आजरा मनसेच्या नूतन पदाधिकारी निवडी जाहीर.
आजरा. प्रतिनिधी. २
आजरा येथील मनसेची नूतन पदाधिकारी निवड जाहीर करण्यात आली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार कोल्हापूर जिल्हा संपर्क अध्यक्ष जयराज लांडगे यांच्या सूचनेनुसार जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांनी नूतन पदाधिकारी निवड जाहीर केली.
यामध्ये चंद्रकांत साबरेकर.- आजरा. ता. सचिव, पुनम भादवणकर.- जिल्हा उपाध्यक्ष महिला आघाडी आजरा- चंदगड, सरिता सावंत आजरा तालुका अध्यक्ष महिला आघाडी, तेजस्विनी देसाई कासार कांडगाव उपाध्यक्ष. ता. आजरा, प्रमोदिनी देसाई पेरणोली उपाध्यक्ष ता. आजरा. अशा नूतन पदाधिकारी निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत. यावेळी विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष प्रभात साबळे, आजरा ता. अध्यक्ष अनिल निऊंगरे , उपाध्यक्ष आनंदा घंट्टे, प्रकाश कांबळे, शहराध्यक्ष कुणाल पोतदार तसेच वसंत घाटगे, वैभव येसणे सह मनसैनिक उपस्थित होते. सर्व नूतन पदाधिकारी यांना जिल्हाध्यक्ष श्री चौगुले यांनी सत्कार करून पक्षाच्या आदेशाप्रमाणे, व पक्षवाढीसाठी जनहिताचे कार्य करावे यासाठी भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.