🟥हॅलो, अभिनंदन! – उद्या मंत्रिपदाची शपथ घ्यायचेय.-
खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपमधून मंत्रिपद मिळणाऱ्या आमदारांना करणार फोन
🟥शिंदेंच्या संभाव्य 12 मंत्र्यांची यादी समोर.- बड्या नेत्यांना डच्चू.- नव्या चेहऱ्यांना संधी.. कोण आहेत आमदार उद्याचे मंत्री पहा..👇👇
मुंबई :- प्रतिनिधी.
महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ विस्तारासाठी रविवारचा मुहूर्त निश्चित करण्यात आला आहे. उद्या दुपारी चार वाजता नव्या मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. भाजपमधून मंत्रिपद मिळणाऱ्या आमदारांना खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः फोन करणार असल्याची माहिती मिळत आहे. शपथ घेण्यासाठी उपस्थित राहण्याच्या सूचना मिळाल्यावर यावर अधिकृत शिक्कामोर्तब होणार आहे. यामध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना मंत्रिपदावर स्थान मिळण्याची शक्यता आहे, तर गिरीश महाजन यांना संघटनात्मक जबाबदारी मिळण्याचे संकेत मिळत आहेत.
🔴नागपूर येथील हिवाळी अधिवेशनेच्या पूर्वसंध्येला नागपूरमध्येच मंत्रिमंडळ विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी राजभवनात संपूर्ण तयारी झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपचे सर्वाधिक- २२ मंत्री असतील, तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे १२ आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे १० मंत्री शपथ घेतील. चार ते पाच मंत्री वगळता उर्वरित सर्व मंत्र्यांचा शपथविधी रविवारी पार पडणार आहे. दरम्यान, जुन्या मंत्रिमंडळातील गिरीश महाजन आणि रवींद्र चव्हाण यांच्या जबाबदारीत पक्षवाढीसाठी बदल करण्याचा निर्णय भाजपच्या नेत्यांनी घेतल्याचे समजते.
🅾️गिरीश महाजन यांच्याकडे भाजप प्रदेशाध्यक्षपदाची, तर रवींद्र चव्हाण यांच्याकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची जबाबदारी देण्यात येणार आहे. रात्री उशिरापर्यंत या दोघांचा मंत्रिमंडळात समावेश व्हावा, म्हणून भाजप नेतृत्व दिल्लीतील शीर्षस्थ नेत्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत होते. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात येणार असून, त्यांच्याकडे महसूल विभागाची जबाबदारी देण्यात येणार असल्याची माहिती आहे. गृह मंत्रिपद भाजपकडेच राहणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच ते कायम राहणार असल्याचे कळते.
🟥शिंदेंच्या संभाव्य 12 मंत्र्यांची यादी समोर🛑बड्या नेत्यांना डच्चू.- नव्या चेहऱ्यांना संधी
मुंबई :- प्रतिनिधी
राज्यातील महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अखेर दृष्टीपथात आला आहे.मुंबई किंवा नागपूर येथे महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार सोहळा पार पडणार आहे.त्यापूर्वी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेकडून कोणाला मंत्रिपदाची संधी मिळणार, याची माहिती समोर आली आहे.शिवसेनेला एकूण 9 मंत्रीपदं आणि 3 राज्यमंत्रीपदं मिळणार आहेत. ही यादी जवळपास निश्चित मानली जात आहे. यामध्ये नव्या आणि जुन्या चेहऱ्यांना संधी देऊन एकनाथ शिंदे यांनी योग्य संतुलन राखले आहे.
🔴विशेष म्हणजे शिवसेनेच्या मंत्रिपदाच्या संभाव्य यादीमध्ये गेल्या अडीच वर्षांपासून मंत्रिपदाच्या प्रतिक्षेत असणाऱ्या भरत गोगावले आणि संजय शिरसाट यांचाही समावेश आहे. हे दोन्ही नेते एकनाथ शिंदे यांचा गट भाजपसोबत सत्तेत सामील झाल्यानंतर झालेल्या मंत्रिमंडळात शपथ घेतील, असे सांगितले जात होते. मात्र, तेव्हा इतरांना संधी देण्याच्या नादात या दोन्ही नेत्यांची संधी हुकली होती. त्यानंतर शेवटपर्यंत भरत गोगावले आणि संजय शिरसाट यांची मंत्री होण्याची इच्छा अपुरी राहिली होती. अखेर शेवटच्या काळात या दोन्ही नेत्यांना अनुक्रमे राज्य परिवहन महामंडळ आणि सिडकोचे अध्यक्षपद देऊन एकनाथ शिंदे यांनी त्यांची समजूत काढली होती. मात्र, आता पुन्हा सत्ता आल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी न विसरता गोगावले आणि शिरसाट यांना पहिल्याच मंत्रिमंडळ विस्तारात संधी दिली आहे. याशिवाय, ठाण्यातील शिंदे गटाचे नेते प्रताप सरनाईक आणि पुरंदर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजय शिवतारे या नव्या चेहऱ्यांनाही मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. हे सगळेजण उद्या राजभवनात होणाऱ्या सोहळ्यात मंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतील. या सगळ्यांच्या वाट्याला कोणती खाती येणार, हे बघावे लागेल.
🛑कुणाला मिळणार डच्चू?
दरम्यान, माजी मंत्री तानाजी सावंत, दीपक केसरकर, अब्दुल सत्तार, दादा भुसे, गुलाबराव पाटील आणि संजय राठोड यांना पुन्हा मंत्रिपद देण्यास शिवसेनेतील आमदारांनी विरोध केला होता. या नेत्यांकडे गेल्यावर कामच होत नाहीत. हे नेते केवळ आश्वासनं देतात. प्रत्यक्षात काम होत नसल्याचा आरोप आमदार खासगीत करतात.पण, दादा भुसे, गुलाबराव पाटील या दोन नेत्यांची नावे पुन्हा मंत्रिमंडळाच्या संभाव्या यादीत आहेत. त्यामुळे तानाजी सावंत, दीपक केसरकर, अब्दुल सत्तार आणि संजय राठोड यांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे.
🔴शिवसेनेचे संभाव्य कॅबिनेट मंत्री
🔺एकनाथ शिंदे, उदय सामंत, शंभुराज देसाई, दादा भुसे, प्रताप सरनाईक, संजय शिरसाट, गुलाबराव पाटील, भरत गोगावले
🟥शिवसेनेचे संभाव्य राज्यमंत्री
🔺योगेश कदम, विजय शिवतारे, राजेंद्र पाटील यड्रावरकर किंवा प्रकाश आबिटकर