ग्रामपंचायत कारभारात कारभाऱ्यांनी लक्ष घालू नये.- देवर्डे ता. आजरा सौ. सरपंच यांच्या कामकाजात – पती यांचा ग्रामपंचायत कारभारातील हस्तक्षेपाबाबत..गट विकास अधिकारी यांना निवेदन.
आजरा.- प्रतिनिधी.
देवर्डे ता. आजरा सरपंच यांच्या कामकाजात त्यांचे पती यांचा ग्रामपंचायत कारभारातील हस्तक्षेपाबाबत गटविकास अधिकारी पं. स. आजरा यांना देवर्डे ग्रामस्थांनी निवेदन दिले आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रामध्ये रस्ते, दळणवळण इत्यादी सुविधांची जबाबदारी ग्रामपंचायतीची असताना ग्रामपंचायत हद्दीतील कित्येक वर्षापासून असणारे रस्ते बंद करून अतिक्रमण करणाऱ्या ग्रामस्थाला सरपंच व त्यांचे पती राजकीय पाठबळ देऊन रस्ते बंद पाडणे व दळणवळणाची गैरसोय करण्यामध्ये पुढाकार घेत आहेत असे मुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद कोल्हापूर यांचेकडे दिनांक १९/०८/२०२४ रोजी झालेल्या सुनावणीच्या माध्यमातून आम्हा ग्रामस्थांचे निदर्शनास आलेले आहे. त्यामुळे त्यांच्या बेजबाबदारपणाबद्दल वरिष्ठांनी लक्ष घालून ग्रामस्थांना न्याय द्यावा. व रस्ता खुला करून मिळावा. त्याचवरोवर सरपंच महोदय व त्यांचे पती ग्रामपंचायतीच्या कारभारामध्ये हस्तक्षेप करुन ग्रागनिधीतील रक्कम ग्रामपंचायतीच्या परवानगी शिवाय खर्च टाकुन ग्रामनिचीचा उधळपट्टी करत आहेत असे लक्षता आले आहे. ग्रामपंचायतीचा निधी खर्च करताना सरपंच व त्यांचे पती मिटींग घेणे, टेंडर मागवणे इत्यादी प्रक्रिया न करता ढपला पाडण्याच्या उद्देशाने सदरची व्यक्ती, ग्रामसेवक व ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना दरडावून, बेकायदेशीर कारभार करत आहेत. तरी सदरच्या गैर कारभाराची चौकशी व्हावी व संबंधीतांवर योग्य ती कारवाई व्हावी. त्याचबरोबर ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक सुभाष येळणे यांनी सरपंचाचे उपरोक्त वेकायदेशीर कारकभाराबद्दल विरोध केल्याने त्यांची बदली होण्यासाठी आपल्या अखत्यारीतील (ऐकणारे) ग्रामसेवक मिळावा यासाठी सरपंच व त्यांचे पती यांनी गटविकास अधिकारी यांचेकडे मागणी करणेसाठी सह्यांची मोहिम राबविलेली आहे असे समजते. तरी संबंधीतांची योग्य ती चौकशी व्हावी अशी ग्रामस्थांचे वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर संतोष शिवगंड, प्रकाश तेजम, संजय तेजम, पांडुरंग शिंवगड, अनंत सुतार, आनंद सुतार, स्नेहा होडगे, रामचंद्र कांबळे, महेश सुतार, भास्कर पाटील, जयवंत शिवगंड, सह ५० हून अधिक ग्रामस्थांच्या सह्या आहेत.