Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रके. पी. पाटील यांच्या विजयासाठी महाविकास आघाडी आजरा जि. प. मधुन आघाडी...

के. पी. पाटील यांच्या विजयासाठी महाविकास आघाडी आजरा जि. प. मधुन आघाडी देणार

के. पी. पाटील यांच्या विजयासाठी महाविकास आघाडी आजरा जि. प. मधुन आघाडी देणार

आजरा – प्रतिनिधी.

महाविकास आघाडीचे उमेदवार के. पी. पाटील यांना या निवडणुकीत विजयी करण्यासाठी राधानगरी मतदार संघातील महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते नव्या जोमाने पुन्हा मैदानात उतरले आहेत. आज उमेदवार के पी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रमुख कार्यकर्त्यांची आज बैठक संपन्न झाली.

Oplus_131072

शिवसेना उभाठा उप. ता. प्रमुख संजय येसादे यांनी स्वागत केले. यावेळी प्रास्तविक करताना मुकुंददादा देसाई म्हणाले की आम्ही लोकसभा निवडणुकीत जसे पायाला भिंगरी बांधून प्रचार केला तसेच या निवडणुकीत घरोघरी मशाल चिन्ह पोचवून ही निवडणूक जिंकून दाखवुया.
कॉ संपत देसाई म्हणाले की लोकसभा निवडणुकीत आपण दोन महिने आधी प्रचाराची मोहीम संविधान बचाव रॅलीच्या निमित्ताने राबवली. आता आपल्या कडे फारच कमी दिवस असून नियोजन बद्ध प्रचार करणे आवश्यक आहे. त्यासाठी सगळे मिळून कामाला लागूया. यावेळी बोलताना उमेदवार के पी पाटील म्हणाले महाविकास आघाडीकडूनच लढण्याचा मी निर्णय घेतला होता. आघाडीतील ज्या पक्षाला उमेदवारी मिळेल त्या पक्षाची उमेदवारी घेण्याचे ठरविले. त्यानुसार आज मी शिवसेनेची मशाल घेऊन आपल्याकडे आलो आहे. आपण मला विश्वसने निवडून द्याल याची खात्री आहे. आजपासून सगळे कामाला लागूया. यावेळी असे म्हणाले

डॉ रोहन जाधव, युवराज पोवार यांनीही मनोगते व्यक्त केली. यावेळी शिवसेनेचे संभाजी पाटील, उदयराज पवार, संजय सावंत, रशीद पठाण, शांताराम पाटील, रणजित देसाई, नौशाद बुड्डेखान, विक्रम देसाई, प्रभाकर कोरवी, प्रकाश मोरुस्कर, उत्तम देसाई, डी ए पाटील सर, जोतिबा चाळके, शिवाजी आधी, परेश पोतदार, जयदीप महागावकर, बाळू जोशी, शिवराज देसाई इकबाल शेख, दत्ता कांबळे, आप्पासाहेब पाटील, अजय देशमुख, काशिनाथ मोरे, सुरेश पाटील, संतोष पाटील, ऍड जावेद दिडबाग, निसार लाडजी, अमित सामंत, आरिफ खेडेकर यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संखतेने उपस्थित होते. महाविकास आघाडीचे समन्वयक रवींद्र भाटले यांनी आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.