गेले ते कावळे..- आले ते मावळे.- अशोक चराटी
( एक गेला शंभर आले.)
आजरा.- प्रतिनिधी.
आजरा राधानगरी भुदरगड विधानसभा मतदारसंघातील. आजरा जिल्हा परिषद मधील
देवर्डे येथील विरोधकांकडे गेलेला नेता हा तुमचा होता. आमचा नव्हता. एक नेता गेला परंतु शंभर जण जवळ आले असा माजी सरपंच जी. एम. पाटील यांचे नाव न घेता त्यांच्यावर जोरदार शाब्दिक प्रहार करत अशोक चराटी यांनी प्रकाश आबिटकर यांच्या सारखा चांगल्या व्यक्तीला, आमदार करूया असे अध्यक्षस्थानावर बोलताना म्हणाले. स्वागत व प्रास्ताविक ज्योतिबा पाटील यांनी केले. देवर्डे पंचक्रोशीतून विक्रमी मतदान करून आबिटकर यांना विजयी करण्याचे आवाहनही केले.
देवर्डे येथे आमदार प्रकाश आबिटकर यांच्या प्रचारार्थ आयोजित मेळाव्यास ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.
पुढे बोलताना श्री. चराटी म्हणाले आजरा शहरासाठी तब्बल १०० कोटींचा निधी उपलब्ध करून देण्याचे काम आमदार आबिटकर यांनी केले. इतका मोठा निधी प्रथमच शहराला मिळाला आहे. देवर्डे सारख्या छोट्या गावामध्ये दोन कोटी ४३ लाखांची विकास कामे केली आहेत. विरोधी उमेदवाराच्या तुलनेत सर्वच बाबतीत उजवा असणारा हा उमेदवार असून शासनाच्या लाडकी बहीणीसह अनेक सर्वसामान्यांच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम त्यांनी केले असल्याचे सांगितले. सर्वांनीच या
झालेली विकास कामे पाहून त्याची परतफेड धनशपन चिन्हावर मतदान करून मताच्या पेटीतून करावी. काम त्यांनी केले असल्याचे सांगितले. सर्वांनीच यावेळी
जिल्हा बँकेचे संचालक प्रा. अर्जुन आबिटकर म्हणाले, देवर्डे गावाला चांगल्या आणि खऱ्यांच्या बाजूने राहण्याचा इतिहास आहे. पलीकडे गोड बोलणारा म्हणून प्रसिद्ध असणारा उमेदवार विरोधात उभा ठाकला आहे. अनेकांवर दबाव तंत्राचा वापर केला जात आहे. दबाव तंत्राला बळी न पडता आमदार आबिटकर यांना निवडून आणावे. आमदार सर्वसामान्यांच्या कामामध्ये कधीच कमी पडणार नाहीत असेही श्री. आबिटकर म्हणाले. यावेळी वसंत आढाव, नेताजी पाटील / कोरीवडे, विजयकुमार व पाटील आदींचीही भाषणे झाली.
सभेत शामराव बोलके, सरपंच सौ. कल्पना चाळके, विशाल आढाव, शैला चाळके, गोपाळ चाळके, राजू दीक्षित, शामराव बोलके, केरबा तानवडे, सर्जेराव पाटील, बौद्ध समाजातील व मातंग समाजातील कार्यकर्ते, लहू पाटील, प्रकाश शिंदे / वेळवट्टी यांनी आमदार प्रकाश आबिटकर यांना पाठिंबा दिला.
या मेळाव्यास भाजपा तालुकाध्यक्ष अनिरूद्ध केसरकर, माजी नगरसेवक विलास नाईक, सुधीर कुंभार, दशरथ अमृते, विलास नाईक, गोविंद गुरव, संजय पाटील, अनिकेत शिंत्रे, राजू पोतनीस, इंद्रजीत देसाई, तिर्थकुमार सामंत, मारुती चाळके, पांडुरंग लोंढे, अरुण देसाई, संतोष पाटील, रणजित सरदेसाई, अश्विन डोंगरे, विजय थोरवत, संतोष पाटील, दयानंद पाटील, दयानंद नेऊंगरे, अरुण जाधव, संतोष भाटले यांच्यासह आजरा जिल्हा परिषद मधील व देवर्डे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुनील पाटील यांनी आभार मानले.
चौकट

राजेंद्रभाऊ सावंत शिंदे सेनेत..
उभाठा सेनेचे माजी ता. प्रमुख..व ता. संघटक. राजेंद्र सावंत यांनी शंभरहून अधिक कार्यकर्त्यांसह शिंदे गटात प्रवेश केला.
तर यावेळी वारकरी संप्रदायिक मंडळ, गिरणी कामगार, शेतकरी संघटना मातंग समाज यांनी आमदार आबिटकर यांना जाहीर पाठिंबा दिला
