दुःखद निधन वार्ता – दैनिक महाराष्ट्र टाइम्सचे ज्येष्ठ पत्रकार नितीन चव्हाण यांचे दीर्घ आजाराने निधन
मुंबई (शांताराम गुडेकर )

समाजातील दुर्बल, दुर्लक्षित आणि समाजाच्या प्रबोधनासाठी लेखणी चालविणारे सर्वांचे जवळचे मित्र ज्येष्ठ वृत्तपत्र लेखक (मराठी वृत्तपत्र लेखक संघ, मुंबईचे मा. कोषाध्यक्ष), ज्येष्ठ पत्रकार (महाराष्ट्र टाइम्स वृत्तपत्राचे विशेष प्रतिनिधी) नितीन शांताराम चव्हाण (वय ५३ वर्षे) यांची आज मंगळवार दिनांक ०१ ऑक्टोबर २०२४ रोजी, पहाटे ०३:३० वा. प्राणज्योत मालवली.त्यांच्या पश्चात आई,वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. त्यांचे पार्थिव आज (१ ऑक्टोबर रोजी) दुपारी १ वाजेपर्यंत रुग्णालयातून घरी आणण्यात येणार आहे. ( सध्या त्यांचे पार्थिव गोदरेज रुग्णालयात ठेवले आहे.) त्यानंतर विक्रोळी (पूर्व) टागोरनगर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
नितीन चव्हाण दीर्घ आजारातून बरे व्हावेत यासाठी आपण सर्व पत्रकारांनी, दानशूर व्यक्ती, महापालिकेचे काही अधिकारी वर्ग, मित्र परिवार आदींनी आपल्याकडून शक्य होईल त्या सर्व प्रकारे प्रयत्न केले.मात्र ते प्रयत्न नियतीसमोर अपुरे पडले. अनेकांनी त्यांना भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण करून दुःख व्यक्त केले.
कात्रजकर प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामध्ये जाम.
पुणे. – प्रतिनिधी

पुणे कात्रज चौकामध्ये सकाळी सहा वाजल्यापासून ट्राफिक जाम पाहायला मिळाले. प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे कात्रज चौक जाम होताना दिसतोय या चौकामध्ये उडान पुलाचे काम चालू आहे. ठेकेदाराने कुठलेही उपयोजना न करता या ठिकाणी चौक बंद करून साईटने रस्ता देण्यात आलेला आहे. मांगडेवाडी, संतोष नगर, कात्रज गाव, सच्चाई माता परिसर, वाघजाई नगर, आंबेगाव खुर्द, निंबाळकरवाडी, गोकुळ नगर, नऱ्हेगाव मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक राहतात. याचा फटका सकाळपासूनच विद्यार्थी, नोकरदार यांना बसला आहे. इंधनाची मोठ्या प्रमाणात हानी सुध्दा होणार आहे. पोलीस प्रशासनाबरोबर मोठ्या प्रमाणात नागरिक ट्राफिकचे नियोजन करताना दिसले. काही मुजोरखोर आर मुठे वाहन चालकामुळे ट्राफिक बराच वेळ खोळंबली होती. या ठिकाणी नियोजनामध्ये आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष प्रशांत कांबळे सामाजिक न्याय विभाग यांनी सहभाग घेतला. संबंधित ठेकेदारांनी स्वयंसेवक नेमणे अपेक्षित होते. परंतु या ठिकाणी स्वयंसेवक न नेमता शासनाचे नियम न जुमानता ठेकेदाराची मनमानी या ठिकाणी दिसून येत आहे. सातारा, मुंबई, सोलापूर, बारामती जाणे येणे मालवाहतूक जड वाहन या चौकामधून रस्ता असल्यामुळे मोठी ट्राफिक ची समस्या भेडसावणार आहे. खरंतर पुलाचे काम रात्री १० ते सकाळी ६ या वेळात व्हायला हवे ते होताना दिसत नाही.याचा फटका नागरिकांना मोठ्या प्रमाणात दिसून येणार आहे. आप चे प्रशासनाला नागरिक विनंती करत आहेत. या वाहतुकीबाबत उपयोजना करून नागरिकांना ट्राफिक मधून सुटका करावी.