सर्वांना एकत्रित घेऊन जाण्याची कार्यशैली आमदार राजेदादा पाटील यांच्या विचारात आहे.- निखिल राजेश पाटील
चंदगड.- प्रतिनिधी.

समाजातील सर्व घटकांना एकत्र घेऊन काम करणारे कर्तव्यदक्ष आमदार राजेश पाटील आहेत. अमित चिटणीस सरपंच हिंडगाव, फाटकवाडी, मांगलेवाडी ग्रुप ग्रामपंचायत सर्वांना एकत्रित घेऊन जाण्याची कार्यशैली आमदार राजेदादा पाटील यांच्या विचारात आहे कामात आहे. असे वक्तव्य निखिल पाटील यांनी प्रचार दरम्यान केले. पुढे म्हणाले अशा चांगल्या विचारांच्या सोबत राहून विधानसभा मतदारसंघात जास्तीत जास्त विकास कामे पुढील काळात 3200 कोटीचा विकास निधी आणून महाराष्ट्रात राज्याच्या विकासाच्या पटलात चंदगड विधानसभा मतदारसंघ एक नंबरला ठेवायचा आहे म्हणून येणाऱ्या 20 तारखेला महायुतीचे उमेदवार राजेश पाटील यांना घड्याळ या चिन्हावरील बटन दाबून जास्तीत जास्त मतदान देऊन विजयी करा असे आवाहन निखिल राजेश पाटील यांनी केले यावेळी अमित चिटणीस सरपंच ग्रुप ग्रामपंचायत हिंडगाव, अर्जुन फाटक, राजेंद्र फाटक ,रामू मस्कर , गंगुबाई खराटे, तुकाराम फाटक, लक्ष्मण फाटक, भगवान फाटक ,नामदेव फाटक ,शिवाजी भोंगाळे, राजकुमार इनामदार ,ज्योतिबा फाटक, मारुती फाटक ,नारायण फाटक, परशराम मस्कर, तसेच ग्रामस्थ सर्व संस्थांचे पदाधिकारी युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“महायुतीचे सरकार हे जणसामान्यांची गरज ओळखून कार्य करणारे सरकार आहे – राजेश पाटील “
आम. राजेश पाटील चंदगड विधानसभा मतदारसंघासाठी विकासाचा डोंगर उभा केला आहे. केलेल्या कामाच्या शिदोरीवर गावातून साहेबांच्या पाठीशी मोठे बळ उभे करणार आहोत,अशी ग्वाही ग्रामस्थांमार्फत देण्यात आली. उचंगी प्रकल्पामुळे शेतीसाठी, पिण्यासाठी पाणी उपलब्ध झाले आणि या भागातील सामान्य नागरिक, शेतकरी सदन झाले आहेत.माझ्या आयुष्यातील हे सर्वात मोठे समाधान आहे.- राजेश पाटील
महायुतीचे सरकार हे जणसामान्यांची गरज ओळखून कार्य करणारे सरकार आहे, म्हणूनच मुख्यमंत्री लडकी बहीण, प्रामाणिकपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान, तीन गॅस सिलेंडर मोफत यासारख्या लोक कल्याणकारी योजना कार्यान्वित आहेत. सर्वसामान्य जनतेला आर्थिक स्थैर्य देण्याचा प्रयत्न महायुतीच्या सरकारने केला आहे. या योजना पुढे कार्यान्वित ठेवायच्या असतील तर महायुतीचे सरकार येणे गरजेचे आहे. केलेल्या कामाच्या शिदोरीवर पुन्हा एकदा महायुतीच्या सरकारला निवडून द्याल व माझ्या पाठीशी राहाल.यावेळी सरपंच दत्तात्रय परिट, गजानन पाटील सह नागरिक उपस्थित होते.
