चंदगड विधानसभेचे अपक्ष उमेदवार शिवाजीराव पाटील यांना वाढता पाठिंबा.. विजयाकडे वाटचाल.
चंदगड.- प्रतिनिधी.
कानडी ग्रामपंचायत मधील पोवाचीवाडी गावच्या नागरिकांनी स्वतः सावर्डे कार्यालयाला भेट देऊन जाहीर पाठिंबा दर्शविला. कर्तुत्वावर उभा राहिलेलं नेतृत्व म्हणजे शिवाजीभाऊ जसजसे मतदानाची तारीख जवळ येत आहे तसतसे महिला व युवकांमध्ये मोठी क्रेझ पाहायला मिळते चंदगड आजरा गडहिंग्लज मध्ये वाढता पाठिंबा पहावयास मिळतो. समाज करणातून स्व कर्तुत्वावर उभं राहिलेलं नेतृत्व म्हणजे शिवाजीराव पाटील यांच्याकडे पाहिले जाते परमेश्वराने या माणसाला भरपूर दिलं आहे त्याला कशाचीही कमी नाही तरीही तो आज चंदगडच्या मातीत उन्हातानात राबतो आहे इथल्या गोरगरीब जनतेसाठी आपलं सर्व ऐश्वर्य सोडून या भागातील गोरगरीब जनतेची काळजी घेत आहे एखाद्याला आजारपण आले असेल तर धावून जाणे व त्यांना मदत करणे इतकेच नसून वैयक्तिक समस्या सोडत प्रत्येक गावागावांमध्ये मूलभूत सुविधा सोडवण्याचा ध्यास धरून आज जनतेच्या सेवेसाठी प्रामाणिक लढत असल्याचे स्पष्ट दिसते. सर्वसामान्यांच्या गरजा व समस्या सोडवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत असलेले शिवाजी भाऊ आज जनतेच्या मनामध्ये घर करून बसले आहेत, म्हणूनच की काय आज शनिवारी कानडी ग्रामपंचायत मधील पोवाचीवाडी गावच्या नागरिकांनी स्वतः सावर्डे कार्यालयाला भेट देऊन जाहीर पाठिंबा दर्शविला,यावेळी अरुण मातवंडकर, भगवंत नातवंडकर, उमेश सुतार, राजेश सुतार, उत्तम कोंडुसकर ,सागर सुतार, ज्ञानेश्वर यादव, अमोल चोपडे ,परसराम बेलेकर ,रामा नारळकर ,अमर यादव, रवी देवळी, प्रकाश कडोलकर, जयसिंग नारळकर, व महिलांमध्ये सुशीला बेलेकर, कांचना बेलेकर, पायल बेलेकर, गीता बेलेकर, शुभांगी मातवंडकर, भाग्यश्री यादव, सुनिता नारळकर, सह अनेकांनी स्वतः उपस्थित राहून पाठिंबा दर्शवून गप्प न बसता स्वतः प्रचारामध्ये भाग घेतला आहे . यामुळे निश्चितच विविध भागातून शिवाजी भाऊ यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असल्याचे स्पष्ट होत आहे.

कोकण भागाकडे मागील आमदार खासदाराने दुर्लक्ष केल्यामुळे विकासापासून वंचित.- शिवाजी भाऊंच्या सोबत एकवटली जनता.
चंदगड. प्रतिनिधी

कोकण भागाकडे मागील आमदार खासदाराने दुर्लक्ष केल्यामुळे विकासापासून वंचित असलेल्या कुरणे धामापूर ग्रामपंचायत विभागातील नागरिकांनी जाहीर पाठिंबा घोषित केला आहे. शिवाजी भाऊंचा एक कॉल प्रॉब्लेम सॉल यामुळेच धामापूर भागातील जनतेचा वैयक्तिक प्रॉब्लेम सुटत असल्याने आज स्वतःहून धामापूरचे नागरिक सावर्डे कार्यालयाला भेट देऊन पाठिंबा दिला आहे. एवढेच नसून या धामापूरच्या ज्येष्ठ नागरिक सह महिला व युवक युतीने स्वतः प्रचार दौऱ्यामध्ये भाग घेतला आहे .कानुर बुद्रुक भागामध्ये सध्या युवकांना रोजगार मिळण्यासाठी इंडस्ट्रीज प्रस्थापित करणे आवश्यक आहे. याला निश्चितच शिवाजी पाटील प्रामाणिक प्रयत्न करतील यात शंका नाही याच मुख्य उद्देशाने या भागातील जनता शिवा भाऊ यांच्या पाठीशी असल्याचे सांगत आहेत. . कोकण भागामध्ये इंडस्ट्रीज नसल्यामुळे युवकांना बेरोजगार व्हावे लागत आहे. यामुळे भविष्यात शिवाजीभाऊ युवकांना रोजगार मिळवून देतील याच अशेने जनता आज प्रामाणिक शिवाजी पाटील यांच्या पाठीशी थांबली आहे .यावेळी धोंडीबा बाबू मोहिते, अंकुश लिंगोजी अंब्रुस्कर,गोविंद बाबू गुडुळकर. ईश्वर पोटफोडे .पावणोजी जग्गाप्पा पाटील ,विजय गावडे, पावनाजी गावडे ,सह महिला व नागरिक उपस्थित होते.