Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रअपक्ष उमेदवार शिवाजीराव पाटील गडहिंग्लज - हरळी बुद्रुकचा विकास साधणार( शेकडो मतदारांच्या...

अपक्ष उमेदवार शिवाजीराव पाटील गडहिंग्लज – हरळी बुद्रुकचा विकास साधणार( शेकडो मतदारांच्या उपस्थितीत भव्य मिरवणूक )🛑 मनसेचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले, आजरा ता. अध्यक्ष आनंदा घंटे यांचा शिवाजीराव पाटील यांना पाठिंबा.

🛑अपक्ष उमेदवार शिवाजीराव पाटील गडहिंग्लज – हरळी बुद्रुकचा विकास साधणार
( शेकडो मतदारांच्या उपस्थितीत भव्य मिरवणूक )
🛑 मनसेचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले, आजरा ता. अध्यक्ष आनंदा घंटे यांचा शिवाजीराव पाटील यांना पाठिंबा.

गडहिंग्लज.- प्रतिनिधी

Oplus_131072

चंदगड विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय अपक्ष उमेदवार शिवाजीराव पाटील यांची शेकडो मतदारांनी भव्य मिरवणूक काढून यंदा शिवाजीराव पाटील यांना विजयी करण्याचा संकल्प दाखवला. गडहिंग्लज तालुक्यातील हरळी बुद्रुक गावाला शिवाजीराव पाटील यांनी भेट दिली. यावेळी हरळी बुद्रुक चा विकास साधणार असे आश्वासन शिवाजीराव पाटील यांनी दिले.
राजू ढवळे, भाऊ पाटील, अमित पाटील, दत्तात्रय येव्होले यांच्यासह हरळी बुद्रुक गावातील शेकडो मतदारांनी भव्य मिरवणूक काढल्यामुळे विजयाचे हात बळकट झाले असा आनंद शिवाजीराव पाटील यांनी व्यक्त केला. तर मतदारांनी कसल्याही अमिषाला आणि भूलथापांना बळी पडू नये आणि पाण्याची टाकी या चिन्हावरच समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करावे असे आवाहन शिवाजीराव पाटील यांनी केले.

तालुक्यातील इनाम सावर्डे येथे झालेल्या भव्य मेळाव्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले, आजरा तालुका अध्यक्ष आनंदा घंटे यांनी अपक्ष उमेदवार शिवाजीराव पाटील याना जाहीर पाठींबा दिला. तर २० नोव्हेंबरच्या विधानसभा निवडणुकीत निश्चितपणे विजयी करू असा आत्मविश्वास ही व्यक्त केला. तर उमेदवार शिवाजीराव पाटील यांनी चंदगड हा भाग विकसित मतदार संघ होणार असल्याचे ठामपणे सांगितले. महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा शाखेने जाहीर पाठिंबा दिल्याबद्दल ऋण व्यक्त केले. त्याचबरोबर मनसेची सर्व कामे पूर्ण करण्यास सदैव सिद्ध असल्याचे शिवाजीराव पाटील म्हणाले.

शिवाजीराव पाटील यांचे हात बळकट करण्यासाठी.- आमचा पाठिंबा. मनसे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले.

गडहिंग्लज.- प्रतिनिधी

Oplus_131072

निवडणुकीच्या निमित्ताने आपण सर्वजण एकत्र आहोत. भेदभाव सोडून शिवाजीराव पाटील यांचे हात बळकट करण्याची नितांत गरज असल्याचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले म्हणाले. महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून शिवाजीराव पाटील यांचा विजय होईल असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी उपाध्यक्ष कामगार सेना विवेक पाटील. सचिव तुकाराम पाटील, आजरा तालुकाध्यक्ष आनंदा घंटे, गडहिंग्लज तालुका महिला अध्यक्ष शितल पाटील, गडहिंग्लज शहर अध्यक्ष केंप्पांना कोरी, शहर अध्यक्षा रीमा चव्हाण , गडहिंग्लज मनसे विद्यार्थी सेनाचे प्रभात साबळे, तसेच अध्यक्षस्थानी माजी आमदार राज्यमंत्री भरमु अण्णा पाटील हे व्यासपीठावर उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.