🛑 राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांचा गोळीबारात मृत्यू.- अज्ञात व्यक्तींनी चार ते पाच गोळ्या झाडल्या.
मुंबई :- प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बांद्रा ईस्टमध्ये ही गोळीबाराची घटना घडली आहे. या घटनेनंतर बाबा सिद्दीकी यांना लीलावती रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात होते.मात्र त्यांचा मृत्यू झाला आहे.
🟥राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. आमदार झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयासमोर बाबा सिद्दिकी यांच्यावर तीन अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केल्याची माहिती मिळत आहे. मुंबईच्या बांद्रा पूर्वेत खैरनगर परिसरात ही घटना घडली असून बाबा सिद्दिकी यांना उपचारासाठी लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार बाबा सिद्दिकी यांचा मृत्यू झाला आहे.