Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रडॉ. श्री. धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या सौजण्याने सोहाळे / सोहाळेवाडीत वृक्षलागवड उपक्रम...

डॉ. श्री. धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या सौजण्याने सोहाळे / सोहाळेवाडीत वृक्षलागवड उपक्रम संपन्न.

डॉ. श्री. धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या सौजण्याने सोहाळे / सोहाळेवाडीत वृक्षलागवड उपक्रम संपन्न.

आजरा.- प्रतिनिधी.‌

आजरा ता. येथील सोहाळे / ( सोहाळे वाडी) येथे “डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान वतीने आदरणिय पद्मश्री डॉ.श्री. धर्माधिकारी आदरणीय रायगड भूषण डॉ. सचिनदादा दत्तात्रय धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे ३३० वुक्ष लागवड दि. १५ रोजी करण्यात आले. सद्या सर्वत्र “Global Warming” हा भाग एवढा भयानक पद्धतीने वाढत आहे ज्यामुळे संपूर्ण निसर्ग चक्र बदलत आहे त्यामुळे सर्वत्र असमाधान तसेच शारीरिक आजार उत्पन्न होत आहे ज्यामुळे सर्वत्र प्रदूषण होत असून त्यावर उपाय योजना करणे गरजेचे आहे. याचाच विचार करून या समस्येवर उपाय म्हणुन डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे संपूर्ण जगभरात खुप मोठ्या प्रमाणत वृक्ष लागवड तसेच वृक्ष संवर्धन करण्यात येत आहे त्याचाच एक भाग सोहाळे येथे वृक्ष लागवड आणी संवर्धन हा उपक्रम राबवण्यात आला आहे.


डॉ. श्री.धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे मुख्यतः वृक्ष संवर्धन या भागाकडे अत्यंत काळजपूर्वक लक्ष आहे जो आज् सर्वत्र प्रतिष्ठान तर्फे केला जात आहे. आता संपूर्ण 330 झाडांना ” Taging with Number” टॅग आणी नंबर दिला आहे
आता वृक्ष लागवड केलेली संपूर्ण झाडे ग्रामपंचायतीला सुपूर्द करण्यात आली आहेत.
वृक्षांची माहिती व संपूर्ण वृक्ष डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान वतीने स्वतः रोप तयार करून झाडांसाठी लागणारे खड्डे, इतर साहित्य पूर्व नियोजन करुन शास्त्रीय पद्धतीने वृक्ष लागवड करण्यात आली. यामध्ये सेंद्रिय पद्धतीने एकूण ३३० वृक्ष लागवड केली असून ज्यामध्ये जांभूळ, करंज, चेरी ईत्यादी वृक्ष लावण्यात आली आहे.
या सर्व उपक्रम करण्या पाठीमागे डॉ. श्री. धर्माधिकारी प्रतिष्ठानचा एकच उद्देश आहे. सर्वांना अखंड उत्तम निरोगी आयुष्य मिळावे आणि सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी प्राप्त व्हावी. या उपक्रमासाठी सोहाळे गावच्या लोकनियुक्त सरपंच सौ. भारती डेळेकर, वसंत कोंडूसकर (उपसरपंच), व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. त्याचप्राणे सोहाळे गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. यावेळी आजरा, निपाणी, संकेश्र्वर, गडहिंग्लज, नेसरी, कागल इत्यादी ठिकाणाहून सहभागी झाले होते. ज्यामध्ये समाजाप्रती आपले योगदान देण्यासाठी श्री सदस्य स्वतः सहभागी होवून हा संपूर्ण कार्यभाग संपन्न करण्यात आला. डॉ श्री. धर्माधिकारी प्रतिष्ठान वतीने श्री समर्थ बैठकीच्या माध्यमातून श्रीमत दासबोधाचे श्रवण निरुपणाच्या माध्यमातून पहिल्यांदा मनुष्याच्या अंतकरणात स्वच्छ्ता केली आणि कळवून दिले की आज मला स्वतःबरोबर समाजाचा आणि देशाचा सोबत संपूर्ण विश्वाचा विचार केला पाहिजे . म्हणूनच आज प्रत्येक श्री सदस्य स्वतःचा व्यवसाय, नोकरी सांभाळून या दिवशी समाजाप्रती माझे जे कर्तव्य आहे ते देण्यासाठी आले आहेत देश मला काय देतो या पेक्षा मी देशाला काही तरी द्यावे यासाठी प्रत्येक श्री सदस्य स्वतःहून आले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.