🛑मंदिरवाले बाबनी मंदीरांच्या बांधकामांमध्येही टक्केवारी घेतली :स्वाती कोरी.
( उत्तूर येथे समरजितसिंह घाटगे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा.)
🛑मोडकी लॅम्ब्रोडर स्कूटर ते शेकडो कोटींचा मालक.
मुश्रीफांचा प्रवास डोळे पांढरे करणारा.:- ॲड सुरेश कुराडे
( भादवण येथील जाहीर सभेस उस्फुर्त प्रतिसाद.)
उत्तूर / प्रतिनिधी.

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी गडहिंग्लज शहरातील अत्यंत मोक्याच्या जागा टक्केवारीतील आपल्या दलालांच्या माध्यमातून लाटण्याचा सपाटा लावला आहे. एवढेच नव्हे तर ज्या उत्तुर जिल्हा परिषद मतदार संघाने त्यांना गेल्या पंधरा वर्षांमध्ये विजयी मताधिक्य दिले त्याच मतदार संघाचे श्रध्दास्थान असलेल्या जोमकाईदेवी मंदिर बांधकामातील निधीत भ्रष्टाचार करून त्यांनी टक्केवारी घेतली. स्वतःला “मंदीरवाले बाबा”अशी स्वयंघोषित उपाधी लावून घेणाऱ्या पालकमंत्र्यांनी आमची अस्मिता आणि श्रध्दास्थान असलेल्या मंदिरांच्या बांधकामांमध्येही टक्केवारी घेतली.अशी घणाघाती टीका जनता दलाच्या नेत्या स्वाती कोरी यांनी केली.
उत्तुर (ता. आजरा)येथे महाविकास आघाडीचे उमेदवार समरजितसिंह घाटगे यांच्या प्रचारार्थ आयोजित प्रचार सभेत त्या बोलत होत्या.
मुश्रीफ स्वार्थाने अंध झाले आहेत
स्वाती कोरी पुढे म्हणाल्या,स्वार्थांने अंध झालेल्या मुश्रीफांनी सरसेनापती संताजी घोरपडे हा खाजगी कारखाना काढला.मात्र हा कारखाना सुरळीत चालण्यासाठी त्यांनी गडहिंग्लज आणि आजरा कारखाना कर्जबाजारी करून त्यांच्या अस्तित्वालाच सुरुंग लावण्याचा प्रयत्न केला.परिणामी येथील अनेक भूमिपूत्रांवर बेरोजगार होण्याची वेळ आली तर शेतकऱ्यांचे वाटोळे झाले.याचा वचपा येथील जनता या निवडणुकीत मुश्रीफांचा पराभव करून नक्की काढेल.
समरजीतसिंह घाटगे म्हणाले,”
कागल, गडहिंग्लज,उत्तूर मतदारसंघात संविधान धोक्यात आले.लोकांचे स्वातंत्र्य हिरावून घेतले जात आहे.भयमुक्त लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी या निवडणुकीत हसन मुश्रीफांना पराभूत करणे काळाची गरज आहे. पंधरा वर्षे तुम्ही त्यांना मतदान केले.
त्यांची सर्वाधिक पाठराखण उत्तुर जिल्हा परिषद मतदार संघाने केली आहे.एक वेळ मला सेवा करण्याची संधी द्या.गडहिंग्लज एमआयडीसीमध्ये गेल्या पंधरा वर्षात त्यांना एकही उद्योग आणता आला नाही. गेली पंधरा वर्षे आयटी पार्क आणण्याचे ते सांगत आहे. त्यांनी मिळवलेली कमाई पाहता आयटी पार्क नव्हे ते स्वतःसाठी इन्कम टॅक्स पार्क आणतील. संविधानाने स्वतःचे मत ठरवण्याचा प्रत्येकाला अधिकार दिला आहे. या गावातील नेत्यांना जसा कुणाला पाठिंबा द्यायचा अधिकार आहे.त्याप्रमाणे येथील जनतेने सुद्धा त्यांनी मत कुणाला द्यायचे याचा अधिकार संविधानाने दिला आहे. येथील पुढार्यांनी आपलं मत ठरवलं आहे तसं येथील जनतेला माझे आवाहन आहे की तुमचे मत कुणाला द्यायचे हे तुम्ही स्वतः ठरवा. येथील सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना सांगतो तुम्ही अजून भत्त्यावरच आहात कधीही तुम्हाला ते वेजबोर्ड लागू करणार नाहीत.
स्वागत प्रवीण लोकरे यांनी केले.यावेळी सुरेश ढोणुक्षे, शिवाजी गुरव, नंदकुमार गोरे, अमृता सागर, प्रकाश कुंभार, विठ्ठल उत्तुरकर, संपतराव देसाई, कॉम्रेड शिवाजी मगदूम, चंद्रकांत गोरुले, सुरेश कुराडे,अभिषेक शिंपी, डॉ. प्रकाश शहापूरकर, प्रा. सुनील शिंत्रे यांनी मनोगत व्यक्त केले.
सभेस प्रकाश कुंभार, प्रकाश गाडे, संपतराव देसाई, दिनकर जाधव, रणजीत गाडे, संदीप गुरव, धोंडीराम सावंत आदी उपस्थित होते. आभार प्रकाश चव्हाण यांनी मानले.

चौकट –
माणसं विकत घेण्याचा पालकमंत्र्यांचा उद्योग
यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख प्रा.सुनील शिंत्रे म्हणाले,पालकमंत्री विकासकामांचा डांगोरा पिटत आहेत.मग ऐन निवडणुकीत रात्रीच्या वेळी त्यांना भांडी आणि पैसे का वाटावे,लागत आहेत ? असा सवाल उपस्थित करून आपला कारखाना सुरळीत चालण्यासाठी जिल्हा बँकेतील सत्तेचा गैरवापर करून या परिसरातील कारखाने मोडीत काढले. कंत्राटदारांच्या आडून माणसं विकत घेण्याचा त्यांचा उद्योग सुरू आहे.त्यांचे हे षडयंत्र आता जनतेला समजले असून या निवडणुकीत त्यांना त्याची किंमत चुकवावी लागेल.
🛑मोडकी लॅम्ब्रोडर स्कूटर ते शेकडो कोटींचा मालक.
मुश्रीफांचा प्रवास डोळे पांढरे करणारा.:- ॲड सुरेश कुराडे
( भादवण येथील जाहीर सभेस उस्फुर्त प्रतिसाद.)
उत्तूर/प्रतिनिधी.

मोडक्या लॅम्ब्रोडर स्कूटर वरून फिरणारे हसन मुश्रीफ पाच हजार कोटींचा मालक कसे बनले. त्यांचा हा प्रवास डोळे पांढरे करणारा असून याचे उत्तर मुश्रीफांनी जनतेला द्यावे. त्यांचा ही मोहमाया सर्वसामान्याना विचार करावयास लावणारा आहे. असा घणाघात ॲड सुरेश कुराडे यांनी केला.
भादवण (ता.आजरा) येथे आयोजित महाविकास आघाडीच्या उमेदवार समरजीतसिंह घाटगे यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.
ॲड कुराडे म्हणाले,” स्व. सदाशिव मंडलिक यांनी आपल्या मुलाला बाजूला ठेवून हसन मुश्रीफ यांना आमदार, मंत्री केले. पण या पट्ट्याने त्यांच्यासह विक्रमसिंह घाटगे,बाबा कुपेकर, श्रीपतराव शिंदे यांच्यासह अनेक नेत्यांचा विश्वासघात केला. असा हा गद्दार प्रतिनिधी या निवडणुकीतून बाजूला करूया. आता जागे व्हा आपण मराठे आहोत. सर्वजण शिवरायांचे मावळे आहोत. गनिमी काव्याने समोरच्या मोघलशाहीचा सुपडासाफ करूया. आणि स्वराज्याची नवी क्रांती घडवूया.”
समरजीतसिंह घाटगे म्हणाले,”
गावागावातील बहुजन समाजाचे स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा पालकमंत्री हसन मुश्रीफांचा डाव उधळून लावा. मुश्रीफांनी सत्ता आणि पैशाच्या जोरावर ठराविक लोकांची दंडेलशाही, हुकूमशाही सुरू केली आहे. माय बाप जनतेने स्वतः निर्णय स्वतः घेऊन या निवडणुकीत मतदान करावे.
समरजीतसिंह घाटगे म्हणाले,” कागल, गडहिंग्लज, उत्तूर मतदारसंघात संविधान धोक्यात आले. लोकांचे स्वातंत्र्य हिरावून घेतले जात आहे. भयमुक्त लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी या निवडणुकीत हसन मुश्रीफांना पराभूत करणे काळाची गरज आहे. पंधरा वर्षे तुम्ही त्यांना मतदान केले.
त्यांची सर्वाधिक पाठराखण उत्तुर जिल्हा परिषद मतदार संघाने केली आहे. एक वेळ मला संधी द्या. तुमचा विकास, तुमचे परिवर्तन पुढार्यांच्या हातात देऊ नका. तुम्ही तुमचा निर्णय घ्या. आणि या परिवर्तनाची पाठराखण करा.
ज्येष्ठ नेते शरद पवारसाहेब यांनी पालकमंत्र्यांना युवकांचे भवितव्य घडविण्यासाठी व महिला सक्षमीकरणासाठी सर्वाधिक सत्ता मुश्रीफांना दिली. मात्र त्यांनी युवकांना बेरोजगार व व्यसनाधीन करून एक पिढी बरबाद केली. सात हजार कोटी रुपयांचा निधी आणला म्हणणाऱ्या मुश्रीफांनी महिला सक्षमीकरण, शाळा व आरोग्य केंद्रांच्या दुरुस्तीसाठी किती निधी आणला याचा महिलांनी विचार करावा.”
स्वागत व प्रास्ताविक हरिष देवरकर यांनी केले. यावेळी शिवाजी गुरव निवृत्ती देसाई रणजीत गाडे दयानंद भोपळे टी बी.मुळीक यांनी मनोगत व्यक्त केले. सभेस शैलेश मुळीक, जयसिंग पाटील, मारुती देसाई, शिवाजी कुंभार, अमोल हळवणकर,संदीप सुतार उपस्थित होते. आभार शैलेश मुळीक यांनी मानले.
चौकट – हा कसला पळपुटा मंत्री.
ईडी कुणाच्याही मागे लागत नाही. हजारो कोटी रुपयांचा घोटाळा करण्याच्या मागे ईडी लागते. मुश्रीफांनी शेकडो कोटी रुपयांचा गैरव्यहार केला म्हणूनच त्यांच्या मागे ईडी लागली. ईडी दारात आल्यावर मागच्या दाराने पळून जाणारा हा कसला पळपुटा पालकमंत्री. असे घणाघाती टीका शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष संभाजी भोकरे यांनी केली.
