कोणतेही संविधानिक नसताना शंभर कोटीची विकासकामे स्वतःच्या बळावर केली.- माजी मंत्री भरमूअण्णा पाटील
चंदगड : – प्रतिनिधी.
गेल्या पाच वर्षे सातत्याने जनतेच्या सेवेत राहिलेल्या शिवाजी पाटील यांचेकडे कोणतेही संविधानिक नसताना शंभर कोटीची विकासकामे स्वतःच्या बळावर केली. त्यामुळे शिवाजी पाटील यांना प्रचंड बहुमताने विजयी करू, असा निर्धार जनसंवाद दौऱ्यानिमित्त नागरिकांनी केला. माजी मंत्री भरमूअण्णा पाटील म्हणाले, शिवाजी पाटील यांनी पाच वर्षांत चंदगड तालुक्यात अनेक विकासकामे केली आहेत. जनता त्यांच्या कार्याची दखल घेईल यात शंका नाही.

शिवाजी पाटील म्हणाले, ‘महाराष्ट्र राज्यात आजरा, गडहिंग्लज व चंदगड हा संपूर्ण भाग अतिशय दुर्गम भाग म्हणून ओळखला जातो. मात्र, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून स्वतः विविध विकासकामे राबवून गोरगरीब जनतेची कामे केली आहेत. भविष्यात हा भाग विकसित मतदारसंघ म्हणून ओळखला जाईल. चंदगड विधासभा मतदार संघातील सर्व सामन्य जनतेचे अपक्ष उमेदवार श्री. शिवाजी पाटील यांच्या प्रचारासाठी कार्यकर्ते संपूर्ण तालुका पिंजून काढीत आहेत. तसेच प्रत्येक गावातून शिवाजी पाटील यांच्या विजयाचा निर्धार केला जात आहे.
शिवाजी पाटील यांच्या प्रचारासाठी आज शुक्रवारी शेंद्री, हनिमनाळ, निलजी, औरनाळ, मुत्नाळ, माद्याळ, दुंडगे, हिटणी, जरळी, हेब्बाळ क. नूल, हसुरचंपू, नुल आदि भागात जनतेशी संपर्क करून प्रचार फेरी काढण्यात आली. यावेळी ठिकठिकाणी महिलांनी आरती करून शिवाजी पाटील यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
सध्या विविध गावांमध्ये रोजगार सुरू आहे. त्यामुळे रोजगार सुरू असलेल्या ठिकाणी जाऊन शिवाजी पाटील यांनी नागरिकांच्या गाठीभेटी घेण्यावर भर दिला. यावेळी बोलताना शिवाजी पाटील म्हणाले की, चंदगड मतदार संघ विकासापासून वंचित आहे. या भागाचा विकास साधून रोजगार उपलब्ध करून देण्यास कटिबद्ध राहीन. महिला व युवकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.
यावेळी माजी राज्य मंत्री भरमुआणा पाटील यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

