Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रसर्व श्रमिक संघटना, गिरणी कामगार यांचा महाविकास आघाडीला पाठिंबा.

सर्व श्रमिक संघटना, गिरणी कामगार यांचा महाविकास आघाडीला पाठिंबा.

सर्व श्रमिक संघटना, गिरणी कामगार यांचा महाविकास आघाडीला पाठिंबा.

आजरा.- प्रतिनिधी.


आजरा तालुक्यातील सर्व श्रमिक संघटना, गिरणी कामगार संघटना च्या वतीने आजरा तालुक्यातील उत्तूर जिल्हा परिषद कागल विधान सभेचे उमेदवार समरजीत घाटगे व राधानगरी विधान सभेचे उमेदवार के पी पाटील यांनी आजरा येथील गिरणीकामगार कार्यालयात भेट दिली.


यावेळी बोलताना के पी पाटील यांनी गिरणीकामगाराना मंबईत घरे मिळण्याबाबत मी गिरणीकामगारा सोबत राहण्याची हमी दिली. पेन्शनरांचा प्रश्न गाव पातळीवर दर्जेदार आरोग्य सेवा व जनते सोबत सातत्याने राहणार असलेचे सांगितले. समरजीत घाटगे यांनी मी गिरणीकामगार व पेन्शनरांचे आशिर्वाद घेण्यासाठी आलो असून जनतेचा सेवक म्हणून तुम्हचे प्रश्न आरोग्य शिक्षण व उद्योग या विकासला चालना देण्यासाठी मला आशिर्वाद द्यावे असे आवाहन केले.

यावेळी शांताराम पाटील, धोडिबा कुंभार, काशिनाथ मोरे, अभिषेक शिंपी यानी मनोगत व्यक्त केले यावेळी गोपाळ गावडे, नारायण राणे, मुकूंद देसाई, उदय पवार, संजय सावंत , हिंदूराव कांबळे, महादेव होडगे, आबा पाटील, जानबा धडाम, दौलती राणे,भिवा गुरव, विठ्ठल बामणे, पद्मिनी पिळणकर याच्या सह गिरणी कामगार उपस्थित होते आभार संजय घाटगे यांनी मानले

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.