Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रमुरगुड येथील महाविकास आघाडीच्या पदयात्रेस उदंड प्रतिसाद…..( देशाचे नेते शरद पवार,समरजितसिंह राजेंच्या...

मुरगुड येथील महाविकास आघाडीच्या पदयात्रेस उदंड प्रतिसाद…..( देशाचे नेते शरद पवार,समरजितसिंह राजेंच्या विजयांच्या घोषणांनी आसमंत दुमदुमला…..)

मुरगुड येथील महाविकास आघाडीच्या पदयात्रेस उदंड प्रतिसाद…..( देशाचे नेते शरद पवार,समरजितसिंह राजेंच्या विजयांच्या घोषणांनी आसमंत दुमदुमला…..)

मुरगूड / प्रतिनिधी

मुरगुड येथे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजे समरजितसिंह घाटगे यांच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या पदयात्रेस उदंड प्रतिसाद मिळाला.पदयात्रेचा प्रारंभ राजे समरजितसिंह घाटगे यांच्या उपस्थितीत येथील ग्रामदैवत अंबाबाई मंदिरात जाऊन अंबाबाईचे दर्शन घेऊन करण्यात आला.
दरम्यान दिवंगत खास.सदाशिवराव मंडलिक आणि हुतात्मा स्मारकास भेट देऊन राजे समरजितसिंह घाटगे यांनी नतमस्तक होत अभिवादन केले.
या पदयात्रेच्या दरम्यान देशाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार,राजे समरजितसिंह घाटगे आणि महाविकास आघाडीच्या विजयांच्या घोषणांनी एकच आसमंत दुमदुमून गेला होता… यावेळी मुख्य बाजारपेठेतून काढण्यात आलेल्या पदयात्रेस नागरिकांनी दिलेला प्रतिसाद हा उत्साह वाढवणारा तर होताच शिवाय जणूकांही या परिवर्तनाची साक्ष देणाराच होता…
यावेळी गोकुळचे माजी अध्यक्ष रणजितसिंह पाटील,विश्वजीत पाटील, अनंत फर्नांडिस, विलास गुरव, दगडू शेणवी, विजय राजिगरे, सुरेश गोधडे, दत्तामामा खराडे, प्रवीण चौगुले, अमर चौगुले ,दत्तामामा जाधव, डॉ. अशोकराव खंडागळे, बजरंग सोनुले यांच्यासह महाविकास आघाडीच्या सर्वच सहयोगी पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते,कर्मचारी,तरुण वर्ग, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुरगुडकर नागरिकांचा मिळालेल्या अफाट प्रतिसादाने या पदयात्रेचा शेवट येथील मुरगुड नाका येथे करण्यात आले….

मतासाठी शपथ घेणाऱ्या उमेदवाराला मतदान न करण्याचा स्वाभिमानी जनतेचा निर्धार.- समरजीतसिंह घाटगे
: – बानगेत जाहीर सभा

म्हाकवे,ता.१६: प्रतिनिधी.

विरोधकांकडून मतदारांना विविध आमिषे दाखवली जात आहेत. देव देवतांच्या नावाखाली मतदारांच्या
अंगारा, भंडाऱ्यावर शपथ घेण्याचा कार्यक्रम सुरू असल्याची चर्चा मतदारसंघात उघडपणे सुरू आहे. मताला शपथ द्यायची नाही. शपथ घेणाऱ्याला उमेदवाराला मत द्यायचे नाही. असा निर्धार कागल गडहिंग्लज उत्तूर विधानसभा मतदारसंघातील स्वाभिमानी, सुज्ञ जनतेने केला आहे. असे प्रतिपादन महाविकास आघाडीचे उमेदवार समरजीतसिंह घाटगे यांनी केले.
बानगे (ता.कागल) येथे महाविकास आघाडीच्या वतीने आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. सभेच्या अध्यक्षांनी बाबुराव हिरुगडे होते.
समरजीतसिंह घाटगे म्हणाले,”छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराजांच्या लोकं कल्याणकारी राज्य कारभाराची प्रेरणा घेऊन भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताच्या संविधानात अनेक बाबींचा समावेश केला. त्यांनी दिलेल्या संविधानातील नागरिकांच्या मताच्या अधिकारानुसार नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क निर्भयपणे बजावण्याचे स्वातंत्र्य दिले. त्यामुळे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मिळाला मताचा अधिकार अनमोल आहे.
कागल, गडहिंग्लज, उत्तुर विधानसभा मतदारसंघात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान धोक्यात आले आहे. पालकमंत्र्यांना महिलांचा आदर करावा असे वाटत नाही. हसन मुश्रीफसाहेब दलित समाजाला आता तुमचे भावनिक भाषण नको आहे. तुमच्यामध्ये धाडस असेल तर पंचवीस वर्षात दलित समाजातील किती तरुणांना उद्योगधंदे उभारण्यासाठी सहकार्य केले हे जाहीरपणाने सांगावे.
सर्वसामान्य गरिबांची मुलं शिकणाऱ्या शाळेत शौचालय नाहीत. शाळांच्या इमारती धड नाहीत. कौले असणाऱ्या शाळातून पावसाळ्यात पाणी गळती होते. पंचवीस वर्षात मुश्रीफांनी शिक्षणासाठी निधी आणला नाही. नवीन शाळा बांधल्या नाहीत. मात्र त्यांनी कागलमध्ये स्वतःची खाजगी टुमदार शाळा बांधली. ती चकाचकी ठेवली. अशा पद्धतीची शाळा त्यांनी मतदारसंघात का बांधल्या नाहीत. याचे उत्तर येथील जनता या निवडणुकीत परिवर्तन करून मुश्रीफांना देईल.

Oplus_131072
स्वागत व प्रास्ताविक बाबुराव हिरुगडे यांनी केले. यावेळी अर्जुन माने, धनंजय पाटील, सागर कोंडेकर,युवराज पाटील, शिवानंद माळी, के.डी. पाटील, बाळासाहेब हेगडे यांनी मनोगत व्यक्त केले. सभेस सागर पाटील, बाळासो मेटकर, युवराज बंगार्डे,विनायक रोकडे, तानाजी मोरे, रघुनाथ पाटील, ऋषिकेश जगदाळे विनोद जगदाळे रामदास तेली शरद भोसले बाबुराव मांगले आदी प्रमुख उपस्थित होते आभार सागर पाटील यांनी मानले.

चौकट –
नाचणारा मोर आणि पैशाचा खेळ जास्त काळ टिकत नाही.

  माजी उपसरपंच धनंजय पाटील म्हणाले, आमच्या वहिनी साहेब सौ नवोदिता घाटगे कार्याध्यक्ष असणाऱ्या राजमाता जिजाऊ महिला समितीच्या वतीने महिलांसाठी आरोग्य शिबीरे, हेल्थ फॉर हर तसेच महिलांच्या हातांना काम देणे. त्यांच्यासाठी विविध स्पर्धा घेणे हे काम सात्यपूर्ण गेली आठ वर्षे सुरू आहे. तर दुसरीकडे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची माऊली महिला संस्था पावसाळ्यात भूछत्र उगवते त्याप्रमाणे निवडणुकीच्या तोंडावर उगवते व नाहीशी होते. नाचणारा मोर आणि पैशाचा खेळ जास्त काळ टिकत नाही. जनतेने या सर्व गोष्टींचा विचार करून सातत्याने आरोग्य, शैक्षणिक, महिलांसाठी काम करणाऱ्या समरजीतसिंह घाटगे यांना या निवडणुकीत विजयी करावे.   

विकासकामांचे चौफेर व्हिजन असलेल्या समरजितसिंह राजेंना निवडून देऊया : ॲड.एम.जे. पाटील…….

बार असोसिएशनच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करू : राजे समरजितसिंह घाटगे…..

    कागल / प्रतिनिधी .


लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांचे आचार आणि विचार राजे समरजितसिंह घाटगे यांनी आत्मसात करून प्रत्यक्ष कृतीतून त्यांनी ते सिद्ध केले आहेत.अल्पावधीतच त्यांनी  कोणतेही संविधानिक पद नसताना देखील मोठ्या प्रमाणात सर्वसामान्यांसाठी विकासनिधी खेचून आणलेला आहे. त्यांचे व्यक्तिमत्व अत्यंत अभ्यासू ,निष्कलंक, व्यासंगी आणि विकासाचे व्हिजन असलेले चौफेर नेतृत्व आहे.अशा सर्वगुणसंपन्न नेतृत्वाच्या पाठीशी येत्या विधानसभेच्या निवडणुकीत ठामपणे उभे राहून त्यांना निवडून देऊया असे प्रतिपादन कागल तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. एम.जे.पाटील यांनी केले.

    येथील कागल तालुका बार असोसिएशनला महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजे समरजितसिंह घाटगे यांनी भेट दिली त्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

ॲड. पाटील पुढे म्हणाले, राजे समरजितसिंह घाटगे यांच्या पाठपुराव्यामुळे चिकोत्रा, आंबेओहोळ प्रकल्प पूर्ण झाले आहेत.राजेंचे शिक्षणाबाबतचे व्हिजन देखील खूप प्रेरणादायी आहेत. त्यांच्या अभ्यासू नेतृत्वाखाली स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे यांनी उभारलेल्या सर्वच संस्था शिखरावर नेऊन पोहचवण्याचे काम त्यांनी केले आहे. विशेष म्हणजे अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून त्यांनी अनेक तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. अशा बहुआयामी नेतृत्वाच्या पाठीशी येत्या निवडणुकीत राहूया..

राजे समरजितसिंह घाटगे म्हणाले,आपल्या देशातील आदर्शवत लोकशाहीचा कारभार डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेतून अवतरलेल्या संविधानातून सुरू आहे.मात्र कांही मंडळी संविधानावरती हात ठेवून असंविधानिक विधाने करत आहेत. हे आपल्या लोकशाहीचे दुर्दैव आहे.त्यामुळे आपल्या सर्वांच्या कुटुंबातील एक सदस्य म्हणून येत्या निवडणुकीत माझ्या पाठीशी राहून आम्हाला साथ द्या. येत्या काळात बार असोसिएशनच्या प्रलंबित असलेल्या सर्वच मागण्या सोडविण्यासाठी आपण नक्की प्रयत्नशील राहू अशी ग्वाही दिली .

यावेळी बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड.बी.बी.मगदूम, ॲड.एस.के.पोटले, ॲड.सुरेश कुराडे यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी ॲड.संभाजी दावणे, ॲड.प्रमोद हावलदार, ॲड.सुधीर सावर्डेकर, ॲड.गणेश चौगुले,ॲड.महादेव गोरडे,ॲड.मीनाक्षी जाधव- शिरसाट, ॲड .वैभव गोरडे, ॲड.आर.डी मगदूम,ॲड.मनोज माने यांच्यासह बार असोसिएशनचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते…

स्वागत प्रास्ताविक ॲड.अभिजीत सांगावकर यांनी केले. ॲड.संभाजी दावणे यांनी आभार मानले….

चौकट ————–
परिवर्तनाचे नाव राजे समरजितसिंह
घाटगे……….

यावेळी बोलताना ॲड.वीरश्री जाधव म्हणाल्या,राजे समरजितसिंह घाटगे यांचे आचार-विचार आणि संस्कार हे खूपच प्रेरणादायी आहेत. शाहू महाराजांचे संस्कार तर ते तंतोतंत कृतीतून सांभाळत आहेत.विकासाचे त्यांच्याकडे चांगले व्हिजन आहे.अल्पावधीत जनसामान्यांच्या हृदयात विराजमान झालेले ते नेते आहेत. त्यामुळेच आज तालुक्यामध्ये बदलाचे, परिवर्तनाचे वारे वाहत असून त्या बदलाचे, परिवर्तनाचे नाव केवळ आणि केवळ राजे समरजितसिंह घाटगे हेच आहेत असे सांगितले..

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.