Homeकोंकण - ठाणेखूशखबर.- लाडक्या बहि‍णींची दिवाळीभाऊबीजेची ओवाळणी ऑक्टोबरलाच होणार. कधी मिळणार पहा काय म्हणाले.-...

खूशखबर.- लाडक्या बहि‍णींची दिवाळीभाऊबीजेची ओवाळणी ऑक्टोबरलाच होणार. कधी मिळणार पहा काय म्हणाले.- उपमुख्यमंत्री अजितदादांचा वादा./ अखिल भारतीय वारकरी मंडळाची आजरा.- मेंढोली येथे होणार शाखा उदघाटन.

🟥खूशखबर.- लाडक्या बहि‍णींची दिवाळी
भाऊबीजेची ओवाळणी ऑक्टोबरलाच होणार. कधी मिळणार पहा काय म्हणाले.- उपमुख्यमंत्री अजितदादांचा वादा.

मुंबई :- प्रतिनिधी.

राज्य सरकारने सर्वात आधी दोन महिन्यांचे एकत्र म्हणजे जुलै आणि ऑगस्ट महिन्यांचे मिळून महिलांच्या खात्यावर तीन हजार रुपये जमा केले होते. त्यानंतर पुन्हा सप्टेंबर महिन्याचे पैसे महिलांच्या खात्यावर जमा करण्यात येत आहेत. अशातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडक्या बहि‍णींना अजून एक मोठी खुशखबर दिली आहे.
🔴लाडक्या बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असे दोन महिन्यांचे पैसे खात्यावर जमा होणार असून नोव्हेंबर महिन्यांचे पैसे देखील ऑक्टोबरमध्येच म्हणजे दिवाळीलाच जमा होणार आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना आधी दोन महिन्यांचे तीन हजार दिले. त्यानंतर आता लाडक्या बहि‍णींना सप्टेंबर महिन्याचे पैसे दिले आहेत. मात्र, आज मी तुम्हाला सांगतो ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे लाडकी बहीण योजनेचे पैसे १० ऑक्टोबरच्या आधी दिवाळी भाऊबीजेची ओवाळणी बहि‍णींच्या खात्यावर जमा होणार आहे, हा शब्द मी तुम्हाला देतो, असं अजित पवार यांनी बीडमधील एका सभेत बोलताना म्हटलं आहे.


🟥उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका सभेला संबोधित करताना सांगितलं की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे लाडकी बहीण योजनेचे पैसे १० ऑक्टोबरच्या आधी म्हणजे भाऊबीजेलाच बहि‍णींच्या खात्यावर जमा होणार आहेत, असं अजित पवारांनी सांगितलं आहे. लाडकी बहीण योजनेसाठी पहिल्यांदा ३ हजार रुपये दिले आहेत. आता सप्टेंबर महिन्याचे १५०० रुपये मिळाले आहेत. बहिणींनी काही काळजी करु नये. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे १० ऑक्टोबरच्या आधी, भाऊबीजेची ओवाळणी बहिणींच्या खात्यात जाणार आहे, हा शब्द तुम्हाला देतो. लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या खात्यात टाकणार आहे. आताच आदिती तटकरे यांच्यासोबत बोललो आहे. त्यांनी सांगितले की, इतके हजार कोटी लागतील. आता लगेचच मुंबईला जाणार आहे. जे पैसे लागतील, त्याची तरतूद करणार आहे, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

🛑अखिल भारतीय वारकरी मंडळाची आजरा.- मेंढोली येथे होणार शाखा उदघाटन.

आजरा.- प्रतिनिधी.

मेंढोली ता.आजरा येथे गुरूवार दि. ३ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता अखिल भारतीय वारकरी मंडळाचे शाखा उदघाटन हभप राजाराम जाधव हभप लक्ष्मण शिंत्रे व मार्गदर्शक काॅ.संपत देसाई याच्या उपस्थित होत असून केदारलिंग माऊली भजनी मंडळ मेढोली याच्यावतीने शाखा उदघाटन व प्रवचन किर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे .हभप बाळासाहेब सुतार याचं प्रवचन व हभप विश्राम निऊंगरे यांचे किर्तन होणार आहे. यावेळी हभप गौरव सुतार तालूका अध्यक्ष, हभप संतू कांबळे उपाध्यक्ष, कोडिंबा आडे कोषाध्यक्ष, पांडूरंग जोशिलकर, गंगाराम येडगे, दिपाली गुरव, कल्पना जाधव, याच्या सह अखिल भारतीय वारकरी मंडळ आजराचे वारकरी संप्रदायातील सदस्य उपस्थित होणार आहेत, तरी आजरा तालुक्यातील तमाम वारकरी, किर्तनकार बंधू भगिनी व मान्यवर यांनी उपस्थित रहावे असे आवाहन शाखा अध्यक्ष प्रकाश घेवडे यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.