🛑नेसरी ग्रामपंचायतच्या वतीने भारतीय संविधान प्रास्ताविकेचा कट्टा बांधण्यात यावा – संग्राम सावंत.
🛑गडहिंग्लज येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला कठोर शिक्षा व्हावी.- मराठा महासंघ..
गडहिंग्लज.- प्रतिनिधी.
संविधान संवर्धन चळवळ व आदिशक्ती संविधान घटनेसरी यांच्या वतीने ग्रामपंचायत नेसरी सरपंच गिरीजादेवी शिंदे व उपसरपंच सदस्य यांना निवेदन देऊन संविधानाच्या संवर्धनाची व अंमलबजावणीची प्रक्रिया व्हावी याचा एक टप्पा म्हणून भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकीचा कट्टा नेसरी ग्रामपंचायतच्या हद्दीत उभा करावा व त्याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी. या आशयाचे निवेदन आज देण्यात आले. यावेळी सरपंच मॅडम,ग्रामसेवक, उपसरपंच ,?सदस्य यांच्याबरोबर संघटनेच्या प्रतिनिधींची बैठक झाली. या बैठकीमध्ये संग्राम सावंत यांनी संविधान कट्टा व संविधानाच्या वेगवेगळ्या मागण्या संदर्भात आपली भूमिका मांडताना म्हणाले,संविधानातील मौलिक तत्त्वे, मूलभूत अधिकार आणि कर्तव्ये स्वतंत्र भारताच्या नागरिकांना संस्कारित करणारी आहेत. संविधानातील मूलतत्त्वे शालेय विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबविणे आणि त्यांना जागरूक नागरिक बनविणे याकरिता संविधानाची माहिती, संविधानातील मूलतत्वांचा प्रसार व प्रचार होणे आवश्यक आहे. यासाठी संविधानाच्या प्रास्ताविक कट्टा उभा करणे गरजेचे आहे.
सरपंच गिरीजादेवी शिंदे-नेसरीकर म्हणाल्या की, आम्ही या मुद्द्यांकडे लक्ष घालून संविधान कट्टा व इतर मागण्या पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध राहू यासाठी कोणतीही अडचण येणार नाही.
यावेळी केलेल्या मागण्या
१) ग्रामपंचायतीच्या येणाऱ्या ग्रामसभा, सर्वसाधारण विशेष ग्रामसभा, मासिक सभा व इतर सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची सुरुवात भारतीय संविधान प्रास्ताविकेच्या वाचनाने करावी. याबाबत….!
२ ) तारखावार तसेच महिनावार वेळापत्रक आखून विशेष कार्यक्रम आयोजित करणे व जिल्हा स्तरीय व तालुका स्तरीय समितीने उपरोक्त मार्गदर्शक सूचना व्यतिरिक्त आपल्या स्तरावरून नाविन्यपूर्ण उपक्रमाचा सभा समावेश करून अधिक चांगल्या रीतीने कार्यक्रमाची अंमलबजावणी करावी. यासाठी आपल्या ग्रामपंचायतीच्या हद्दीतील ओपन स्पेस जागेत भारतीय संविधान प्रास्ताविकेचा “संविधान कट्टा” बांधण्याबाबत…!
३ )संविधानाबाबत जनजागृती व्हावी. यादृष्टीने दरवर्षी दि.26 नोव्हेंबर हा दिवस “संविधान दिवस” साजरा करण्याच्या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी व्हावी…!
४ )”घर-घर संविधान” व “माझे संविधान-माझा अभिमान” या उपक्रम अभियानाच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी वर्षभर करणेबाबत… निवेदन देण्यात आले. यावेळी उपस्थित सर्व सदस्यांनी ही संविधाना संदर्भातल्या मागण्या आणि संविधान कट्टा बाबतीत आपली मते मांडली आणि हे होणे गरजेचे आहे सविधान हा देशाचा प्राण आहे अशीही भूमिका सदस्यांनी मांडली. यावेळी सरपंच गिरीजादेवी शिंदे – नेसरीकर, ग्रामसेवक प्रकाश गुरव, उपसरपंच प्रथमेश दळवी सदस्य अशोक पांडव किरण हिटदोगी प्रकाश मुरकुटे वंदना नांदवडे कर मुस्तफा मुजावर रामचंद्र परीट व संविधान संवर्धन चळवळीचे रविंद्र भोसले,भारती पवार,सारिका चव्हाण,उषा कांबळे, दिपाली नाईक, रतिका चव्हाण आणि आदिशक्ती संविधान गट सभासद महिला व कार्यकर्ते हे उपस्थित होते.
गडहिंग्लज येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला कठोर शिक्षा व्हावी.- मराठा महासंघ
आजरा.- प्रतिनिधी.

अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने आजरा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आली आहे. मागील आठवठ्यामध्ये “गडहिंग्लज” येथील अल्पवयीन ११ वर्षाच्या मुलीवर परप्रांतीय युवकाकडून अमानुष अत्याचार झाला आहे. त्या युवकाला व त्याच्या साथीदाराला पकडून त्याचावर जलदगती न्यायालयामध्ये गुन्हा नोंदवून सदर गुन्हेगारांना फाशीची शिक्षा होईल असे प्रयत्न करावेत.
अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये महिला मुलींच्यावर अत्याचार होण्याचे प्रकार वाढलेले आहेत या गोष्टीचा शासनाच्या गृहविभागाने गांभीर्याने विचार करुन महाराष्ट्रामध्ये वातावरण चांगले राहील यासाठी योग्य ती पावले उचलावीत अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरुन आंदोलन करावे लागेल. असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे या निवेदनावर. मारुती भोरे
शंकरराव शिंदे, शिवाजीराव पाटील, संभाजीराव इजल
मिनल इंजल, बंडोपंत बव्हाण
राजेंद्र कोडक, भैरवी सावंत
चंद्रकात देसाई, धनश्री देसाई, उमा सकपाळ सह पदाधिकारी यांच्या सह्या आहेत.