🟥महायुती आज सत्तास्थापनेचा दावा करणार.- गटनेता निवडीबाबत आज भाजपची बैठक होणार.
🛑हिवाळ्यात पावसाळा.- ‘फेंगल’ चक्रीवादळाचा परिणाम.- मुंबईत पावसाला सुरूवात.- राज्यात पावसाची शक्यता.
🟥पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल यांच्यावर गोळीबार.- बादल थोडक्यात बचावले.- तर हल्लेखोर ताब्यात
🟥मारकडवाडीतील 17 जणांसह 100 ते 200 ग्रामस्थांविरोधात गुन्हे दाखल..
मुंबई :- प्रतिनिधी.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 11 दिवस झाले आहेत. असं असताना अद्यापपर्यंत नव्या सरकारचा शपथविधी झालेला नाही. किंबहुना राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं नाव देखील जाहीर झालेलं नाही. तर आता आज सत्तास्थापनेचा दावा करण्यात येणार आहेत. महायुतीचे महत्त्वाचे नेते सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी राज्यपालांच्या निवासस्थानी जाणार आहेत. भाजपच्या गटनेतेपदी कोण असणार? याबाबतची स्पष्टता झालेली नाही. गटनेतापदी कोण असणार? याबाबत भाजपची आज महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीसाठी भाजपचे निरीक्षक विजय रुपाणी, निर्मला सीतारमण हे कालच मुंबईत दाखल झाले आहेत.
🔴एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात काल ‘वर्षा’ या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बैठक झाली आहे. अर्धातास या दोन नेत्यांमध्ये चर्चा झाली. शपथविधी सोहळ्याआधी शिंद- फडणवीसांमध्ये चर्चा झाली. यावेळी गिरीश महाजनदेखील उपस्थित होते. एकनाथ शिंदे आणि गिरीश महाजनांमध्ये बंद दाराआड 30 मिनिटं चर्चा झाली. खातेवाटप, शपथविधी आणि इतर मुद्द्यांवर चर्चा झाली आहे. ‘वर्षा’ बंगल्यावरच्या बैठकीनंतर गिरीश महाजनांनी ‘सागर’ बंगल्यावर जात देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
🟥मागच्या काही दिवसांपासून मुख्यमंत्रिपदाचा आग्रह करणाऱ्या एकनाथ शिंदेंनी त्यांचा निर्णय बदलल्याची माहिती आहे. उपमुख्यमंत्रिपद स्विकारण्याचा निर्णय एकनाथ शिंदे यांनी घेतल्याची माहिती आहे. देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंनी उपमुख्यमंत्रिपद स्विकारण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. तर गृहमंत्रिपदावरून मागच्या काही दिवसांपासूनरस्सीखेच सुरु आहे. त्यावरही तोडगा निघाल्याची माहिती आहे. गृहखात्याऐवजी नगरविकास खातं आणि आणखी एखादं महत्वाचं खास शिंदे गटाला दिलं जाणार असल्याची माहिती आहे.
🛑हिवाळ्यात पावसाळा.- ‘फेंगल’ चक्रीवादळाचा परिणाम.- मुंबईत पावसाला सुरूवात.- राज्यात पावसाची शक्यता
मुंबई :- प्रतिनिधी.
महाराष्ट्रातील नागरिक सध्या हिवाळ्यामध्ये पावसाळ्याचा अनुभव घेताना दिसत आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या फेंगल चक्रीवादळामुळे राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. मुंबईत अनेक ठिकाणी रिमझिम पाऊस पडत आहे. फेंगल चक्रीवादळाचा सर्वात जास्त परिणाम कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रावर झाला आहे. अति थंडी आणि आता पाऊस यामुळे शेतपिकांचे नुकसान होत असून बळीराजा संकटात आला आहे.
🔴बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘फेंगल’ चक्रीवादळामुळे राज्यातील वातावरणावर मोठा परिमाण झाला आहे. या वादळाची तीव्रता कमी झाली असली तरीही त्याचा प्रभाव असल्याने राज्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आज सर्वत्र पाऊस पडण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे राज्यात सर्वत्र पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील ७ जिल्ह्यांना ४ ते ७ डिसेंबर या कालावधीत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. फेंगल चक्रीवादळ शांत होत नाही तोच अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे पुन्हा वार्याचा वेग वाढल्यामुळे ४ ते ७ डिसेंबरपर्यंत राज्यातील सर्वच भागांना पावसाचा इशारा दिला आहे.
🟥ढगाळ वातावरणामुळे राज्यातील किमान तापमानात मोठी वाढ झाल्याने काल दिवसभर उकाडा जाणवत होता. आज देखील अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. आज रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता असून या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. याठिकाणी पुढील २४ तासांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढच्या ४८ तासांमध्ये राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे. तर महाराष्ट्रात इतर जिल्ह्यांमधील थंडी कमी झाली आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरडं आणि ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. राज्यात थंडी कमी झाली असून आता उकाडा जाणवायला लागला आहे.
🟥पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल यांच्यावर गोळीबार.- बादल थोडक्यात बचावले.- तर हल्लेखोर ताब्यात
चंदीगड :- वृत्तसंस्था
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल यांच्यावर हल्ला झाल्याची घटना समोर येत आहे. अमृतसरमध्ये ही घटना घडली आहे. सुखबीर सिंह यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
🟥मात्र सुदैवाने ते या हल्ल्यात सुखरुप बचावले आहेत. पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल यांच्यावर गोळीबार झाल्याची धक्कादायक प्रकार घडला आहे. अमृतसरमध्ये सुवर्ण मंदिर परिसरात हा गोळीबाराचा थरार घडला. या हल्ल्यातून बादल हे थोडक्यात बचावले असून गोळीबार करणाऱ्याला ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर सिंह बादल अमृतसर येथील स्वर्ण मंदिराच्या बाहेर दरबान (सुरक्षारक्षक) म्हणून शिक्षा भोगत आहेत.
त्याचवेळी हल्लेखोर तिथे आला आणि त्याने बादल यांच्यावर पिस्तूल रोखली. हल्लेखोराने पिस्तूल रोखताच बादल यांच्या भोवती असलेल्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना घेरलं तर, काहींनी हल्लेखोराला पकडले. मात्र, हल्लेखोराने तरीही गोळ्या झाडल्या. सुदैवाने सुखबीरसिंग बादल हे सुखरुप बचावले आहेत. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून त्याच्याकडील पिस्तूलदेखील जप्त केली आहे. आरोपीचे नाव नारायण सिंह असल्याचं म्हटलं जात असून तो दल खालसाशी संबंधित असल्याचे वृत्त आहे. मात्र सुवर्णमंदिरात ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली असून ही सुरक्षेत मोठी चूक असल्याचे बोलले जात आहे.
🟥मारकडवाडीतील 17 जणांसह 100 ते 200 ग्रामस्थांविरोधात गुन्हे दाखल
सोलापूर :- प्रतिनिधी

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी गावात बॅलेट पेपरने फेर मतदान रोखण्यात आलं होतं. पण आता मारकडवाडी येथील ग्रामस्थांच्या विरोधात अखेर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे.मतदान प्रक्रियेसाठी पुढाकार घेणाऱ्या मारकडवाडीतील 17 जणांसह अन्य 100 ते 200 ग्रामस्थांच्या विरोधात गुन्हे नोंदवले आहे.
🔴विधानसभा निवडणुकीच्या निकालावर परिणाम करण्याच्या उद्देशाने ईव्हीएम मशीन संदर्भात अफवा पसरवून फेर मतदानाची तरतूद नसताना प्रशासनाचे आदेश डावलल्याप्रकरणी हे गुन्हे दाखल केले आहे.तसंच बॅलेट पेपरवर मतदान करण्यासाठी नागरिकांना आवाहन करून भीती निर्माण करत समाजात द्वेषाची भावना निर्माण केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. बीएनएस 353(1) (ब), 189 (1), (2), 190, 223 सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम 135 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आले आहे. माळशिरसच्या नातेपुते पोलीस ठाण्यात सर्व आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केले आहे.
🔴या गावातील आरोपीवर दाखल केले गुन्हे
1) संजय हरिभाऊ वाघमोडे
2) राजेद्र अंकुश मारकड
3) वैभव वाघमोडे
4) विजय वाघमोडे
5) विलास आद्रट
6) रणजित जिजाबा मारकड
7) लक्ष्मण सिताराम मारकड
(8) सर्जेराव बाबुराव लोखंडे
(9) संदिपान आण्णा मारकड
10) अमित वाघमोडे
11) दत्तु राघु दडस
12) आबा नाना मारकड
13) बबन दादा वाघमोडे
14) मारुती शंकर रणदिवे
15) नानासाहेब मारकड
16) संजय नरळे
17) शरद कोडलकर. सर्व रा. मारकडवाडी.
18) इतर 100 ते 200 लोक
🟣नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
दरम्यान, मारकडवाडीतलं मतदान रोखल्यावरुन नाना पटोलेंनी एका पत्रकातून जोरदार टीका केली.”मारकडवाडीमध्ये प्रशासन अत्याचारी ब्रिटिशांप्रमाणे वागले, त्यामुळे EVM आणि निष्पक्ष निवडणूक प्रक्रियेवर जे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे ते अधिक गडद झाले आहे. ‘कर नाही तर डर कशाला?’ याप्रमाणे प्रशासनाने हे मतदान पार पडू द्यायला हवे होते, पण भाजप सरकारच्या काळात सर्व सरकारी यंत्रणाच दबावाखाली काम करत आहे. त्यामुळे सोलापूर पोलिसांनी त्यांना ‘वरून’ आलेल्या आदेशाची फक्त अंमलबजावणी केली. मारकडवाडीत प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून जनतेचा आवाज दाबण्याचाच प्रकार झाला आहे आणि हाच लोकशाही व संविधानाचा खून आहे” अशी टीका नाना पटोलेंनी केली.
🟥काय आहे प्रकरण?
मारकडवाडी गावात उत्तम जानकरांना कमी मतं मिळाल्याने बॅलेटवर मतदानाची मागणी झाली. मारकडवाडीचं एकूण मतदान आहे २ हजार ४७६. विधानसभा निवडणुकीत मतदान झालं १ हजार ९०५ यापैकी १००३ मतं पडली राम सातपुतेंना तर ८४३ उत्तम जानकरांना. त्यामुळे गावातील लोकांनी बॅलेटवर मतदानाची मागणी केली.