आणि नव्या मंत्र्यांचा शपथविधी नागपुरातच होण्याची दाट शक्यता आहे.हा शपथविधी नागपुरात राज्यपालांचं निवासस्थान असलेल्या राजभवन परिसरात होणार असल्याची माहिती मिळत आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार शपथ घेतल्यानंतर दहा दिवसांनी राज्यातल्या मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे.उद्या (15 डिसेंबर) भाजपचे 21, शिवसेनेचे 12 राष्ट्रवादीचे 10 मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे. उद्या सकाळी 11 किंवा 4 वाजता शपथविधी होईल.

🔴उद्या राज्यमंत्री मंडळाचा विस्तार नागपुरात होणार आहे. याआधी 1991 मध्ये मंत्रिमंडळ विस्तार नागपुरात झाला होता. 1991 ला ज्यावेळी शिवसेना फुटली, त्यानंतर छगन भुजबळ गटाने बंड करत काँग्रेस सोबत शपथ घेतली. 33 वर्षानंतर मंत्रिमंडळ विस्ताराचा कार्यक्रम हा नागपुरात होणार आहे. याचदरम्यान महायुतीच्या संभाव्य मंत्रिमंडळाची यादी समोर आली आहे.

🔴भाजपच्या संभाव्य मंत्र्यांची यादी :-

  1. देवेंद्र फडणवीस
  2. गिरीश महाजन
  3. रविंद्र चव्हाण
  4. मंगलप्रभात लोढा
  5. चंद्रशेखर बावनकुळे
  6. आशिष शेलार
  7. नितेश राणे
  8. शिवेंद्रसिंहराजे भोसले
  9. राहुल कुल
  10. माधुरी मिसाळ
  11. संजय कुटे
  12. राधाकृष्ण विखे पाटील
  13. गणेश नाईक
  14. पंकजा मुंडे
  15. गोपीचंद पडळकर

🟥शिवसेना शिंदे गटाची संभाव्य मंत्र्यांची यादी:-

  1. एकनाथ शिंदे
  2. उदय सामंत
  3. शंभूराजे देसाई
  4. गुलाबराव पाटील
  5. दादा भुसे
  6. प्रताप सरनाईक
  7. संजय शिरसाठ
  8. भरत गोगावले
  9. आशिष जयस्वाल
  10. योगेश कदम
  11. विजय शिवतारे
  12. आबिटकर किंवा यड्रावकर

🅾️अजित पवार गटाच्या संभाव्य मंत्र्यांची यादी:

  1. छगन भुजबळ
  2. आदिती तटकरे
  3. अनिल पाटील
  4. संजय बनसोडे
  5. अजित पवार
  6. मकरंद पाटील
  7. नरहरी झिरवाळ
  8. धनंजय मुंडे
  9. सना मलिक
  10. इंद्रनील नाईक

🔴आश्वसनं दिली, ती पूर्ण करु- देवेंद्र फडणवीस

राज्याला स्थिर सरकार मिळावं अशी जनतेची अपेक्षा आहे. लाडकी बहीण योजना सुरु ठेवणार आहोत, 2100 देखील देणार आहोत, बजेटच्या वेळी त्याचा विचार करु, आर्थिक सोर्सेस योग्य प्रकारे चॅनेलाईज झाल्यानंतर ते करता येतं. जी आश्वासनं दिली आहेत ती पूर्ण करु, निकषात असतील त्यांना लाभ मिळेल, निकषाच्या बाहेरच्या बहिणी मिळाल्या तर त्याचा पूनर्विचार करु, मात्र सरसकट पूनर्विचार करणार नाही, असं देवेंद्र फडवणीस म्हणाले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.