Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रचंदगड मतदारसंघात रु १६ शे कोटीचे विकासाचा लेखा जोखा जनतेसमोर मांडावा.( विद्यमान...

चंदगड मतदारसंघात रु १६ शे कोटीचे विकासाचा लेखा जोखा जनतेसमोर मांडावा.( विद्यमान आमदारांनी आमसभा घ्यावी.- मतदारांचे तहसीलदार यांना निवेदन.)

चंदगड मतदारसंघात रु १६ शे कोटीचे विकासाचा लेखा जोखा जनतेसमोर मांडावा.
( विद्यमान आमदारांनी आमसभा घ्यावी.- मतदारांचे तहसीलदार यांना निवेदन.)

चंदगड.- प्रतिनिधी.

चंदगड विधानसभा मतदार संघ- २७१ चे आम.राजेश पाटील यांनी गेले पाच वर्षामध्ये एकही आमसभा न घेतल्यामुळे ग्रामीण विकासाच्या संकल्पनेला खीळ बसली आहे. याबाबत चंदगड तालुक्यातील मतदारांनी आमसभा घ्यावी. म्हणून चंदगड तहसीलदार यांना निवेदन दिले आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. विद्यमान आमदारांनी चंदगड विधानसभा मतदार संघामध्ये अनेक ठिकाणी रु १६ शे कोटीचे विकासाचे बॅनर उभे केले आहेत. सद्य परिस्थिती पाहता चंदगड विधानसभा मतदार संघामध्ये आरोग्य, शिक्षण, पर्यटन या महत्वांच्या विभागामध्ये एकही काम पहावयास मिळत नाही. चंदगड तालुक्यातील रस्त्यांची दुरावस्था असून, जागोजागी खडयांचे साम्राज आहे.

चंदगड तालुक्यातील आरोग्य विभाग आजारी असून, बरीच पदे रिक्त आहेत. त्याकडे विद्यमान आमदारांचे लक्ष नाही. गेल्या पाच वर्षामध्ये एकही मोठे हॉस्पीटल चंदगड तालुक्यात आणता आले नाही. चंदगड तालुक्यातील औदयोगिक वसाहत ओस पडली असून, बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. वन विभाग असूदे, एसटी डेपो महामंडळाच्या प्रवासांच्या समस्या असूदेत याकडे विद्यमान आमदारांचे लक्ष नाही.

तरी सर्व विभागांची दयनीय अवस्था असून, विद्यमान आमदारांनी एकही आमसभा घेतली नसून, आमदारांनी लवकरात लवकर आमसभा घेवून रु १६ शे कोटीचा विकासाचा लेखा जोखा जनतेसमोर मांडावा, नाहीतर येणाऱ्या काळामध्ये आम्ही तीव्र आंदोलन उभा करु. याची दक्षता घ्यावी. असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. यावेळी ॲड.संतोष मळवीकर, जगनाथ हुलजी, बी एम पाटील वाघराळीकर, राजवर्धन शिंदे सामंबरेकर, बाळासाहेब हळदनकर, बाळाराम फडके, ॲड.खाचू नाकाडी, बसवराज आरबोळे, भरमू जाधव, नरसु शिंदे, बी.के काळापगोळ, सुनील नाडगौडा, दयानंद गावडे, विश्वनाथ ओऊळकर, उदयकुमार पाटील, संभाजी मळवीकर, रोहिणी मेंणसे, अरुण गवळी सह नागरिक उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.