Gokul Majhi chairman रवींद्र आपटे यांचे दुःखद निधन.– भावपूर्ण श्रध्दांजली.
शांत संयमी एक आदर्श व्यक्तिमत्व गोकुळचे माजी अध्यक्ष रविंद्र पांडुरंग आपटे (वय ७१ रा. सन्मित्र हौसिंग सोसायटी) यांचे मंगळवारी रात्री उशिरा निधन झाले. त्यांच्यावर आज बुधवारी दुपारी १२ वाजता पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. आजरा तालुक्यात पहिल्यांदा संकरित गायी आणल्या. १९८६ पासून सलग ३५ वर्षे ते गोकुळचे संचालक आणि तीन वेळा अध्यक्ष होते. महानंदचे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले. गेली चार वर्षे ते कर्करोगाने आजारी होते. त्यांच्या पश्चात खूप मोठा परिवार आहे.